scorecardresearch
Tuesday, 9 September, 2025
घरमनोरंजनदिलजीत दोसांझ ‘पटियाला पेगवरून’ आता ‘कोक’कडे

दिलजीत दोसांझ ‘पटियाला पेगवरून’ आता ‘कोक’कडे

'दिल-लुमिनाटी' टूरच्या अहमदाबादच्या दौऱ्यावर, दिलजीत दोसांझने शहरातील अधिकाऱ्यांना त्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी 'ड्राय डे' घोषित करण्याची विनंती केली.

नवी दिल्ली: दिलजीत दोसांझने जाहीर केले आहे की तो दारूबद्दलची गाणी गाणे आता थांबवणार आहे. मात्र सर्व राज्यांनी दारूबंदी लागू केली तरच.

“चला एक चळवळ सुरू करूया… जर भारतातील प्रत्येक राज्य ड्राय- दारूमुक्त राज्य बनले तर दुसऱ्या दिवसापासून मी, दिलजीत दोसांझ, दारूबद्दल गाणे गाणे बंद करेन,” गायकाने त्याच्या दिल-लुमिनाटी इंडियाच्या अहमदाबाद ‘लेग’दरम्यान त्याच्या चाहत्यांना सांगितले. 17 नोव्हेंबर रोजी त्याचा दौरा सुरू झाला. “मला आणखी एक कल्पना सुचली आहे – ज्या दिवशी मी कोणत्याही शहरात परफॉर्म करतो त्या दिवशी ड्राय डे घोषित करा आणि त्या दिवशी मी अल्कोहोलशी संबंधित कोणतीही गाणी गाणार नाही.”

दोसांझची ही विधाने तेलंगणा सरकारच्या कायदेशीर सूचनेला प्रतिसाद म्हणून केली गेलेली आहेत.  दोसांझने 16 नोव्हेंबर रोजी हैदराबादच्या कॉन्सर्टदरम्यान संगीतामध्ये अल्कोहोल, ड्रग्स किंवा हिंसाचाराला प्रोत्साहन देऊ नये असे आवाहन केले होते. तसेच त्याने त्याची सेटलिस्ट ताबडतोब समायोजित केली, त्याच्या चार्टबस्टर लेमोनेड आणि 5 तारा या गाण्यांचे बोल बदलले.

“आजही, मी दारूबद्दल गाणी गाणार नाही, कारण गुजरात हे दारूमुक्त राज्य आहे,” त्याने गुजरात सरकारच्या दारूबंदीबद्दल कौतुक व्यक्त करत अहमदाबादच्या मैफिलीत याचा पुनरुच्चार केला. त्याने याला “योग्य दिशेने उचललेले पाऊल” असे संबोधले आणि त्याच्या गावीही त्याची अंमलबजावणी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. हा गायक पंजाबमधील जालंधरच्या फिल्लौर तहसीलमधील दोसांझ क्लॅनचा  आहे. तथापि, अल्कोहोल उद्योगातून मिळणारा प्रचंड महसूल पाहता देशव्यापी दारूबंदीची शक्यता कमी दिसते. आणि अहमदाबादमध्ये दोसांझने हेच दाखवून दिले. “कोविड -19 दरम्यान सर्व काही बंद झाले, परंतु दारूची दुकाने उघडी राहिली.”

‘दुहेरी मानके’

दिलजीत दोसांझने त्याच्या गाण्यांवर टीका करणाऱ्यांच्या ढोंगीपणालाही संबोधित केले आणि हे  निदर्शनास आणून दिले की, बॉलीवूड दारूबद्दलच्या अगणित गाण्यांनी भरलेले असताना, त्याच्या स्वत: च्या संग्रहात काही मोजकीच गाणी आहेत.

“मी डझनभर भक्तिगीते गायली आहेत. फक्त गेल्या 10 दिवसात, मी आणखी दोन रिलीज केली आहेत. पण त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही. टीव्हीवरील प्रत्येकजण पटियाला पेगबद्दलच बोलत असतो.” तो म्हणाला, अनेक बॉलीवूड स्टार्सप्रमाणे तो त्याच्या संगीतात दारूचे समर्थन करत नाही किंवा त्याची जाहिरात करत नाही.

त्याने एक उदाहरणदेखील सांगितले. एका वृत्त निवेदकाने सुचवले की जर एखाद्या अभिनेत्याने दारू पिण्यास लोकांना प्रोत्साहन दिले तर ते त्यांची प्रतिष्ठा धोक्यात आणतात, परंतु जेव्हा एखादा गायक असे करतो तेव्हा ते सेलिब्रेट केले जाते.   “त्यांच्याकडे ‘पटियाला पेग’ आहे की नाही हे विचारण्यासाठी मी कोणालाही वैयक्तिकरित्या कॉल करत नाही,” तो उपरोधाने म्हणाला.

त्यानंतर दोसांझने त्याच्या गाण्यांमध्ये बदल करण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल आत्मविश्वासाने सांगितले: जो कोणी मद्यपान करत नाही, त्याच्यासाठी अल्कोहोल संदर्भ काढून टाकण्यासाठी त्याचे बोल बदलणे हे काही मोठे आव्हान नाही. “मी दारू पीत नाही. त्यामुळे माझ्यासाठी हे खूप सोपे आहे.” असेही त्याने सांगितले.

बदललेली गाणी

हैदराबादमधील त्याच्या अलीकडील मैफिलीदरम्यान, तेलंगणा सरकारच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी दिलजीत दोसांझने आपल्या गाण्याचे बोल चतुराईने बदलल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले.

एका क्लिपमध्ये, त्याचा लोकप्रिय गाणे लेमोनेड सादर करताना, त्याने “तैनू तेरी दारू च पासंद आ लेमोनेड (तुम्हाला तुमच्या लिंबूपाणीमध्ये दारू आवडते)” पासून “तैनू तेरी कोक छ पासंद आ लेमोनेड (तुम्हाला तुमच्या कोकमध्ये लिंबूपाणी आवडते) अशी ती ओळ बदलली.” त्याचप्रमाणे, 5 तारा मध्ये, त्याने “5 तारा थेक्के (फाइव्ह-स्टार दारूचे दुकान)” ही ओळ बदलून “5 तारा हॉटेल (फाइव्ह-स्टार हॉटेल) केली.

नंतर, अहमदाबादमध्ये त्यांच्या प्रेक्षकांशी संवाद साधताना, दोसांझ यांनी आणखी एक विशेष टिप्पणी केली. “जेव्हा परदेशातील कलाकार भारतात परफॉर्म करतात तेव्हा कोणतेही बंधन नसते. पण जेव्हा एखादा भारतीय कलाकार परफॉर्म करतो तेव्हा ते या सर्व मर्यादा घालतात,” तो म्हणाला.

“एवढे मोठे शो का होत आहेत हे काही लोकांना पचनी पडत नाही. ही तिकिटे दोन मिनिटांत कशी विकली जातात? भाऊ, मी अनेक वर्षांपासून काम करत आहे. मी एका रात्रीत प्रसिद्ध झालो नाही,” तो म्हणाला.

दिलजीत दोसांझचा पुढचा कॉन्सर्ट 22 नोव्हेंबरला लखनऊमध्ये आहे.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments