scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरशहराच्या परिघावरआंध्रप्रदेशची नैसर्गिक शेतीतील यशोगाथा दाखवणारा माहितीपट प्रदर्शित

आंध्रप्रदेशची नैसर्गिक शेतीतील यशोगाथा दाखवणारा माहितीपट प्रदर्शित

रेणुका जॉर्जचा चित्रपट आंध्र प्रदेशातील नैसर्गिक शेती चळवळीचे नेतृत्व करणारे आयएएस अधिकारी टी विजय कुमार यांच्या व्यक्तिरेखेभोवती केंद्रित आहे.

नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातील 8 लाख शेतकऱ्यांसाठी शेण आणि कडुलिंबाच्या पानांसारख्या नैसर्गिक पदार्थांवर आधारित शेती ही एक वास्तविकता आहे. 2015 मध्ये राज्य सरकारने रासायनिक खतांचा वापर कमी करण्याच्या प्रयत्नातून सुरू केलेल्या पुढाकाराने प्रेरित होऊन, आंध्र प्रदेश नैसर्गिक शेतीमध्ये एक यशस्वी प्रयोग राबवत आहे. माहितीपट निर्मात्या रेणुका जॉर्ज यांनी त्यांच्या 55 ​​मिनिटांच्या ‘इंडियन सॉइल इन रिव्होल्यूशन’ या चित्रपटाद्वारे जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

“मी पहिल्यांदाच भारतात माझा चित्रपट प्रदर्शित करत आहे – जिथे तो प्रत्यक्षात घडतो,” असे जॉर्ज यांनी नवी दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सांगितले. त्यांचा 2023 चा चित्रपट एका फ्रेंच एजन्सीने तयार केला होता आणि आतापर्यंत त्यांनी तो फ्रान्स आणि युरोपमध्ये काही वेळाच प्रदर्शित केला आहे. जॉर्ज यांचा चित्रपट आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी, कृष्णा आणि पूर्व गोदावरी जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक शेती उपक्रमाइतकाच यशस्वी ठरला. तो राज्यातील नैसर्गिक शेती चळवळीचे नेतृत्व करणारे आयएएस अधिकारी टी विजय कुमार यांच्या व्यक्तिरेखेभोवती केंद्रित आहे. आणि तो कुमार यांची अग्रगण्य योजना कोणत्या परिस्थितीत घडली याचा आढावा घेतो.  देशभरातील शेतकरी, विशेषतः दख्खनच्या पठारावरील शेतकरी – महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सारखी राज्ये – महागड्या आणि रासायनिक-केंद्रित शेती,कमी उत्पादन आणि परिणामी पर्यावरण प्रदूषणाखाली दबून जात होती.

चित्रपटात दाखवल्याप्रमाणे कुमार यांची रणनीती म्हणजे शेतकऱ्यांना रासायनिक खते सोडून देशी गायीचे शेण किंवा जीवमित्रम निवडण्यास उद्युक्त करणे. त्यांनी गोमूत्र, कडुलिंबाची पाने आणि पाण्याचे मिश्रण कीटकनाशक म्हणून वापरण्यासही सुचवले. कुमार यांनी सुचवलेले नैसर्गिक शेती तंत्र 1990 च्या दशकाच्या मध्यात सुभाष पालेकर यांनी सुरू केले. आंध्र प्रदेशातील सरकारने शेतकऱ्यांशी बोलण्यासाठी आणि त्यांना नैसर्गिक शेती स्वीकारण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांपैकी ते एक होते. “पालेकरांना मिळालेला प्रतिसाद जबरदस्त होता – राज्यभरातील हजारो शेतकरी शांतपणे बसून नोंदी घेत होते आणि पालेकरांना प्रश्न विचारत होते,” असे कुमार चित्रपटात म्हणतात.   “तेव्हा आम्हाला कळले की जास्त खात्री पटवून देण्याची गरज नाही – शेतकरी स्वतः या क्रांतीचा भाग होऊ इच्छितात.”

“हा प्रवास सोपा नव्हता”

जॉर्ज म्हणाल्या, “चित्रपटाबद्दल तुमचे प्रश्न ऐकायला  मला आवडेल पण मला वाटते की माझ्यापेक्षा याची उत्तरे दुसरे कोणीतरी अधिक समर्पकपणे देऊ शकेल”. त्या म्हणाल्या की टी विजय कुमार स्वतः प्रेक्षकांशी बोलण्यासाठी ऑनलाइन येणार आहेत. त्यानंतर एक प्रश्नोत्तर सत्र झाले. कुमार यांनी देशी गायीच्या शेणाच्या उपलब्धतेपासून ते सरकारच्या यशस्वी योजनेमागील रहस्यापर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.

“प्रामाणिकपणे महिला शेतकऱ्यांशिवाय हे शक्य झाले नसते – त्यांनी बचत गट तयार केले, ते जीवमित्रम आणि नैसर्गिक कीटकनाशके बनवत असत आणि त्यांच्या पतींना ते वापरण्यास भाग पाडत असत,” असे कुमार यांनी स्पष्ट केले, जे सध्या शेतकरी सक्षमीकरणासाठी आंध्र प्रदेश सरकारच्या महामंडळाच्या रायथू साधीकारी संस्थेचे अध्यक्ष आहेत.

महिला या योजनेसाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या कारण त्या त्यांच्या कुटुंबांच्या “आरोग्यरक्षक” होत्या, असे कुमार म्हणाले. त्यांना पारंपारिक खतांचा वापर करून पिकवले जाणारे अन्न आणि नैसर्गिक खते वापरणारे अन्न यातील फरक माहित होता. परंतु कुमार यांच्या टीमसाठी ते सर्व काही आनंददायी आणि सोपे नव्हते.”आम्ही शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन देत नाही आहोत – आम्ही फक्त त्यांना एक सुरक्षित, सोपा पर्याय देत आहोत आणि तो निवडण्यास सांगत आहोत,पण अनेकांसाठी, संक्रमण स्वतः करणे सोपे नव्हते.” ते म्हणाले.

चित्रपटात दाखवण्यात आले आहे की 1960 आणि 1970 च्या दशकात हरित क्रांतीच्या सुरुवातीच्या लाभार्थ्यांपैकी एक असलेल्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील शेतकरी त्यांचे कृत्रिम खत सोडण्यास विरोध करत होते. त्यांच्यापैकी अनेकांसाठी, याचा अर्थ त्यांच्या पिकाचे नुकसान होते – एक धोका जोखीम जोखमीचा वाटत नव्हता. पण कुमार यांनी त्यांना आश्वासन दिले की, सुरुवातीच्या काही महिन्यांत माती नैसर्गिक खतांशी जुळवून घेतल्याने कमी पीक येईल, परंतु ते त्यांचे मूळ उत्पन्न काही वेळातच घेऊ शकतील. “याला क्रांती म्हणता येईल पण ही जगातील सर्वात नैसर्गिक प्रक्रिया आहे – आम्ही मातीला तिच्या मूळ स्वरूपात परत करत आहोत आणि निसर्गाला तिचा मार्ग स्वीकारू देत आहोत,” ते म्हणाले.

 

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments