नवी दिल्ली: पूरग्रस्त श्रीलंकेला पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेल्या अन्नाच्या पॅकेटसची मुदत संपलेली आढळून आली. त्यामुळे पाकिस्तानच्या मदतीच्या राजनैतिक प्रयत्नांना धक्का बसला. चक्रीवादळ दितवामुळे भूस्खलन आणि पुरामुळे होरपळणाऱ्या देशाला मदत करण्यासाठी हे अन्न पाठवण्यात आले होते. पाकिस्तान उच्चायुक्तालयाने मदत कार्याचे कौतुक करणारी एक एक्स पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये लिहिले होते: ” श्रीलंकेत नुकत्याच आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या आपल्या बंधू आणि भगिनींना मदत करण्यासाठी पाकिस्तानकडून मदत पॅकेज यशस्वीरित्या वितरित करण्यात आले आहेत, जे आमच्या अढळ एकतेचे प्रतीक आहे.” मात्र आता ती पोस्ट आता हटवण्यात आली आहे.
या पॅकेजची मुदत 2024 सालीच संपलेली आढळून आली. मदत साहित्यात औषधे आणि इतर उपचार साहित्य होते. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या कृत्यास ‘संवेदनशीलतेचा अभाव’ असे म्हटले, तर काहींनी असे निदर्शनास आणून दिले. की याधीही असे घडले आहे. 2015 मध्ये, हिंदूबहुल राष्ट्र असलेल्या नेपाळला गोमांस असलेले जेवण पाठवल्याबद्दल पाकिस्तानवर टीका झाली होती. पाकिस्तानने रविवारी जाहीर केले, की त्यांच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 100 टन आवश्यक पूर मदत साहित्य आणि पाकिस्तानी लष्कराचे शहरी शोध आणि बचाव पथक श्रीलंकेला पाठवले आहे. राज्य प्रसारक रेडिओ पाकिस्तानच्या मते, पाकिस्तान नौदलाच्या जहाज सैफने श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांना मदत साहित्य पुरवले.दोन्ही देशांनी अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.
दरम्यान, श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी ‘आमच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि सर्वात आव्हानात्मक नैसर्गिक आपत्ती’ म्हणून दितवा चक्रीवादळाचे वर्णन केले आहे. यामध्ये मृत पावलेल्या लोकांची संख्या 350 पेक्षा जास्त झाली आहे.

Recent Comments