scorecardresearch
Tuesday, 9 September, 2025
घरपर्यावरणतामिळनाडू सरकारकडून ‘रॅप्टर रिसर्च फाउंडेशन’चे अनावरण

तामिळनाडू सरकारकडून ‘रॅप्टर रिसर्च फाउंडेशन’चे अनावरण

तामिळनाडू सरकारने मंगळवारी फाउंडेशनची पहिली बैठक घेतली. रॅप्टर संशोधन आणि संवर्धनासाठी निधी समर्पित करणारे हे भारतातील पहिले राज्य आहे.

नवी दिल्ली: तामिळनाडूमधील गिधाडे, गरुड, घुबड आणि इतर शिकारी पक्ष्यांकडे आता राज्य सरकारचे विशेष लक्ष असेल, कारण तामिळनाडू हे भारतातील पहिले राज्य बनले आहे, जे विशेषतः रॅप्टरसाठी सार्वजनिक निधीतून संवर्धन उपक्रम सुरू करत आहे. मंगळवारी, सरकारने चेन्नईस्थित तामिळनाडू रॅप्टर रिसर्च फाउंडेशन (TNRRF) ची पहिली बैठक आयोजित केली. ही राज्यातील 70 हून अधिक रॅप्टर पक्ष्यांच्या प्रजातींच्या संशोधन आणि संवर्धनासाठी समर्पित एक  संस्था आहे.

मंगळवारी, तमिळनाडू रॅप्टर रिसर्च फाउंडेशनचे भागधारक आणि बोर्ड सदस्य, देशभरातील पर्यावरणशास्त्रज्ञ आणि तज्ञांसह, फाउंडेशनच्या उद्घाटन बैठकीसाठी चेन्नईमध्ये भेटले. एआयडब्ल्यूसी संचालक ए. उदयन यांच्या अध्यक्षतेखालील प्रगत वन्यजीव संवर्धन संस्थेत (एआयडब्ल्यूसी) स्थित टीएनआरआरएफच्या मंडळावर इतर सदस्य असतील, ज्यात तामिळनाडूमधील सर्व मंडळांमधील मुख्य वन संरक्षकांचा समावेश असेल. “आमचे काम या धोक्यात असलेल्या प्रजातींवर संशोधन करणे असेल – प्रामुख्याने तामिळनाडूमध्ये, परंतु ते स्पष्टपणे त्यापलीकडेदेखील विस्तारेल,” असे तमिळनाडूचे प्रमुख वन संरक्षक उदयन यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले. “सरकारने पहिल्यांदाच रॅप्टर संशोधन संस्था स्थापन केली आहे; भारतातील इतर सर्व स्वयंसेवी संस्था आहेत.”

या वर्षाच्या सुरुवातीला 14 मार्च रोजी, तमिळनाडूचे अर्थमंत्री, तसेच पर्यावरण आणि हवामान बदल, थंगम थेनारासू यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात पहिल्यांदा घोषणा केली की तमिळनाडू रॅप्टर संशोधनासाठी एक संस्था स्थापन करण्यासाठी गुंतवणूक करेल. या प्रकल्पासाठी, तमिळनाडू सरकारने त्यांच्या दुर्मिळ प्रजाती संवर्धन निधीतून एक कोटी रुपये समर्पित केले आहेत. “हे केंद्र गरुड, बहिरी ससाणा, बाज, गिधाडे आणि घुबड यासारख्या शिकारी पक्ष्यांवर संशोधन, संवर्धन, पुनर्वसन आणि सार्वजनिक शिक्षणाचे केंद्र म्हणून काम करण्याचे उद्दिष्ट ठेवते,” असे तामिळनाडू सरकारच्या प्रस्तावात म्हटले आहे. “हा उपक्रम प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षी संवर्धनाच्या प्रयत्नांना बळकटी देईल.”

रॅप्टर संवर्धन का आवश्यक?

रॅप्टर पक्ष्यांनाच ‘शिकारी पक्षी’ म्हणून ओळखले जाते. पर्यावरणीय आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या पक्ष्यांची संख्या  जागतिक स्तरावर कमी होत आहे. स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स 2023 च्या अहवालानुसार, भारतातील रॅप्टरदेखील अधिवासाच्या नुकसानीमुळे तसेच कीटकनाशके आणि औषधांसह पर्यावरणातील इतर विषारी पदार्थांमुळे मरत आहेत. 1990 च्या दशकापासून भारतात विशिष्ट पक्षी – उदाहरणार्थ गिधाडे – 95% पेक्षा जास्त प्रमाणात घटले आहेत, मुख्यतः गुरांसाठी औषधांमध्ये डायक्लोफेनॅक औषधाचा वापर केल्यामुळे.

टीएनआरआरएफमध्ये, राज्य सरकार नीलगिरी, कोइम्बतूर, तिरुनेलवेली आणि पल्लीकरणाई यासारख्या प्रदेशांमध्ये रॅप्टर संवर्धनावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करण्याची योजना आखत आहे. टीएनआरआरएफ, वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीसह, रॅप्टर अभ्यासासाठी समर्पित इतर संस्थांसह, राज्यात रॅप्टर संवर्धनासाठी धोरणे विकसित करण्याची योजना आखत आहे. टीएनआरआरएफच्या भूमिकेत रॅप्टर इकोलॉजी आणि बायोलॉजीमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देणे, तसेच पक्ष्यांच्या या प्रजातीच्या महत्त्वाबद्दल जनजागृती पसरवणे देखील समाविष्ट असेल.

“सुरुवातीला, या उद्घाटन बैठकीनंतर आमचे प्राधान्य, रॅप्टरची संख्या आणि स्थान यांचे राज्यव्यापी मूल्यांकन स्थापित करणे असेल,” असे उदयन म्हणाले, ते पुढे म्हणाले, की हा अभ्यास प्रलंबित आहे. “हे आम्हाला संवर्धन प्रयत्नांसाठी प्राधान्य प्रजाती ओळखण्यास मदत करेल.”

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments