नवी दिल्ली: दहशतवादाच्या प्रश्नावर पोलंड भारताच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे, असे भारतातील पोलंडचे राजदूत पिओटर अँटोनी स्विताल्स्की यांनी बुधवारी नवी दिल्लीत ‘द प्रिंट’शी झालेल्या विशेष संवादात सांगितले. गेल्यावर्षी पाकिस्तानमध्ये दहशतवादी पायाभूत सुविधांविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय सैन्याने पोलिश ड्रोनचा वापर केला होता, हेदेखील अधोरेखित केले. ऑक्टोबर 2025 मध्ये पोलिश परराष्ट्रमंत्री राडोस्लाव सिकोर्स्की यांच्या इस्लामाबाद भेटीदरम्यान जारी केलेल्या संयुक्त निवेदनाचा संदर्भ स्विताल्स्की यांनी दिला. ऑक्टोबरमधील निवेदनातून वॉर्सा संभाव्य आंतरराष्ट्रीय मध्यस्थी प्रयत्नांना पाठिंबा दर्शवत असल्याचे दिसून आले. भारताने असे म्हटले आहे, की पाकिस्तानसोबतचे मतभेद केवळ द्विपक्षीय पद्धतीनेच सोडवले जातील.
“दहशतवादाच्या प्रश्नावर, पाकिस्तानबद्दल पोलंडची भूमिका आणि इतर मुद्द्यांवर विधानांचा चुकीचा अर्थ लावला गेला, दुर्दैवाने, कारण मी तुम्हाला थेट संदर्भातून सांगू शकतो की, या मुद्द्यांवर भारताशी आमचे पूर्ण सहकार्य आहे. दहशतवादाच्या बाबतीत कोणतेही मतभेद नाहीत.” असे ते म्हणाले.
पोलंडने यापूर्वीही रशियाच्या ऊर्जाखरेदीविरुद्ध सार्वजनिक मोहीम चालवली होती. नवी दिल्लीत, त्याच्या ऊर्जा धोरणाचे निवडक लक्ष्यीकरण म्हणून ते पाहिले गेले. त्यानंतर जानेवारीमध्ये पोलंडचे उपपंतप्रधान असलेले सिकोर्स्की यांच्या भारत भेटीदरम्यान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी असामान्य टीका केली. ‘जयशंकर यांनी वॉर्साला दहशतवादाबद्दल शून्य सहनशीलता दाखवण्यास आणि या प्रदेशात ‘अस्थिरता निर्माण करणाऱ्या’ घटकांना खतपाणी घालू नये’, असे सांगितले. स्विताल्स्की यांनी स्पष्ट केले, की पोलंडची भूमिका बदललेली नाही. पोलंडचा पाकिस्तानशी संपर्क भारतविरोधी कृत्यांना सहिष्णुता दर्शवितो हा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. “पोलंड आणि तुम्ही ज्याला पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधा म्हणता, त्यामध्ये तुम्ही एकमेव दुवा स्थापित करू शकता. भारतीय सैन्याने या पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी पोलिश ड्रोनचा वापर केला होता.”
‘भारतीय शस्त्रांची विक्री व खरेदी’
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये एप्रिल 2025 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देताना, राजदूतांनी नमूद केले, की ते त्याच्या आदल्या रात्री श्रीनगरमध्ये होते. “आम्हाला भारताबद्दल पूर्ण सहानुभूती आहे. आमचे कोणतेही मतभेद नाहीत. भारतात झालेल्या दहशतवादाचा निषेध करण्याबाबतची आमची भूमिका खूप मजबूत आहे. भारतात जेव्हा जेव्हा दहशतवादी हल्ला होईल, तेव्हा आम्ही त्याचा निषेध करू.” त्यानंतर त्यांनी पोलंडचा भारताला ऐतिहासिक पाठिंबा अधोरेखित केला. “पाकिस्तानसोबतच्या भारताच्या सर्व संघर्षांमध्ये, पोलंड त्याच्या बाजूने होता,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. पोलंड पाकिस्तानशी राजनैतिक आणि व्यावसायिक संबंध राखत आहे, कारण ते संयुक्त राष्ट्रांचे कायदेशीर सदस्य आहेत. “आमच्या परराष्ट्रधोरणात भारताचे विशेष स्थान असे आहे, की भारत हा दक्षिण आशियातील एकमेव देश आहे, जिथे आम्हाला लष्करी क्षेत्रात व्यवसाय करायचा आहे. आम्हाला भारतीय शस्त्रे आणि लष्करी प्रणाली विकायच्या आणि खरेदी करायच्या आहेत.”
सिकोर्स्की यांचा भारत दौरा ‘अत्यंत रचनात्मक’
राजदूत स्वितल्स्की यांनी सिकोर्स्की यांच्या भारत दौऱ्याचे वर्णन ‘अत्यंत रचनात्मक आणि अतिशय यशस्वी’ असे केले. “आमचे उपपंतप्रधान, परराष्ट्रमंत्री यांची भेट मला खूप रचनात्मक आणि खूप यशस्वी वाटते. मंत्री जयशंकर आणि मंत्री सिकोर्स्की यांच्यातील चर्चेत मी उपस्थित होतो, ती खूप व्यावसायिक व मैत्रीपूर्ण होती.” असे ते पुढे म्हणाले. “या विशिष्ट विषयावर (रशिया-युक्रेन युद्ध) आमचे काही वेगळे मत आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र सर्वसाधारणपणे, आम्ही सहमत आहोत. भारत आणि पोलंड दोघांनाही हे युद्ध शक्य तितक्या लवकर संपवायचे आहे.” त्यांनी सांगितले. पोलंडचा युद्धातील अनुभव थेट राहिला आहे, असे राजदूतांनी नमूद केले. रशियाच्या आक्रमणापासून, दोन दशलक्षाहून अधिक युक्रेनियन निर्वासित पोलंडमध्ये दाखल झाले आहेत, त्यापैकी दहा लाखांहून अधिक अजूनही तेथे राहत आहेत, ज्यात बहुतेक महिला आणि मुले आहेत. शाळा आणि सामाजिक सेवांवर होणारा ताण लक्षणीय आहे.
त्याचवेळी, पोलंड दहशतवादाबाबत भारताच्या चिंता समजून घेतो, असे स्विताल्स्की म्हणाले. त्यांनी पोलंडमध्ये रशियाच्या पाठिंब्याने केलेल्या कथित तोडफोडीचा तपशील दिला, ज्यामध्ये रेल्वे बॉम्बस्फोटाचा प्रयत्न, वॉर्सा येथील एका प्रमुख शॉपिंग मॉलमध्ये जाळपोळ आणि पोलिश हवाई क्षेत्रात ड्रोन घुसखोरी यांचा समावेश आहे. ” दहशतवाद हा वाईटच असतो. त्याचे कोणतेही प्रकार नसतात. आम्ही दहशतवादाचा स्पष्टपणे निषेधच करतो.

Recent Comments