scorecardresearch
Wednesday, 24 December, 2025
घरराजनैतिक

राजनैतिक

न्यूयॉर्क महापौरपदाच्या शर्यतीत जोहरान ममदानींच्या विजयाची शक्यता

डेमोक्रॅट जोहरान ममदानी यांच्या महापौरपदाच्या उत्साही प्रचार- मोहिमेत न्यूयॉर्कमधील नागरिकांनी गेल्या निवडणुकीपेक्षा चार पट जास्त मतदान केले. न्यूयॉर्क शहरातील मतदान मंगळवारी होणार आहे. या बाह्य वार्षिक निवडणुकीकडे संपूर्ण अमेरिका आणि जगभराचे लक्ष आहे.

अमेरिका-चीनमध्ये दुर्मिळ खनिज घटकांच्या निर्यातीबाबत एकमत

अमेरिका आणि चीनमध्ये दुर्मिळ खनिजांची निर्यात आणि बीजिंगकडून अमेरिकन कृषी उत्पादनांची खरेदी यासह अनेक मुद्द्यांवर एकमत झाले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या व्यापार युद्धाची तीव्रता टाळता येईल. गुरुवारी दक्षिण कोरियाच्या बुसान शहरात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या बैठकीत हा करार झाला.

‘जर्मनी भारतासोबत आधुनिक संरक्षण प्रणाली विकसित करणार’: फिलिप अकरमन

मंगळवारी नवी दिल्ली येथे झालेल्या इंडो-पॅसिफिक प्रादेशिक संवाद 2025 मध्ये, जर्मनीचे भारतातील राजदूत फिलिप अकरमन यांनी सांगितले की, "आधुनिक संरक्षण प्रणाली, प्रशिक्षण किंवा लॉजिस्टिक्सच्या विकासात, भारतासोबत नवीन पायाभरणी करण्यासाठी आमचा देश पूर्वीपेक्षा अधिक सज्ज आहे".

“भारत-रशियामध्ये मजबूत संरक्षण संबंध”: डेनिस अलिपोव्ह

डिसेंबरमध्ये होणाऱ्या रशियाच्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीसाठी पायाभरणी करताना, रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी संकेत दिले आहेत, की ही भेट द्विपक्षीय संबंधांसाठी, विशेषतः संरक्षण आणि धोरणात्मक क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

‘अनिश्चित काळात आसियान-भारत संबंध जागतिक स्थैर्याचा पाया’: पंतप्रधान

"भारत-आसियान भागीदारी ही जागतिक स्थैर्य आणि विकासासाठीचा एक शक्तिशाली पाया आहे", असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जाहीर केले. जागतिक स्तरावर या अनिश्चित काळातही हे संबंध स्थिर प्रगती करत राहिले आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले.

अमेरिकेकडून रोझनेफ्ट आणि ल्युकोइल तेल कंपन्यांवर निर्बंध

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बुधवारी रशियावर निर्बंधांचा पहिला टप्पा जारी केला आहे. या जानेवारीत व्हाईट हाऊसमध्ये दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या प्रशासनाने रशियावर निर्बंध जाहीर केले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसियान शिखर परिषदेला दूरस्थ पद्धतीने राहणार उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या 22 व्या आसियान-भारत शिखर परिषदेला व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहणार आहेत आणि ते क्वालालंपूरला जाणार नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मलेशियाला जाणार आहेत.

रशियाकडून तेल-खरेदी थांबवण्याचे मोदींनी आश्वासन दिल्याचा ट्रम्प यांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचे आश्वासन दिल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्यानंतर भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे, की त्यांचे ऊर्जा आयातीचे निर्णय केवळ राष्ट्रीय हितांनुसार घेतले जातात.

व्यापार दृढ करण्यासाठी भारत-ब्राझील संयुक्त घोषणापत्र जाहीर

नवी दिल्ली आणि मर्कोसुर गटामधील व्यापार करार दृढ करण्यासाठी भारत आणि ब्राझीलने गुरुवारी एक संयुक्त घोषणापत्र जारी केले. याचे उद्दिष्ट लॉन्च झाल्यानंतर एका वर्षाच्या आत वाटाघाटी पूर्ण करणे आहे.

मंगोलियन खनिजवाहतुकीसाठी भारत रशियाशी वाटाघाटी करणार

भारताने मंगळवारी उलानबातर येथील आपल्या दूतावासात संरक्षण सहचारी नियुक्तीची घोषणा केली, तसेच पूर्व आशियातील भूपरिवेष्टित देश मंगोलिया आणि रशिया या दोन्ही देशांशी खनिजांच्या वाहतुकीसाठी वाटाघाटी करण्याचा विचार भारत करत आहे. “आमचे संरक्षण आणि सुरक्षा सहकार्यदेखील सातत्याने बळकट होत आहे.

58 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचा अफगाणिस्तानचा दावा

राजधानी काबूलसह अनेक अफगाण प्रांतांवर पाकिस्तानी हवाई हल्ल्यांनंतर शनिवारी रात्री उशिरा सीमापार झालेल्या चकमकीत त्यांच्या सैन्याने किमान 58 पाकिस्तानी सैनिकांना ठार मारल्याचे अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने म्हटले आहे.

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद येणार भारत दौऱ्यावर

कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद आज, सोमवारी भारत दौऱ्यावर येणार असून, त्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतील.