भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची तामिळनाडूसाठी नवीन निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन आगामी 2026 च्या विधानसभा निवडणुकीसाठी एनडीए आघाडीत एआयएडीएमकेकडून मागितल्या जाणाऱ्या जागांच्या जिंकण्याची शक्यता तपासण्यासाठी मतदारसंघनिहाय मूल्यांकनासह दिल्लीत तळ ठोकून आहेत.
महाराष्ट्रातील बहुप्रतिक्षित महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर झाल्या असून, सर्व 29 महानगरपालिकांमध्ये 15 जानेवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल आणि मतमोजणी दुसऱ्या दिवशी, 16 जानेवारी रोजी होईल.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी रविवारी सांगितले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सत्ता गेल्यावर त्यांचा तोरा नाहीसा होईल आणि अखेरीस सत्यासमोर त्यांचा पराभव होईल. यासाठी वेळ लागला, तरीही हे घडेल." असे ते म्हणाले.
भारतीय जनता पक्षाने (भाजप) बिहारचे मंत्री नितीन नवीन यांची पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशात म्हटले आहे की, या नियुक्तीला पक्षाच्या संसदीय मंडळाने मंजुरी दिली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी बुधवारी राज्यसभेत 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान, तुष्टीकरणाच्या आरोपांना उत्तर देताना भारतीय जनता पक्षाच्या स्वतःच्या इतिहासावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, "जेव्हा भाजपचे तत्कालीन नेते ब्रिटिशांसोबत काम करण्यास तयार होते, तेव्हा भाजप देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्यांचा अपमान करत आहे.
"देशासाठी प्राण देणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे प्रतिबिंब आहे, देशाला समृद्धीच्या सर्वोच्च शिखरावर नेणे ही संघाची विचारसरणी आहे आणि देशाच्या परंपरांचे जतन करणे हेच संघाचे ध्येय आहे, असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या चालू हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारच्या प्रमुख 'लाडकी बहीण' योजनेबद्दल अनेक आमदारांनी प्रश्न उपस्थित केले आणि टिप्पण्या केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी या टीकेला प्रत्युत्तर दिले.
'लवकरच केल्या जाणाऱ्या जनगणनेत, प्रत्येकाने आपला धर्म हिंदू असा लिहावा', असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी 'द प्रिंट'ला सांगितले, "या आवाहनामागे एक विशिष्ट संदर्भ आहे, की प्रत्येकाने आपल्याला हिंदू म्हणून ओळखावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संसद सदस्यांना (खासदारांना) 'लोकांना भेडसावणाऱ्या खऱ्या समस्या' आपल्यापुढे मांडण्याचे आवाहन केले. त्यांनी असेही म्हटले आहे की, कोणत्याही कायद्यामुळे किंवा नियमामुळे लोकांना छळ किंवा 'गैरसोय' सहन करावी लागू नये, कारण सर्व उपाययोजना लोकांच्या सोयीसाठीच आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभेतील 'वंदे मातरम्'वरील भाषणावरून तृणमूल काँग्रेसने पंतप्रधानांवर टीका केली आहे. "पंतप्रधानांनी राष्ट्रगीत लिहिणारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा उल्लेख 'बंकिम दा' असा केला, जो 'साहित्यिक प्रतिमेचा अनादर करणारा' आणि 'सांस्कृतिकदृष्ट्या असंवेदनशील' होता" अशी प्रतिक्रिया पक्षाने दिली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या पराभवानंतर तीन आठवड्यांच्या आतच राज्यातील काँग्रेस-राजद युती पूर्णपणे मोडकळीस आली आहे. दोन्ही पक्षांमधील वरिष्ठ नेते पराभवासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
भारतीय जनता पक्षाने मंगळवारी संचार साथी सायबरसुरक्षा अॅपबद्दल विरोधी पक्षांचा 'हेरगिरी'चा दावा फेटाळून लावला. सरकारची सर्व नवीन स्मार्टफोन्सवर हे अॅप प्री-इंस्टॉल करण्याची योजना आहे.