नवी दिल्ली: राणी मुखर्जी मर्दानी 3 मध्ये एसपी शिवानी शिवाजी रॉय म्हणून परत येत आहे. यशराज फिल्म्सने 13 डिसेंबर रोजी ‘मर्दानी’च्या तिसऱ्या भागाची अधिकृत घोषणा केली आहे. मर्दानी 3 ची निर्मिती एप्रिलमध्ये सुरू होणार असून, चित्रपट 2026 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
“प्रतीक्षा संपली! राणी मुखर्जी मर्दानी 3 मध्ये शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत परतली आहे. सिनेमा 2026 मध्ये तुमच्या भेटीला ,” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट यशराज फिल्म्सने शेअर केली आहे. 13 डिसेंबर हा मर्दानी 2 चा पाचवा वर्धापनदिनसुद्धा आहे. 2019 मध्ये याच दिवशी मर्दानी 2 चित्रपटगृहांत दाखल झाला.
मर्दानी फ्रँचायझी
मर्दानी या चित्रपटमालिकेची सुरुवात 2014 मध्ये दिवंगत दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी केली. त्यानंतर गोपी पुथरण यांनी त्याच्या सिक्वेलचे दिग्दर्शन केले.
या तिसऱ्या भागासाठी पटकथालेखक म्हणून यशराज फिल्म्सने दिग्दर्शक अभिराज मिनावाला आणि आयुष गुप्ता यांची निवड केली आहे. मिनावाला, सध्या वॉर 2 चे सहयोगी दिग्दर्शक आहेत, यांनी बँड बाजा बारात, सुलतान आणि टायगर 3 सारख्या हिट चित्रपटांसाठी यशराजसोबत काम केले आहे. नेटफ्लिक्सच्या ‘द रेल्वे मेन’ (2023) मधील कामासाठी गुप्ता यांची जागतिक स्तरावर प्रशंसा झाली होती.
“मर्दानी 3 चे शूटिंग एप्रिल 2025 मध्ये सुरू करत आहोत हे जाहीर करताना मला आनंद होत आहे,” “शिवानी शिवाजी रॉय यांना परत आणताना मला अभिमान वाटतो. जे पोलीस आम्हाला दररोज सुरक्षित ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेतात त्या निःस्वार्थ आणि शूर पोलिसांसाठी ही आदरांजली आहे.” असे राणी मुखर्जी म्हणते.
Recent Comments