scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरराजनैतिकभूकंपग्रस्त ‘वानुआतू’ला भारताकडून आर्थिक मदत जाहीर

भूकंपग्रस्त ‘वानुआतू’ला भारताकडून आर्थिक मदत जाहीर

17 डिसेंबर रोजी पॅसिफिक बेटावर 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. नवीन दिल्लीने या प्रदेशाला प्रथम प्रतिसाद देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पुनर्वसनासाठी मदत देऊ केली आहे.

नवी दिल्ली:  वानुआतूची राजधानी पोर्ट विलाच्या किनारपट्टीवर 17 डिसेंबर रोजी झालेल्या 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या  भूकंपानंतर भारताने गुरुवारी वानुआतुला पुनर्वसनासाठी 500,000 डॉलर्स म्हणजे 4.3 कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे.

“भारत-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशन फोरम (FIPIC) अंतर्गत एक जवळचा मित्र आणि भागीदार म्हणून आणि वानुआतुच्या मैत्रीपूर्ण लोकांशी एकजुटीचे प्रतीक म्हणून, भारत सरकारने मदत, पुनर्वसन आणि पुनर्बांधणी प्रयत्नांना मदत करण्यासाठी ही मदत दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे हे जाहीर केले आहे.

या भूकंपात 14 जणांचा मृत्यू झाला असून 250 जण जखमी झाल्याची माहिती आहे. संपूर्ण बेट राष्ट्रात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले, ज्यामुळे पोर्ट विला येथील आंतरराष्ट्रीय शिपिंग टर्मिनल तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नुकसान झाले. त्सुनामीने येथील इंटरनेट कनेक्टिव्हिटी पुरवणाऱ्या पाणबुडी केबल्सचे नुकसान झाले. युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर द कोऑर्डिनेशन ऑफ ह्युमॅनिटेरियन अफेयर्सने (OCHA) सांगितल्यानुसार भूकंपानंतर एका आठवड्यात सुमारे 2 हजार 435 लोक विस्थापित झाले, तर जवळपास 300 आफ्टरशॉक्स जाणवले.

“नैसर्गिक आपत्तींमुळे आलेल्या संकटाच्या आणि विनाशाच्या काळात भारत वानुआतूच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भारताच्या इंडो-पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्ह (IPOI) चा एक महत्त्वाचा स्तंभ-आपत्ती जोखीम कमी करणे आणि व्यवस्थापन आहे. भारत मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणासाठी (HADR) वचनबद्ध आहे.” असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. अलिकडच्या वर्षांत, भारताने पॅसिफिक बेटांच्या देशांकडे लक्ष दिले आहे, जलद परिणाम प्रकल्पांसाठी मदत देऊ केली आहे आणि या प्रदेशातील नैसर्गिक आपत्तींना प्रथम प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला आहे.

2014 मध्ये, भारत सरकारने 14 पॅसिफिक बेट राष्ट्रांसह- फिजी, पापुआ न्यू गिनी, वानुआतू, तुवालू, किरिबाटी, मार्शल बेटे, नाउरू, नियू, सामोआ, सोलोमन बेटे, पलाऊ, टोंगा, कुक बेटे आणि मायक्रोनेशियाच्या संघराज्यांसाठी ‘फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलँड्स कोऑपरेशनची (FIPIC) घोषणा केली होती.स्थापनेपासून, फोरमच्या तीन शिखर परिषदा झाली आहेत. शेवटची परिषद मे 2023 मध्ये पापुआ न्यू गिनीने आयोजित केली होती, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. शिखर परिषदेत, मोदींनी फिजीमधील सुपर-स्पेशालिटी कार्डिओलॉजी हॉस्पिटल आणि ‘एफआयपीआयसी’चा भाग असलेल्या सर्व देशांसाठी  सागरी रुग्णवाहिकांसह 14 देशांमधील अनेक प्रकल्पांची घोषणा केली. बीजिंगने गुरुवारी  वानुआतुला किमान 35 टन आपत्कालीन मदत पुरवठा केला आहे. चीनदेखील या प्रदेशात खूप सक्रिय आहे. मदतीमध्ये तंबू, फोल्डिंग बेड, वॉटर प्युरिफायर आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे.

आपत्ती निवारणाच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी बीजिंगने “आपत्तीनंतरचे मूल्यांकन अभियांत्रिकी पथक” वानुआतूला पाठवले आहे, असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले. भारत त्याच्या क्वाडमधील भागीदारांसह-ऑस्ट्रेलिया, जपान आणि यूएस-प्रदेशातील मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण प्रयत्नांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहे, विशेषत: पॅसिफिक बेटांच्या राष्ट्रांपर्यंत चीनचा पोहोच झाल्यापासून.

2022 मध्ये, क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इंडो-पॅसिफिक प्रदेशातील ‘एचएडीआर’ उपक्रमांसाठी मार्गदर्शक तत्त्वे मान्य केली होती, ज्यामुळे मदत कार्यात समन्वय साधण्याचा त्याचा हेतू अधोरेखित झाला होता.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments