नवी दिल्ली: दिल्लीची हवेची गुणवत्ता शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी ‘गंभीर’ राहिली, तर तापमान हंगामातील सर्वात कमी, म्हणजे 11.2 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) चा टप्पा III दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेशात सकाळी 8 वाजल्यापासून लागू झाला, कारण दाट धुक्याने शहर व्यापले होते आणि हवेचा दर्जा निर्देशांक (AQI) ‘गंभीर’ श्रेणीत राहिला.
मंगळवारी, शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 334 होता आणि बुधवारी तो 418 वर गेला, जो जवळजवळ 100 डेटा पॉइंट्सने वाढला आहे. गुरुवारी एक्यूआय 424 होता.
इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे वरिष्ठ अंतर्गत औषध सल्लागार डॉ. सुरंजित चॅटर्जी म्हणतात, “हे फक्त तुमच्या श्वासोच्छवासावर आणि फुफ्फुसांवर परिणाम करत नाही, तर हृदयाशी संबंधित समस्या आणि त्वचेचे संक्रमण वाढवते, अगदी तुलनेने निरोगी लोकांमध्ये देखील. “वाढत्या प्रदूषणामुळे लोक आधीच श्वासोच्छवासाच्या समस्यांनी ग्रस्त आहेत.
कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CAQM) ग्रॅप -III लागू करण्याचा निर्णय घेत असताना, ‘द प्रिंट’ ने शहरातील हवामानाच्या सद्य स्थितीचा आढावा घेतला.
ग्रॅप -III उपायांमध्ये कशाकशाचा समावेश?
ग्रॅप -GRAP हे दिल्लीतील धुके आणि वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आणीबाणीच्या उपाययोजनांचा संच म्हणून 2016 मध्ये अंमलात आणलेले धोरण आहे. शहराच्या वायू प्रदूषणाच्या टप्प्यावर अवलंबून उदा – अत्यल्प, अल्प, गंभीर किंवा खूप तीव्र AQI असणे, यानुसार सीक्यूएएमद्वारे (CAQM) उपायांची अंमलबजावणी केली जाते. दिल्ली महानगरपालिका, केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांसह सर्व प्राधिकरणे, बांधकाम, वाहतूक, कचरा व्यवस्थापन आणि वाहतूक उपायांना प्रतिबंधित करणाऱ्या ग्रॅप उपायांच्या अंमलबजावणीमध्ये गुंतलेली आहेत.
“जेव्हा हवेची गुणवत्ता खूप गंभीर असते, तेव्हा केवळ अस्थमा किंवा ब्राँकायटिस सारख्या आजारांनी ग्रस्त लोकच प्रभावित होत नाहीत,” डॉ. चॅटर्जी म्हणाले. “सामान्य लोकांनाही श्वास लागणे, डोळे लाल होणे, चिडचिड होणे हे त्रास होऊ शकतात.
ग्रॅप -III उपायांचा एक भाग म्हणून, अनेक बांधकाम प्रकल्पांवर कडक बंदी घालण्यात येणार आहे ज्यामध्ये मातीकाम, उत्खनन, बांधकामे पाडणे, ड्रिलिंग, सीवर लाईन टाकणे, वीट टाकणे, रस्ते बांधणे, फ्लोअरिंग, पेंटिंग, डस्टर वाहतूक आणि मुख्य वेल्डिंग ऑपरेशन समाविष्ट आहेत. शहर सिमेंटिंग, पेंटिंग, वार्निशिंग, फरशा कापणे, वॉटर प्रूफिंग आणि “धूळ निर्माण करणारे साहित्य” लोड करणे किंवा उतरवणे यासारख्या कामांवरही बंदी घालण्यात येईल. तथापि, प्रकल्प रेल्वे, मेट्रो, विमानतळ, रुग्णालये किंवा इतर ‘रेषीय’ सार्वजनिक रस्ते प्रकल्पांना मात्र परवानगी आहे.
सीक्यूएएमने जारी केलेल्या आदेशात असेही नमूद करण्यात आले आहे की “EVs/CNG/BS-VI डिझेल व्यतिरिक्त एनसीआर मधील आंतर-राज्य बसेसना दिल्लीत प्रवेश करण्यास परवानगी मिळणार नाही.”
दिल्ली, गुडगाव, फरीदाबाद, नोएडा आणि लगतच्या भागातून BS-III पेट्रोल किंवा BS-IV डिझेलवर चालणारी कोणतीही कार किंवा हलके मोटार वाहन (LMV) संपूर्ण NCR मध्ये चालवण्यास परवानगी दिली जाणार नाही. हे निर्बंध ट्रक आणि माल वाहकांसाठी देखील लागू आहेत, जिथे BS-III आणि त्याखालील डिझेलवर चालणारी वाहने जी दिल्लीबाहेर नोंदणीकृत आहेत, त्यांना शहरात प्रवेश दिला जाणार नाही, जोपर्यंत ते आवश्यक वस्तू घेऊन जात नाहीत.
प्रदूषित हवेशी लोकांचा संपर्क कमी करण्यासाठी, ग्रॅप -III ने राज्यांना प्राथमिक शाळेतील मुलांसाठी रोजचे प्रत्यक्ष उपस्थिती वर्ग बंद करून ऑनलाइन मोडवर जाण्याची शिफारस केली आहे. परंतु हा अनिवार्य उपाय नाही. त्याचप्रमाणे, लोकांना अधिक सार्वजनिक वाहतूक आणि कारचा वापर कमी करण्यास प्रवृत्त करण्यासाठी, सरकार सार्वजनिक वाहतुकीचे भिन्न दर लागू करेल, असेही आदेशात म्हटले आहे.
हवेची खराब गुणवत्ता कायम राहिल्यास आणि ग्रॅप -IV उपाय 450 वरील AQI नंतर लागू केले गेल्यास, हे उपाय अधिक तीव्र होतील आणि अत्यावश्यक आणि रेखीय बांधकाम प्रकल्पांसह अधिक उद्योग बंद होतील. ग्रॅप शिफारशींनुसार, यामुळे कार्यालये 50 टक्के कर्मचारी उपस्थितीत किंवा पूर्ण घरून काम करतील.
डॉ. चॅटर्जी म्हणतात की वैयक्तिक स्तरावर लोकांनी शक्य तितके घराबाहेर जाणे टाळले पाहिजे, अतिरिक्त व्यायाम करणेदेखील शक्यतो टाळावे. एअर प्युरिफायर आणि मास्कचा वापर करावा. CAQM द्वारे ग्रॅप उपायदेखील, हाच मार्ग सुचवतात.
तापमानात घट आणि धुके
10 ऑक्टोबरपासून, IMD च्या द्विसाप्ताहिक हवामान अंदाजानुसार उत्तर भारतातील तापमान सीझनच्या सामान्य तापमानापेक्षा किमान 2-5 अंश सेल्सिअस जास्त होते, ज्यामुळे दिल्लीतही दिवाळी खूप उबदार होती.
उबदार तापमान देखील कमी धुके असले तर अप्रत्यक्षपणे प्रदूषण कमी होते कारण उबदार हवा एरोसोल आणि प्रदूषकांचे विघटन करते आणि ते जास्त काळ हवेत राहू देत नाही. 12 नोव्हेंबरपर्यंत कमाल तापमान 30-33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 14-19 अंश सेल्सिअस राहिले, जे सामान्यपेक्षा 3-5 अंश सेल्सिअसने जास्त होते.
मंगळवारी सकाळी, दिल्ली दाट धुक्याने लपेटली गेली होती. थोडेसे थंड हवामानदेखील होते. धुक्यामुळे तापमान कमी होण्यास हातभार लागला, जे नोव्हेंबर महिन्यात सामान्यपेक्षा जास्त होते.
13 नोव्हेंबर रोजी धुक्यानंतर दिल्लीतील कमाल तापमान 26-28 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, तर किमान तापमान 11-17 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, जे या हंगामातील सामान्य तापमानापेक्षा केवळ 1-3 अंशांनी जास्त आहे. अमृतसर ते अयोध्येपर्यंत पसरलेल्या उत्तर भारतातील बहुतेक धुक्याच्या स्थितीव्यतिरिक्त, आयएमडी –(IMD) ने नोंदवले की वाऱ्याचा वेग 10kmph पेक्षा कमी होता ज्यामुळे संपूर्ण शहरात धुके कायम होते.
“वाढलेली प्रदूषण पातळी हे स्थानिक उत्सर्जनाचे संयोजन आहे तसेच पेंढा जाळण्यामुळे हे जास्त वाढले आहे. “ असे थिंक टँक एन्व्हायरोकॅटलिस्ट्सचे संस्थापक आणि प्रमुख विश्लेषक सुनील दहिया म्हणाले. “काल पेंढा जाळण्याच्या घटना घडल्या आणि वाऱ्याची मुख्य दिशा उत्तर-पश्चिम, म्हणजे हरियाणा-पंजाब बाजूने येत होती.”
13 नोव्हेंबर रोजी, दिल्लीच्या वायू प्रदूषणावर नजर ठेवणाऱ्या IITM पुणेच्या निर्णय समर्थन प्रणाली (DSS) नुसार, दिल्लीच्या वायू प्रदूषणात 30 टक्के योगदान हे जाळण्याच्या क्रियांचे होते.
आनंद विहार सारख्या उच्च प्रदूषित स्थानकांनी नोव्हेंबरच्या सुरूवातीपासूनच 400 पेक्षा जास्त AQI पाहिला, 13 नोव्हेंबरला 461 हा महिन्यातील सर्वात वाईट AQI होता. पण ITO (408), नॉर्थ कॅम्पस (404), आणि IGI विमानतळ (आयजीआय) सारख्या ठिकाणी देखील 449) 14 नोव्हेंबर रोजी वायू प्रदूषणाची ‘गंभीर’ पातळी नोंदवली गेली, द्वारकामध्ये गुरुवारी शहरातील सर्वात वाईट AQI 471 होता.
हिवाळ्यात, ‘टेम्परेचर इन्व्हर्जन’मुळे धुके वाढण्याची शक्यता असते. रात्रीच्या वेळी जमीन थंड झाल्यावर जमिनीवरील हवेचा पातळ थरही थंड होतो, तर त्याच्या अगदी वरची हवा अधिक गरम होते. . त्यामुळे थंड हवेच्या थरात अडकलेले कोणतेही धुके, एरोसोल आणि विविध स्त्रोतांचे प्रदूषक बाहेर पडू शकत नाहीत, कारण थंड हवा अधिक घन असते आणि उबदार हवेच्या वर जाऊ शकत नाही. पृष्ठभागाजवळील प्रदूषक आणि धुक्याची घनता सूर्यप्रकाशात अडथळा आणते, ज्यामुळे तापमान कमी होते आणि त्याच वेळी दृश्यमानता कमी होते.
IMD ने जारी केलेले नकाशे उत्तर-पश्चिम भारत धुक्यात झाकलेले प्रदेश दाखवतात. नकाशात ते फिकट निळ्या रंगात दर्शवले आहेत. डेटा दर्शवितो की अमृतसर, बरेली, हिंडन आणि कुशीनगर सारख्या विमानतळांवर 14 नोव्हेंबरच्या सकाळी 0 दृश्यमानता नोंदवली गेली, ज्यामुळे हवाई वाहतूक आणि फ्लाइटवर आमूलाग्र परिणाम झाला. तरीही, प्रदूषणाच्या बाबतीत, दिल्लीतील 426 AQI देशभरात सर्वात वाईट राहिले, चंदीगड 412 AQI वर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
“हे स्पष्ट आहे की दिल्लीवरील दृश्यमानता कमी होणे हे केवळ धुके नाही तर धूर व धुके याचे मिश्रण, म्हणजे प्रदूषित धुके आहे. प्रदूषणाची पातळी गंभीर झाली आहे आणि ग्रॅप -III उपायाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे,” दहिया म्हणाले.
Recent Comments