नवी दिल्ली : ‘दे दे प्यार दे’ या बहुप्रतिक्षित सिक्वेलची अखेर घोषणा झाली आहे. दे दे प्यार दे 2 असे शीर्षक असलेला हा चित्रपट 14 नोव्हेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग सिक्वेलमध्ये त्यांच्या भूमिका पुन्हा सादर करतील. याशिवाय आर माधवनचीही या चित्रपटात भूमिका आहे.
तथापि, चित्रपटाच्या पहिल्या भागात दिसलेली तब्बू मात्र या भागात दिसणार नाही. पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन अकीव अली यांनी केले होते, तर सिक्वेलचे दिग्दर्शन अंशुल शर्मा करणार आहे, ज्याची पटकथा लव रंजन आणि तरुण जैन यांनी लिहिली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, लंडन आणि पंजाबमध्ये झाले आहे.
‘दे दे प्यार दे 2’ ची सहनिर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे. 50 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट (पहिला भाग) बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. चित्रपटाने 103.64 कोटींची कमाई केली.
‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट आशिष या मध्यमवयीन पुरुषाभोवती फिरतो, जो आयेशा या त्याच्या जवळपास निम्म्या वयाच्या स्त्रीच्या प्रेमात पडतो. आशिष आयेशाची त्याच्या माजी पत्नी आणि मुलांशी ओळख करून देतो आणि तिथून मनोरंजक कथेला सुरुवात होते. ‘दे दे प्यार दे 2’ प्रेक्षकांसाठी नवीन ट्विस्ट आणि सरप्राईज घेऊन पहिली कथा जिथे संपली होती तिथून पुन्हा सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
Recent Comments