scorecardresearch
Tuesday, 9 September, 2025
घरमनोरंजन‘मार्को’ हा चित्रपट ठरतोय 'मॉलिवूड'मधील सर्वाधिक हिंसक चित्रपट

‘मार्को’ हा चित्रपट ठरतोय ‘मॉलिवूड’मधील सर्वाधिक हिंसक चित्रपट

हनीफ अदेनीच्या ॲक्शन थ्रिलर मार्कोने अवघ्या पाच दिवसांत 50 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सात ॲक्शन सीक्वेन्स असलेला हा चित्रपट सर्वात ‘हिंसक’ चित्रपट म्हणून समोर आला आहे.

नवी दिल्ली: हनीफ अदेनीच्या ॲक्शन थ्रिलर मार्कोने अवघ्या पाच दिवसांत 50 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सात ॲक्शन सीक्वेन्स असलेला हा चित्रपट सर्वात ‘हिंसक’ चित्रपट म्हणून समोर आला आहे. समीक्षकांनी या सिनेमाला धर्मा प्रॉडक्शनच्या ‘किल’ आणि संदीप रेड्डी वंगा यांच्या 2023 च्या ब्लॉकबस्टर ‘ॲनिमल’च्या पंक्तीला नेऊन बसवले आहे. अलिकडच्या वर्षांत सर्वात हिंसक चित्रपटांपैकी हा दुसरा आहे. ‘मार्को’ने तीन आठवड्यांनंतर कमाईच्या बाबतीत  केरळमधील अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 लाही मागे टाकले आहे.

उन्नी मुकुंदनने ‘मार्को’ची भूमिका केली आहे.

“मल्याळम चित्रपट हे रसपूर्ण लेखन, थ्रिलर प्रसंग आणि उत्सुकता ताणणाऱ्या गोष्टींनी युक्त म्हणून ओळखले जातात. मार्को हा याला अपवाद आहे आणि मल्याळम चित्रपट उद्योग ज्यासाठी ओळखला जातो त्याच्या अगदी विरुद्धच सिनेमा बनवणे हे दिग्दर्शकासाठी अनुकूल ठरले आहे,” ज्येष्ठ चित्रपट समीक्षक रमेश बाला म्हणाले.

चित्रपटगृहांमध्ये चालू असलेल्या यशस्वी प्रदर्शनासह, चित्रपटाने हिंदीमध्ये अतिरिक्त 140 शो प्रदर्शित केले आहेत. मार्को हा चित्रपट मोहनलाल यांचे दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या ‘बॅरोज’ सिनेमाला चालना देत आहे. ख्रिसमसला प्रदर्शित  झालेला ‘बॅरोज’ हा लहान मुलांचा काल्पनिक चित्रपट आहे ज्यात मोहनलाल एका प्रेमळ भुताची भूमिका करत आहे.

टोकाचा हिंसाचार

मार्कोला कायदेशीर अडचणींचाही सामना करावा लागला आहे. वकील जे.एस. अखिल यांनी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) कडे औपचारिक तक्रार सादर केली आणि दावा केला की 18 वर्षांखालील मुलांना हा तीव्र  हिंसाचार दाखवला जाऊ नये. चित्रपटाला आता ‘ए’ प्रमाणपत्र मिळाले आहे, परंतु त्यामुळे त्याची बॉक्स ऑफिसवरील कमाई कमी झालेली नाही.

चित्रपटात दाखवण्यात आलेली तीव्र हिंसक दृश्ये पाहून एका महिलेला उलटीही झाली व तिची तब्येत बिघडली असे अहवालात म्हटले आहे.

मार्कोच्या यशामुळे, अधिक हिंसक ॲक्शन चित्रपटांचा आनंद घेण्याचा प्रेक्षकांचा कलही वाढला आहे. वांगाच्या ‘ॲनिमल’ने जगभरात 900 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अगदी विजय सेतुपतीच्या ‘महाराजा’ने जगभरात 100 कोटींची कमाई केली आणि नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यानंतर तो ‘स्ट्रीमिंग हिट’ ठरला. त्याला 18.6 दशलक्ष व्ह्यूज मिळाले.

“कोरियन चित्रपट भारतात खूप लोकप्रिय आहेत. आणि ती तीव्र, टोकाची हिंसा दाखवतात. अगदी रजनीकांतच्या जेलरमध्येही शिरच्छेदाचे दृश्य होते. आता निर्माते हिंसक चित्रपट बनवत आहेत कारण प्रेक्षकांना ते आवडतात आणि ते अधिक मुख्य प्रवाहात येत आहेत,” बाला म्हणाले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments