scorecardresearch
Thursday, 25 December, 2025
घरदेशआगीच्या भीतीने जळगावात प्रवाशांनी ट्रेनमधून उडी मारल्याने 11 जणांचा मृत्यू

आगीच्या भीतीने जळगावात प्रवाशांनी ट्रेनमधून उडी मारल्याने 11 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी आगीच्या भीतीने स्टेशनरी पुष्पक एक्सप्रेसमधून उडी मारल्याने किमान 11 जणांचा मृत्यू झाला आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने त्यांना चिरडले.

मुंबई: जळगाव जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी आगीच्या भीतीने स्टेशनरी पुष्पक एक्सप्रेसमधून उडी मारल्याने 11 जणांचा मृत्यू झाला आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनने त्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की आणखी 11 जण जखमी आहेत, त्यापैकी चार गंभीर जखमी आहेत. उर्वरितांना किरकोळ फ्रॅक्चर आणि जखमा आहेत.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी एका निवेदनात म्हटले आहे की जळगावमधील परधंडे आणि माहेजी रेल्वे स्थानकांदरम्यान लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये साखळी ओढण्यात आल्याची तक्रार आली आहे.

“अलार्मची साखळी ओढल्यानंतर ट्रेन थांबली. त्यानंतर एका डब्यातील काही प्रवासी ट्रेनमधून खाली उतरले. त्याचवेळी, बंगळुरू-दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस विरुद्ध दिशेने जात होती,” नीला म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, मध्य रेल्वेने स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवल्या आहेत. भुसावळ विभागातून एक अपघात मदत गाडीही मार्गस्थ झाली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’द्वारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आठ रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत आणि जळगावचे सामान्य रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालये सज्ज आहेत. फ्लडलाइट्ससारखी आपत्कालीन साधने तयार ठेवण्यात आली आहेत. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि विलंब न करता सर्व आवश्यक मदत पुरवली जात आहे. मी जिल्हा प्रशासनाशी सतत संपर्कात आहे.”

जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी फडणवीस दावोस येथे असताना, त्यांनी सांगितले की, भाजप मंत्री गिरीश महाजन जळगावचे पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.

अपघाताची घटना हाय-स्पीड झोनमध्ये 

जळगावचे जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, की “ही घटना सायंकाळी 4:40 वाजता घडली आणि जिल्हा प्रशासनाला 5:15 वाजता सतर्क करण्यात आले. पहिली रुग्णवाहिका सायंकाळी 5:26 वाजता घटनास्थळी पोहोचली आणि 6:20 वाजता आम्ही बचावकार्य पूर्ण केले आणि घटनास्थळ रिकामे केले. हा अपघात अशा ठिकाणी झाला जो रेल्वेसाठी हाय-स्पीड झोन आहे. या भागात गाड्या ताशी सुमारे 120 किमी वेगाने धावतात,” असे ते म्हणाले. अपघातस्थळ कोणत्याही निवासी वस्तीजवळ नव्हते आणि शेतातून जात होते. त्यांनी सांगितले की, साखळी ओढल्यानंतर दोन्ही बाजूंच्या रुळांवरून सुमारे १०० प्रवाशांनी उड्या मारल्या. “इंजिनच्या मागे एक सामान्य डबा होता आणि बळी पडलेले बहुतेक गरीब कामगार होते.”

“जिल्हा प्रशासनाने अग्निशामक यंत्रेदेखील पाठवली, जी वापरावी लागली नाहीत. कधीकधी लोक चाकाखाली अडकतात म्हणून काच कापणारे यंत्र पाठवण्यात आले होते, परंतु त्यांचा वापर करण्याची आवश्यकता नव्हती.” असे प्रसाद म्हणाले. “दोन्ही गाड्या संध्याकाळी 6:20 वाजता पुन्हा सुरू झाल्या. सध्या आमच्याकडे 20 पोलिस कॉन्स्टेबल मृतदेहांच्या अवयवांचा शोध घेत आहेत. फॉरेन्सिक टीमदेखील घटनास्थळी दाखल झाली आहे.”असेही त्यांनी सांगितले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments