scorecardresearch
Wednesday, 1 April, 2026
घरराजनैतिकभारत- कॅनडामध्ये दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सहकार्यास सहमती

भारत- कॅनडामध्ये दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सहकार्यास सहमती

वाढत्या भू-राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे कॅनेडियन समकक्ष मार्क कार्नी यांनी संबंध पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भारत आणि कॅनडाने सोमवारी दहशतवाद, अतिरेकी विचारसरणी आणि कट्टरतावादाविरुद्धच्या लढाईत सहकार्य करण्यास सहमती दर्शविली.

नवी दिल्ली: वाढत्या भू-राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे कॅनेडियन समकक्ष मार्क कार्नी यांनी संबंध पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भारत आणि कॅनडाने सोमवारी दहशतवाद, अतिरेकी विचारसरणी आणि कट्टरतावादाविरुद्धच्या लढाईत सहकार्य करण्यास सहमती दर्शविली. “आम्ही सहमत आहोत की दहशतवाद, अतिरेकीपणा आणि कट्टरतावाद ही केवळ दोन्ही देशांसाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेसाठी सामायिक आणि गंभीर आव्हाने आहेत. त्यांच्याविरुद्ध आमचे सहकार्य जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी महत्त्वाचे आहे,” असे मोदींनी दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत म्हटले.

आठ वर्षांत द्विपक्षीय भारत दौऱ्यावर येणारे कार्नी हे पहिले कॅनेडियन पंतप्रधान आहेत. नवी दिल्लीने आपल्या कारभारात हस्तक्षेप केल्याच्या ओटावाच्या आरोपांनंतर जवळजवळ तीन वर्षांपूर्वी दोन्ही देशांमधील संबंध तुटले. कॅनेडियन प्रशासनाने शीख फुटीरतावाद्यांना दिलेली जागा हा मुद्दा भारताने सातत्याने उपस्थित केला आहे, ही बाब तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सप्टेंबर 2023 मध्ये सर्वोच्च पातळीवर सार्वजनिकरित्या उपस्थित केली होती. ट्रूडो यांनी ब्रिटिश कोलंबियातील सरे येथे हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येशी भारतीय एजंटांचा संबंध असल्याचा आरोप केला. जून 2023 मध्ये भारताने घोषित केलेला दहशतवादी निज्जर एका गुरुद्वाराबाहेर मारला गेला. भारताने हे आरोप फेटाळून लावले. “हे केवळ भागीदारीचे नूतनीकरण नाही, तर दोन आत्मविश्वासपूर्ण देशांमधील संबंधांचा विस्तार आहे जे आपले भविष्य एकत्रितपणे घडवतात. दोघांनाही माहिती आहे, की जुन्या आठवणी ही एक रणनीती नाही. या नवीन क्षेत्रात यशस्वी होणारे लोक आपल्या सर्व नागरिकांसाठी अधिक समावेशक आणि शाश्वत भविष्य निर्माण करण्याचा आत्मविश्वास असलेले असतील,” असे  यांनी सोमवारी आपल्या निवेदनात म्हटले आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी मुंबई आणि नवी दिल्लीच्या चार दिवसांच्या दौऱ्यात भारतीय अधिकाऱ्यांकडून परकीय हस्तक्षेप किंवा आंतरराष्ट्रीय दडपशाहीचा कोणताही उल्लेख केला नाही.

यावर्षाच्या अखेरीस व्यापक आर्थिक करारासाठी (सीईपीए) वाटाघाटी पूर्ण करणे आणि महत्त्वपूर्ण खनिजे आणि अक्षय ऊर्जा सहकार्य यासारख्या क्षेत्रात सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करणे, यासह महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित करण्यास दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शविली. मोदी आणि कार्नी यांनी 2030 पर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार दुप्पट करून 50 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे मान्य केले. भारत आणि कॅनडामधील वस्तू आणि सेवांमध्ये एकूण व्यापार सध्या 30.8 अब्ज डॉलर्स आहे. कॅनेडियन निर्यातदार त्यांच्या माल निर्यातीसाठी अमेरिकन बाजारपेठांवर अवलंबून आहेत. ओटावाच्या जवळजवळ दोन तृतीयांश निर्याती अमेरिकन बाजारपेठेत होतात. कार्नी यांनी नवीन बाजारपेठा शोधून कॅनडाचे अमेरिकेवरील आर्थिक अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी या वर्षाच्या सुरुवातीला चीनला भेट दिली.

भारतात, कॅनडाला एक धोरणात्मक भागीदारी अपेक्षित आहे, दोन्ही बाजूंनी सोमवारी संरक्षणसंवाद स्थापन केला आहे. दोन्ही देशांनी 2.6 अब्ज डॉलर्स किमतीच्या युरेनियम सांद्रतेच्या दीर्घकालीन पुरवठा कराराची घोषणादेखील केली. “नागरी अणुऊर्जेमध्ये, आम्ही दीर्घकालीन युरेनियम पुरवठ्यासाठी एक महत्त्वाचा करार केला आहे. आम्ही लहान मॉड्यूलर रिअॅक्टर्स आणि प्रगत रिअॅक्टर्सवर देखील एकत्र काम करू. शेती, कृषी-तंत्रज्ञान आणि अन्न सुरक्षा यातील मूल्यवर्धन हे आमचे सामायिक प्राधान्य आहे. या दिशेने, भारतात भारत-कॅनडा पल्स प्रोटीन सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केले जाईल,” असे मोदी म्हणाले. एक वर्षापूर्वीच, भारताने सहा कॅनेडियन राजदूतांना हद्दपार केले आणि सहा जणांना उत्तर अमेरिकन राष्ट्रातून माघारी बोलावले. निज्जरच्या हत्येबद्दलचे प्रश्न अजूनही कायम आहेत. कार्नी यांच्या भारत भेटीच्या पूर्वसंध्येला, वरिष्ठ कॅनेडियन अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीचा त्यांच्या कारभारात हस्तक्षेप थांबला आहे, यावर प्रकाश टाकला होता. तथापि, कॅनडाच्या अलीकडील माध्यमांच्या वृत्तांवरून असे दिसून येते, की हस्तक्षेप सुरूच आहे. तथापि, कॅनेडियन पंतप्रधानांनी नवी दिल्लीत सकारात्मक सूर लावला, पंतप्रधान मोदींच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या कारभाराचे कौतुक केले आणि पत्रकारांना दिलेल्या निवेदनात स्वामी विवेकानंदांचा उल्लेखही केला.

दोन्ही नेत्यांनी भारत आणि कॅनडामधील अंतराळातील भागीदारी अधिक दृढ करण्यासही सहमती दर्शविली. भेटीदरम्यान स्वाक्षरी केलेला आणखी एक मोठा करार म्हणजे त्रिपक्षीय ऑस्ट्रेलिया-कॅनडा-भारत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष भागीदारी- एसीआयटीआय. (ACITI). गेल्यावर्षी जी 20 च्या पार्श्वभूमीवर मोदी, कार्नी आणि अँथनी अल्बानीज यांनी पहिल्यांदा ACITI सुरू केले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments