नवी दिल्ली: डिस्नेचा ‘मुफासा: द लायन किंग’ भारताच्या हिंदी प्रांतांमध्ये गर्जना करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण त्याला एसआरके: द बॉलीवूड किंगने आवाज दिला आहे म्हणून नाही. चित्रपटाच्या डब केलेल्या हिंदी आवृत्तीच्या ताज्या प्रोमोमध्ये, शाहरुख खानने ज्या व्यक्तिरेखेला त्याचा आवाज दिला आहे त्या व्यक्तिरेखेची ओळख एका प्रभावी उत्तेजक पंचलाईनसह करून देण्यात आली आहे: “ये कहानी है एक ऐसे राजा की जिस विरासत की रोशनी नहीं, तनहाइयों की विरासत मिली”.
शाहरुख खान जेव्हा हे शब्द बोलतो तेव्हा ते त्याचे स्वतःचेच वाटतात. तो म्हणतो: “जमीन पर तो क्या बादशाह हुकूमत करते आये हैं, पर उसने राज किया सभी के दिलों पर. हाल की आंधियों से उठा एक सच्चा राजा.” अनेक सम्राटांनी भूमीवर राज्य केले, परंतु त्याने मात्र सर्वांच्या हृदयावर राज्य केले. संकटांच्या वादळांना तोंड देऊन ठामपणे उभा असलेला तो खरा राजा.
“काफी मिलती जुलती है ना ये कहानी?” असंही तो प्रोमोच्या शेवटी म्हणतो. या व्यक्तिरेखेला आवाज देण्यासाठी फक्त किंग खान हाच योग्य होता याच्याशी कोण असहमत असेल?
व्हिडिओला कॅप्शन दिले आहे ‘एक बादशाह की कहानी, बादशाह की जुबानी,’ (राजाने सांगितलेली राजाची कहाणी). भारतीय चित्रपटसृष्टीत शाहरुखची स्वतःची एक राजवट आहे, आणि त्यातीलच हा एक नवा प्रोजेक्ट आहे असं म्हणता येईल.
मुफासा: द लायन किंग, मुफासाच्या सिंहासनापर्यंत प्रेक्षकांना घेऊन जाणारा हा प्रीक्वल, भारतात आत्तापासूनच लोकप्रिय होतोय. शाहरुख खानची मुले आर्यन आणि अबराम सिंबा आणि तरुण मुफासा यांना आवाज देतील.चित्रपटाचा इंग्रजी ट्रेलर ऑगस्टमध्ये आला होता, तर गेल्या आठवड्यात हिंदी-डब व्हर्जन रिलीज झाले होते. तमिळ आणि तेलुगूमध्येही हा चित्रपट डब करण्यात आला आहे.
मुफासाप्रमाणेच, शाहरुख खानचा सुपरस्टारडमपर्यंतचा प्रवास तो किंग खान होण्यापूर्वी विविध आव्हानांनी भरलेला होता. दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या शाहरुख खानला चित्रपटसृष्टीत मोठे काम करण्यासाठी मुंबईत येण्यापूर्वी त्याने लहान वयातच आई-वडील दोघांपासूनही दूर व्हावं लागलं. त्या अनिश्चिततेच्या काळापासून ते बॉलीवूडचा निर्विवाद ‘बादशाह’ बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास हा अनाथ मुफासाच्या प्राईड लँड्समध्ये सत्तेपर्यंत पोहोचण्याचेच जणू प्रतिबिंब आहे.
अकादमी पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते बॅरी जेनकिन्स दिग्दर्शित, मुफासा: द लायन किंग 20 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
Recent Comments