scorecardresearch
Wednesday, 1 April, 2026
घरदेश

देश

अजित लाल यांची गृहमंत्रालयाचे ईशान्य प्रांतासाठीचे सल्लागार म्हणून नियुक्ती

1974 च्या बॅचचे हिमाचल प्रदेश कॅडरचे अधिकारी असलेले निवृत्त आयपीएस अधिकारी अजित लाल हे गृहमंत्रालयाचे ईशान्य प्रांतासाठीचे सल्लागार म्हणून पदभार स्वीकारतील. ए.के. मिश्रा यांचा कार्यकाळ गेल्या आठवड्यात संपला होता, असे दोन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी 'द प्रिंट'ला सांगितले.

दहशतवादी संशयिताची फरिदाबाद तुरुंगात सहकैद्याकडून हत्या

गेल्यावर्षी ग्रेनेडसह अटक करण्यात आलेल्या एका दहशतवादी संशयिताची 8 आणि 9 फेब्रुवारीच्या मध्यरात्री फरिदाबाद जिल्हा कारागृहात त्याच्याच कोठडीतील साथीदाराने हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गाझियाबादमध्ये तीन बहिणींची आत्महत्या, गेमिंगच्या व्यसनाची चौकशी सुरू

उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथे तीन अल्पवयीन मुलींनी एका निवासी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या पालकांनी त्यांना ऑनलाइन गेम्स खेळण्यापासून रोखल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे.

मणिपूरमध्ये सरकारस्थापनेच्या चर्चेसाठी मणिपूर एनडीए आमदारांना दिल्लीस पाचारण

मणिपूर विधानसभेत भाजपचे बहुमत आहे. गेल्या काही महिन्यांपासून पक्षाच्या आमदारांसोबतच, मित्रपक्ष एनपीपी आणि एनपीएफच्या नेत्यांसोबतही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अनेक बैठका घेतल्या आहेत.

‘पाणी, ब्लँकेट घेऊन धावलो, पण कोणीच वाचले नव्हते’: बारामती स्थानिक रहिवाशांची साक्ष

अपघाताच्या ठिकाणाजवळ राहणाऱ्या कमला कैलाश अटले सांगतात, “आम्ही आमची कामे करत असताना आम्हाला एक मोठा आवाज ऐकू आला. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा आम्हाला माहीत नव्हते, की दादा (अजित पवार) त्यांच्यामध्ये होते.”

“चांगला मित्र, महान नेता गमावला”: मुख्यमंत्र्यांकडून अजित पवार यांना श्रद्धांजली

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली म्हणून  राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला. त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख 'चांगला मित्र' आणि 'जनतेचा महान नेता' असा केला.

बारामती विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) आज सकाळी झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.

अभिनेता-राजकारणी विजय यांच्या टीव्हीके पक्षासाठी ‘शिट्टी’ चिन्ह

भारतीय निवडणूक आयोगाने गुरुवारी अभिनेता-राजकारणी विजय यांच्या 'तामिळगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाला अधिकृत निवडणूक चिन्ह म्हणून 'शिट्टी' चिन्हाचे वाटप केले आहे.

राष्ट्रविरोधी, धर्मविरोधी ऑनलाइन मजकुराविरुद्ध हरियाणा पोलिसांची कारवाई

हरियाणा पोलिसांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवरील 'आक्षेपार्ह, राष्ट्रविरोधी, धर्मविरोधी आणि दिशाभूल करणारी माहिती लक्ष्य करून एका महिन्याच्या मोहिमेत 583 सोशल मीडिया पोस्ट आणि प्रोफाइल्स हटवली आहेत.

ट्रम्प यांच्या गाझासाठीच्या शांतता समितीतील सहभागासाठी भारताला निमंत्रण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राद्वारे, गाझामधील शांतता आणि पुनर्रचना यांवर देखरेख ठेवण्यासाठी अमेरिकेने स्थापन केलेल्या 'बोर्ड ऑफ पीस' या संस्थेमध्ये सामील होण्यासाठी भारताला आमंत्रित केले आहे.

आग्रामध्ये बेकायदेशीरपणे राहणारे 38 बांगलादेशी नागरिक हद्दपार होणार

बनावट कागदपत्रांचा वापर करून आग्रा येथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 38 बांगलादेशी नागरिकांना तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा आणि परकीय नागरिक कायद्यांतर्गत अटकेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर 13 जानेवारी रोजी हद्दपार केले जाईल.

बांगलादेश व पाकिस्तानकडून संरक्षणखरेदीच्या क्षेत्रात संबंध विस्तारण्याचे प्रयत्न

बांगलादेश आपल्या जुन्या हवाई दलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहे आणि आता तो पाकिस्तानकडे अपेक्षेने पाहत आहे.