नवी दिल्ली: 2024 मधील दोन सर्वात मोठे चित्रपट हे तेलुगू ब्लॉकबस्टर आहेत: सुकुमारचा ‘पुष्पा 2: द रुल’ आणि नाग अश्विनचा ‘कल्की 2898 एडी’. ‘पुष्पा 2’ अजूनही जोरदार प्रतिसादासह चालू आहे, आणि फक्त भारतात या चित्रपटाने 1 हजार 157.35 कोटी रुपये कमावले आहेत. अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि प्रभास यांच्या भूमिका असलेल्या कल्की 2898 एडीने 1 हजार 052.5 कोटी रुपये कमावले. कदाचित त्यामुळेच चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने मुंबई सोडून दक्षिणेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
“सुरुवातीपासूनच, चित्तोरपटाची निर्मिती सुरू होण्याआधीच तो कसा विकायचा हे ठरते. त्यामुळे चित्रपट निर्मितीचा आनंद हिरावून घेतला जातो. त्यामुळे मला पुढच्या वर्षी मुंबईबाहेर जायचे आहे. मी दक्षिणेला जात आहे. “गँग्स ऑफ वासेपूरचे (2012) दिग्दर्शक असलेले कश्यप सांगतात. आशिक अबूचा मल्याळम चित्रपट, ‘रायफल क्लब’साठी काम करताना आलेल्या अनुभवामुळे त्यांचा हा विचार पक्का झाला आहे. कश्यप यांनी चित्रपटात एक विक्षिप्त गुंड दयानंद बरेची भूमिका साकारली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत सर्जनशीलतेचा अभाव असल्याने कश्यप नाराज आहेत. “आधी झालेल्या चांगल्या कामांचेच रीमेक करण्याची इथे मानसिकता आहे. ते काहीही नवीन करण्याचा प्रयत्न करणार नाहीत,” अशा शब्दांत सर्जनशील जोखीम घेण्याच्या चित्रपटसृष्टीतील लोकांच्या अनिच्छेवर त्यांनी प्रकाश टाकला.
दक्षिण विरुद्ध उत्तर
गलाटा प्लस आयोजित पॅन इंडिया निर्मात्यांच्या गोलमेज कार्यक्रमात, बोनी कपूर आणि नागा वामसी यांच्यात जोरदार शाब्दिक देवाणघेवाण झाली. राऊंडटेबलमध्ये अभिनेता-निर्माता सिद्धार्थ, अर्चना कल्पथी, चांदिनी साशा आणि दिग्दर्शक-निर्माता डॉन पालथारादेखील होते.
चर्चेत वामसी यांनी कपूर यांना एका मुद्द्यावर अडवले. “एक गोष्ट सर, तुम्हाला हे मान्य करावे लागेल. ते खरोखर कठोर वाटू शकते. आम्ही दक्षिण भारतीयांनी तुम्हा बॉलिवूडवाल्यांचा सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. कारण, तुम्ही लोक वांद्रे आणि जुहूसाठी चित्रपट बनवण्यात गुंतला होतात. तुम्ही बाहुबली, आरआरआर, ॲनिमल आणि जवान या सिनेमांच्या वेळेस बदल अनुभवला,” वामसी म्हणाले.
कपूर यांनी यावर असहमती दर्शवल्यानंतर वामसी म्हणाले, “सर, मुघल-ए-आझम नंतर तुम्ही बाहुबली आणि आरआरआर हे चित्रपट हिंदीत आणले जे मूळचे तेलुगू चित्रपट होते. मुघल-ए-आझमनंतर तुम्ही कधीही हिंदी चित्रपटाचा उल्लेख केला नाही. त्यावर कपूर यांनी “या फोरममध्ये, आम्हाला माहित असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही बोलू शकत नाही. आपल्याला व्यापक शब्दांत बोलण्याची गरज आहे. हा मुद्दा भाषेचा नसून चांगल्या आणि वाईट सिनेमाचा आहे. पॅन-इंडिया’ ही एक संज्ञा आहे जी समस्याप्रधान बनली आहे.” अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले. याला अर्चना कलापाठी यांनीही सहमती दर्शविली.
पण कपूर आणि वामसी यांच्यातील या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चाहत्यांनीही त्यावर आपापल्या मतांप्रमाणे कोणा एकाची बाजू घेत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Recent Comments