नवी दिल्ली: रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारत-पाकिस्तान युद्धबंदी आणि भारतीय वस्तूंवर कर लादण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावरून भारत आणि अमेरिकेतील राजनैतिक तणाव अनेक आठवड्यांपासून सुरू असताना, मंगळवारी सकाळी हा तणाव काहीसा कमी झाला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट केले आहे, की भारत आणि अमेरिका दोघांमधील व्यापार अडथळे दूर करण्यासाठी वाटाघाटी सुरू ठेवत आहेत. त्यांनी पुढे लिहिले आहे की, “येत्या आठवड्यात माझे खूप चांगले मित्र, पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलण्यास मी उत्सुक आहे. मला खात्री आहे की आपल्या दोन्ही महान देशांसाठी यशस्वी निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात कोणतीही अडचण येणार नाही!” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या संदेशाचा स्क्रीन ग्रॅब पुन्हा पोस्ट करून प्रतिसाद दिला आणि दोन्ही देश जवळचे मित्र आणि नैसर्गिक भागीदार असल्याचे सांगितले.
“मला विश्वास आहे की आमच्या व्यापार वाटाघाटी भारत-अमेरिका भागीदारीच्या अमर्याद क्षमतांना चालना देण्याचा मार्ग मोकळा करतील. आमच्या टीम लवकरात लवकर या चर्चा पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत. मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी बोलण्यासदेखील उत्सुक आहे. आम्ही दोन्ही देशांतील लोकांसाठी उज्ज्वल, अधिक समृद्ध भविष्य सुरक्षित करण्यासाठी एकत्र काम करू,” असे त्यांनी लिहिले. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील मोदींची पोस्ट रिपोस्ट केली आहे. (रीट्रुथ)
तथापि, त्याच वेळी, ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर दबाव आणण्यासाठी चीन आणि भारतावर 100 टक्क्यांपर्यंत शुल्क लादण्याचे आवाहन युरोपियन युनियन अधिकाऱ्यांना केल्याचे म्हटले जात आहे. ट्रम्प यांनी युरोपियन युनियनच्या निर्बंध दूत डेव्हिड ओ’सुलिवन आणि इतर ईयू अधिकाऱ्यांना कॉन्फरन्स कॉलद्वारे विनंती केली आहे, जे सध्या वॉशिंग्टनमध्ये निर्बंध समन्वयावर चर्चा करण्यासाठी आहेत. सूत्रांनी सांगितले की, भारताचे मुख्य व्यापार वाटाघाटींचे तज्ञ राजेश अग्रवाल, जे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील विशेष सचिव आहेत, पुढील आठवड्यात त्यांच्या टीमसह त्यांच्या अमेरिकन संवादकांशी व्यापार वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेला भेट देण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात येणारा अमेरिकेचा व्यापारी प्रतिनिधीमंडळाचा दौरा रद्द करण्यात आला होता, परंतु पंतप्रधान मोदी या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसाठी अमेरिकेला जाणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत.
या घडामोडींबद्दल माहिती असलेल्यांनी सांगितले की, दोन्ही बाजूंमध्ये जोरदार बॅक चॅनेल चर्चा झाल्या, ज्यामध्ये अमेरिकेतील अनेकांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भारताविरुद्ध कठोर भूमिका घेण्यापासून आणि भारत आणि अमेरिकेतील भूतकाळातील प्रशासनांनी काळजीपूर्वक जोपासलेल्या संबंधांना बिघडवण्यापासून परावृत्त केले. सूत्रांनी सांगितले की, सार्वजनिक आणि सोशल मीडियाच्या गोंधळानंतरही, भारताने अमेरिकन प्रशासनाशी संवाद साधला. जुलैमध्ये ‘द प्रिंट’ने सर्वप्रथम वृत्त दिले होते, की भारत आणि अमेरिका अनेक आठवड्यांच्या क्लिष्ट वाटाघाटींनंतर एक लघु व्यापार करार “जवळजवळ” अंतिम करत आहेत. दोन्ही बाजू या वर्षाच्या अखेरीस अंतिम होणाऱ्या मोठ्या मुक्त व्यापार करारावर काम करत आहेत.
तथापि, भारत-पाकिस्तान संघर्षात हस्तक्षेप करण्याचे श्रेय नवी दिल्लीने कधीही दिले नाही, परंतु त्यांनी लघु कराराला पुढे नेले नाही आणि जास्त शुल्क लादून प्रतिसाद दिला. सूत्रांनी सांगितले की जुलैमध्ये झालेल्या व्यापार चर्चेच्या शेवटच्या फेरीत, भारतीय बाजूने मिनी ट्रेड डीलबाबत अमेरिकेला आपली शिफारस सादर केली होती आणि वॉशिंग्टनने त्याला आक्षेप घेतला नव्हता, ज्यामुळे एकमत झाले. नवी दिल्लीने वॉशिंग्टन डी.सी.च्या विशिष्ट मागण्या मान्य केल्या होत्या, की भारतात सामान्यतः उत्पादित न होणाऱ्या काही कृषी उत्पादने आणि दुग्धजन्य पदार्थांचा करारात समावेश करावा. भारताकडून ज्या इतर क्षेत्रांवर कर कपात करावी लागणार होती त्यात अमेरिकन ऑटोमोबाईल्सचा समावेश होता. ट्रम्प यांनी परदेशी बनावटीच्या ऑटोमोबाईल्सवरील भारताच्या उच्च कर आकारणीवर सार्वजनिकपणे टीका केली आहे.
भारत अमेरिकेला अंदाजे सुमारे 77 अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तू निर्यात करतो, तर जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतून सुमारे 42 अब्ज डॉलर्स आयात करतो. फेब्रुवारीमध्ये, पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांनी अमेरिकेच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात घोषणा केली होती, की मोठ्या द्विपक्षीय व्यापार कराराचा “पहिला टप्पा” 2025 च्या शरद ऋतूपर्यंत जाहीर केला जाईल.
Recent Comments