युक्रेनने आपल्या सहा नागरिकांच्या अटकेप्रकरणी भारताकडे औपचारिक निषेध नोंदवला असून, त्यांच्या सुटकेची आणि निर्बंधमुक्त राजनैतिक संपर्काची मागणी केली आहे.
मंगळवारी काबुलमधील अमली पदार्थ व्यसनमुक्ती केंद्रावर (रुग्णालयावर) पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा भारताने तीव्र शब्दांत निषेध केला. या हल्ल्यात 400 लोकांचा मृत्यू झाला असून 250 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनी सोमवारी सांगितले, की त्यांचा देश 'शाश्वत युद्धाची' तयारी करत आहे आणि इराणसोबत सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी किती वेळ लागेल हे ते निश्चितपणे सांगू शकत नाहीत.
वाढत्या भू-राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे कॅनेडियन समकक्ष मार्क कार्नी यांनी संबंध पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भारत आणि कॅनडाने सोमवारी दहशतवाद, अतिरेकी विचारसरणी आणि कट्टरतावादाविरुद्धच्या लढाईत सहकार्य करण्यास सहमती दर्शविली.
दहशतवादाच्या प्रश्नावर पोलंड भारताच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे, असे भारतातील पोलंडचे राजदूत पिओटर अँटोनी स्विताल्स्की यांनी बुधवारी नवी दिल्लीत 'द प्रिंट'शी झालेल्या विशेष संवादात सांगितले. गेल्यावर्षी पाकिस्तानमध्ये दहशतवादी पायाभूत सुविधांविरुद्ध 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान भारतीय सैन्याने पोलिश ड्रोनचा वापर केला होता, हेदेखील अधोरेखित केले.
पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत भेटीपूर्वी राजनैतिक पुनर्रचना करताना कॅनडाने म्हटले आहे, की 'नवी दिल्ली आता कॅनडाच्या भूमीवर गुन्ह्यांना प्रोत्साहन देण्यात सहभागी नाही'. कॅनडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी ओटावा येथे पत्रकारांना माहिती देताना हा मुद्दा स्पष्ट केला. ज
शीख फुटीरतावादी हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येच्या चौकशीत भारत कॅनेडियन अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहे, असे कॅनडातील भारतीय उच्चायुक्त दिनेश के. पटनायक यांनी सोमवारी 'द प्रिंट'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारत आणि फ्रान्समधील संबंधांना 'विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी म्हणून घोषित केले. 'आजच्या अनिश्चित जगात हे संबंध जागतिक स्थिरतेसाठी एक शक्ती'आहेत हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
बांगलादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांच्या शपथविधी सोहळ्याला आज, मंगळवारी भारत सरकारच्या वतीने लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच दिवशी मुंबईत इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी आधीच ठरलेल्या भेटीमुळे उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी गुरुवारी झालेल्या निवडणुका रद्द करण्याचे आवाहन केले आणि या संपूर्ण प्रक्रियेला मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी घडवलेले 'नाट्य' व 'असंवैधानिक ढोंग' असल्याचे म्हटले आहे.
भारत आणि सेशेल्स यांच्यातील सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने, भारताने आज, सोमवारी सेशेल्ससाठी 175 दशलक्ष डॉलर्सच्या विशेष आर्थिक 'पॅकेज'ची घोषणा केली. या प्रदेशात चीनसोबतच्या प्रभावाच्या स्पर्धेत असताना, भारताने पश्चिम हिंदी महासागरात सहकार्य वाढवण्याचा आपला उद्देश स्पष्ट केला आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल दोन दिवसीय ओट्टावा दौऱ्यावर होते. त्यादरम्यान भारत आणि कॅनडाने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्क आणि फेंटॅनाइलसारख्या अंमली पदार्थांच्या पूर्वगामी घटकांच्या अवैध प्रवाहाशी संबंधित मुद्द्यांवर माहितीची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी 'सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी संपर्क अधिकारी' नियुक्त करण्यास रविवारी सहमती दर्शवली.