scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरशहराच्या परिघावर"स्वातंत्र्य कोणासाठी आणि कशासाठी?" ‘ट्रेन टू पाकिस्तान’ नाटकाचा सवाल

“स्वातंत्र्य कोणासाठी आणि कशासाठी?” ‘ट्रेन टू पाकिस्तान’ नाटकाचा सवाल

खुशवंत सिंग यांच्या ‘ट्रेन टू पाकिस्तान’ या कादंबरीवर आधारित हे नाटक अमर साह यांनी दिग्दर्शित केले आहे आणि बेला थिएटर कारवान समूहाने या नाटकाचे सादरीकरण केले आहे.

नवी दिल्ली: घाईघाईने पडणारी पावले, प्रचंड गर्दी, गोंधळलेले चेहरे. आणि या गोंधळाच्या केंद्रस्थानी दोन स्त्रिया – एक सलवार कमीज घातलेली  आणि दुसरी हिजाब परिधान केलेली. भारतीय आणि पाकिस्तानी पुरुषांच्या नजरा त्यांच्या देहातून आरपार भेदून जात आहेत की काय असे वाटते. भूतकाळ आणि वर्तमानामधली रेषा पुसट होत जाते, आणि प्रेक्षकांना अचानक हे आपण अनेकदा यापूर्वीही पाहिले असल्याची जाणीव होते…

अंधुक प्रकाशाने उजळून निघालेले सभागृह उजळून निघते. आणि ‘ट्रेन टू पाकिस्तान’ हे नाटक प्रेक्षकांना 1947 मध्ये घेऊन जाते.

अमर साह दिग्दर्शित हे नाटक शनिवारी दिल्लीच्या लिटल थिएटर ग्रुप (LTG) ऑडिटोरियममध्ये बेला थिएटर कारवां ग्रुपने सादर केले. खुशवंत सिंग यांची ‘ट्रेन टू पाकिस्तान’ ही कादंबरी हिंदीत साकारणारा हा नाटयसमूह पहिलाच आहे. त्यांनी ते 2019 मध्ये  संसदेने नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर केल्याच्या अनुषंगाने सादर केले. “जेव्हा जेव्हा फाळणी होते तेव्हा लोकांना तेथून जाण्यास भाग पाडले जाते परंतु कोणीही त्यांची जमीन, पशुधन, सामूहिक इतिहास, त्यांच्या जमिनीचा गंध घेऊ शकत नाही…म्हणून आम्ही या नाटकाद्वारे त्या लोकांची मानसिक स्थिती दाखवली आहे,” अमर साह यांनी द प्रिंटला सांगितले. हे नाटक विस्थापन आणि फाळणीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक असहिष्णुतेचा प्रभाव या संकल्पनेवर प्रकाश टाकते.

पामेला रुक्सच्या ट्रेन टू पाकिस्तानच्या 1998 च्या सिनेमॅटिक रूपांतरामध्ये आंतरधर्मीय प्रणय, सांप्रदायिक तणाव आणि धार्मिक कट्टरता यांच्या बोल्ड चित्रणांनी सेन्सॉर बोर्ड आणि समीक्षकांचे लक्ष वेधले होते. चित्रपटावर सुरुवातीला आक्षेप घेतले गेले. यामुळे अशांतता निर्माण होण्याची शक्यता असल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब झाला. पण हिंसाचाराला न जुमानता हे नाटक जुग्गा आणि नूराच्या प्रेमकथेतून प्रेक्षकांच्या मनात एक आशा निर्माण करते.

एक गंभीर सामाजिक भाष्य

रंगमंचावर कथा जसजशी उलगडत गेली तसतसे प्रेक्षक कथनात खोलवर गुंतत  गेले. अभिनेत्यांनी राजकीय संस्कृतीवर प्रांजळपणे आणि नर्मविनोदी भाष्य केले आहे. इक्बालचे पात्र अतिशय आदर्शवादी आहे. त्याच्या नावाचा अर्थ पंजाबी भाषेत ‘सत्ता’ आहे.  तो ‘मनो माजरा’मध्ये येतो. गावात एक खून झाल्याचे कळल्यावर तो अस्वस्थ होऊन विचारतो, “मला पक्षाने कुठे पाठवले आहे? त्यांच्या मनात दुसरी जागा नव्हती का?”

पात्रांच्या आदर्शवादाचा चुराडा झालेला पाहून बसलेले प्रेक्षक किंचित हसतात. त्यांना रंगमंचावरील दृश्य आणि त्यावेळचे राजकारण यांच्यातील जवळचे साम्य आठवले.

“इकबाल राजकारणाचे प्रतिनिधित्व करतात,” साह म्हणाले. अमेरिकन सिव्हिल राइट्स मूव्हमेंटच्या राष्ट्रगीताचा संदर्भ असलेल्या “फोडा आणि राज्य करा” आणि “आम्ही मात करणार नाही, आम्ही मात करणार नाही… एखाद्या दिवशी” अशा संवादांद्वारे या गटाने राजकारण्यांच्या विभाजनवादी दृष्टिकोनाचे नाट्य उभे केले.

कालातीत सत्ये

एका दृश्यात गावकऱ्यांना ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याविषयी सांगितले जाते, मात्र त्याविषयी ते उदासीन दिसतात.“तुमच्यासारखे सुशिक्षित लोक इंग्रजांच्या ताब्यात गेल्यावर प्रशासकीय भूमिका पार पाडतील. प्रथम आपण ब्रिटिशांच्या ताब्यात होतो. आता आपण एका सुशिक्षित/उच्च दर्जाच्या हिंदुस्थानी किंवा पाकिस्तानी यांच्या दयेवर आहोत!” एक गावकरी म्हणतो.

त्यांच्या भावनांनी गेली अनेक दशके प्रतिनिधित होणारा एक सवाल उपस्थित होतो: स्वातंत्र्य कोणासाठी आणि कशासाठी?

हळुहळू रेल्वे इंजिनचा लयबद्ध आवाज कमीकमी होत जातो  आणि वेळ जणू जागीच गोठतो  कारण पाकिस्तानातून पळून जाणाऱ्या हिंदू आणि शीखांचे हत्याकांड झालेले मृतदेह ट्रेनच्या आत एकमेकांच्या वर पडलेले दिसतात. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पोलीस अधिकारी आपले नाक रुमालाने झाकून घेत तपासणी सुरू करतात. हे दृश्य म्हणजे  1947 च्या कामोके ट्रेन हत्याकांडाचा संदर्भ असलेले दृश्य आहे. या सादरीकरणाने प्रेक्षक प्रभावित झाले. अनेकांनी स्टँडिंग ओव्हेशन दिले आणि टाळ्यांचा कडकडाट होत असताना काहींनी दिग्दर्शक आणि अभिनेत्यांकडे धाव घेतली.

काही शीख प्रेक्षक सदस्य म्हणाले, “आमच्या आजोबांनी आम्हाला ही कथा सांगितली, आज आम्ही ती आमच्या डोळ्यांसमोर पाहिली.” हे नाटक म्हणजे केवळ सादरीकरण नव्हते तर दोन पिढ्यांमधला पूल होता, सामूहिक स्मरणात अजूनही कोरल्या गेलेल्या वेदनांची आठवण करून देताना.

फाळणीची भीषणता आजही अंगावर काटे आणतेच. धार्मिक असहिष्णुता, सांप्रदायिक हिंसाचार आणि उच्चभ्रू राजकीय उदासीनता वेळ आणि सीमा ओलांडूनही कायम आहे. अठ्ठ्याहत्तर वर्षांनंतर, खुशवंत सिंग यांच्या कादंबरीचे नाट्यरूपांतर आजही कालसुसंगतच आहे. इतिहासातील जखमा अजून भरलेल्या नाहीत याची हे नाटक प्रचीती देते.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments