scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरजग

जग

मुदासिर अहमद शेख यांच्या आईला स्वदेशी परत जाण्याची गरज नाही : जम्मू-काश्मीर पोलीस

बारामुल्ला जिल्हा प्रशासनाने शौर्य चक्र पुरस्कार विजेते जम्मू आणि काश्मीर पोलिस कर्मचारी मुदासिर अहमद शेख यांच्या आईला पाठवलेली परत पाठवण्याची नोटीस चुकून पाठवण्यात आली होती, असे त्यांचे धाकटे पुत्र बासित मकसूद म्हणाले.

तहव्वूर राणाला ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेचे पथक अमेरिकेत दाखल

26/11 च्या घटनेनंतर 16 वर्षांहून अधिक काळानंतर तहव्वुर राणा याला ताब्यात घेण्यासाठी एनआयए अमेरिकेत पोहोचले आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी त्याच्या प्रत्यार्पणाची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर लवकरच राणाला एका विशेष विमानाने भारतात आणले जाणार आहे, असे कळते.

पाकिस्तान ट्रेन अपहरण: बचाव मोहीम यशस्वी झाल्याचा लष्कराचा दावा

पाकिस्तानी सैन्याच्या घोषणेपूर्वी, बीएलएने बुधवारी संध्याकाळी 50 प्रवाशांना मारल्याचा दावा केला होता. त्यांनी आधी सांगितले होते की त्यांच्याकडे 214 लोक आहेत, ज्यात बहुतेक सुरक्षा कर्मचारी आहेत.

बलुच फुटीरतावाद्यांकडून एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण, 16 अतिरेकी ठार

इतर अतिरेक्यांनी काही प्रवाशांना डोंगरात नेल्याचे सांगितले जाते. बलुच लिबरेशन आर्मीने जाफर एक्सप्रेसच्या अपहरणाची जबाबदारी घेतली आहे.

फरार लोकांना नागरिकत्व ‘विकत’ देणारी सोनेरी पासपोर्टसची भूमी : वानुआतू

सोनेरी पासपोर्टची भूमी असलेला वानुआतू - जिथे ललित मोदीसारखे फरार लोक एक कोटी रुपयांना नागरिकत्व खरेदी करू शकतात. 2020 मध्ये, त्यांच्या 'गोल्डन पासपोर्ट' योजनेतून मिळणारे उत्पन्न हा वानुआतूचा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत होता. ललित मोदीचे नागरिकत्व रद्द केल्याने हा देश प्रकाशझोतात आला आहे.

वानुआतूकडून ललित मोदीचे नागरिकत्व रद्द

परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, फरार उद्योगपती आणि माजी आयपीएल प्रमुख ललित मोदीने वानुआतूचे नागरिकत्व घेतल्यानंतर त्याचा भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज केला होता.

काबूल विमानतळ हल्ल्यातील आयसिस सदस्याला पकडण्यास पाकिस्तानची मदत, ट्रम्प यांचा खुलासा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी काँग्रेसला दिलेल्या भाषणात हा खुलासा केला. फेब्रुवारीच्या अखेरीस अफगाण सीमेजवळ पाकिस्तानमध्ये मुहम्मद शरीफुल्लाहला अटक करण्यात आली.

बलुच फुटीरतावादी गटांकडून संयुक्त लष्करी कमांडची घोषणा

बलुच आणि सिंधी फुटीरतावादी गटांमध्ये या प्रदेशातील लष्करी आणि राजनैतिक रणनीतींमध्ये संपूर्ण फेरबदल करण्याबाबत झालेल्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर बलुच राजी आजोई संगर यांनी ही घोषणा केली.

64% अमेरिकन अजूनही ख्रिश्चन, 70% लोकांचा मृत्युपश्चात जीवनावर विश्वास: ‘प्यू’चे सर्वेक्षण

79% अमेरिकन लोक नैसर्गिक जगाच्या पलीकडे असलेल्या आध्यात्मिक शक्तीवर विश्वास ठेवतात, तर फक्त 33% लोक दरमहा धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहतात. 2007 पासून दररोजच्या प्रार्थनेत घट झाली आहे, असे प्यूच्या बुधवारी प्रकाशित झालेल्या अभ्यासात म्हटले आहे.

बांगलादेश लष्करप्रमुखांचा अंतर्गत कलहांबाबत इशारा, वर्षअखेरीस निवडणुका घेण्याचे आवाहन

जनरल वकेर-उझ-जमान हे लष्कराच्या स्मारक कार्यक्रमात बोलत होते. देशात हिंसाचार घडवून आणल्याबद्दल बीएनपी आणि जमातच्या विद्यार्थी संघटनांनी एकमेकांना दोषी ठरवल्यानंतर हे घडले.

‘पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत लष्करी अधिकाऱ्यांची वाढती भूमिका चिंतेची बाब’

36 लष्करी अधिकारी आर्थिक सुधारणांसाठी एक संघीय संस्था असलेल्या विशेष गुंतवणूक सुविधा परिषदेचा (SIFC) भाग आहेत. हे अधिकारी त्यांचे वेतन संरक्षण बजेटमधून घेतात.

‘मार्क झुकरबर्गलाही पाकिस्तानवरून उड्डाणाची भीतीच’

जेव्हा मार्क झुकरबर्गसारखा अब्जाधीश देखील पाकिस्तानच्या ईशनिंदेच्या उन्मादाला धोका म्हणून मान्य करतो, तेव्हा सामान्य पाकिस्तानी लोक किती भीतीखाली जगतात याची कल्पना करा,’ असे एका पाकिस्तानी व्यक्तीने एक्सवर म्हटले आहे.