नवी दिल्ली: भारतीय नौदलाची पाणबुडी आणि मासेमारी जहाजाची गोव्याच्या वायव्येस सुमारे 70 नॉटिकल मैलांवर धडक झाली आणि दोन बेपत्ता मच्छिमारांना शोधण्यासाठी बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. संरक्षण सूत्रांनी ‘द प्रिंट’ला दिलेल्या माहितीनुसार पाणबुडी दोन बंदरांच्या मधील मार्गातून प्रवास करत असताना असताना गुरुवारी रात्री 9.30 च्या सुमारास मासेमारी जहाजावर एकमेकांवर आदळली.
रात्री उशिरा दिलेल्या निवेदनात नौदलाने सांगितले की, 13 जणांसह जाणारे भारतीय मासेमारी जहाज मार्थोमा, गोव्याच्या वायव्येस 70 एनएम अंतरावर त्याची भारतीय नौदल युनिटशी टक्कर झाली. नौदलाने तातडीने सहा जहाजे आणि विमानांसह शोध आणि बचाव कार्य सुरू केले. त्यातील अकरा जणांची सुटका करण्यात आली.
इतर दोघांसाठी शोध मोहीम सुरूच असून, मुंबईतील सागरी बचाव समन्वय केंद्राशी समन्वय साधला जात आहे. प्रयत्नांना चालना देण्यासाठी अतिरिक्त सामग्री अपघातक्षेत्राकडे पाठवण्यात आली आहे.
सूत्रांनी सांगितले की अपघाताची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही, परंतु असे दिसते आहे की जहाज पुढे जात असल्याने त्याचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. त्यांनी सांगितले की नौदल मुख्यालय नुकसान आणि टक्करमागील कारणांचे मूल्यांकन करण्यासाठी पाणबुडी त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्याची वाट पाहत आहे.
Recent Comments