मुंबई: बुधवारी दुपारी 3.55 वाजता मुंबई बंदराजवळ शंभरहून अधिक प्रवासी आणि पाच क्रू मेंबर्स घेऊन जाणारी नौका भारतीय नौदलाच्या जहाजाला धडकून उलटून 13 जणांचा मृत्यू झाला. जहाजाला धडकल्याने नौका उलटली.
गेटवे ऑफ इंडियावरून प्रवाशांना एलिफंटा बेटावर नेत असताना उरण-कारंजाजवळ नीलकमल नावाची प्रवासी बोट उलटली. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी ) नुसार रात्री 9 वाजेपर्यंत, 114 लोकांना वाचवण्यात आले, त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला, चार जणांची प्रकृती गंभीर आणि 97 जणांची प्रकृती स्थिर आहे.
भारतीय नौदलाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “इंजिन चाचणी घेत असलेल्या नौदलाच्या जहाजावरचे नियंत्रण सुटले आणि कारंजा, मुंबईजवळ नीलकमल या प्रवासी नौकेला ते धडकले.” नौदलाकडून मिळालेल्या माहितीचा हवाला देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांना सांगितले की, या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 13 जणांपैकी 10 नागरिक प्रवासी आहेत, तर तीन भारतीय नौदलातील आहेत.महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
फडणवीस म्हणाले, “मदतकार्य अजूनही सुरू असून उद्यापर्यंत अधिक स्पष्टता येईल. यासाठी संपूर्ण राज्य प्रशासन काम करत आहे. महाराष्ट्र सरकार तसेच भारतीय नौदल या अपघाताची सखोल चौकशी करेल.””त्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार इंजिनच्या थ्रोटलमध्ये काही समस्या होती आणि त्यामुळे तिचे नियंत्रण सुटले आणि ती नीलकमल बोटीला धडकली,” फडणवीस म्हणाले.
बचाव कार्य
अपघाताचे वृत्त समजताच मुंबई पोलीस, तटरक्षक दल, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, भारतीय नौदल आणि स्थानिक मासेमारी समुदायाच्या पथकांनी मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. भारतीय नौदलाच्या निवेदनात म्हटले आहे की चार नौदल हेलिकॉप्टर्स, 11 नौदल क्राफ्ट्स, एक तटरक्षक नौका आणि तीन सागरी पोलिस नौका बचाव कार्य करत आहेत.
“नेव्ही आणि सिव्हिल क्राफ्टने या भागातील वाचलेल्यांना आसपासच्या जेटी आणि हॉस्पिटल्मसध्ये हलवले आहे. या दुर्घटनेत नौदलाच्या विमानातील एक नौदल व्यक्ती आणि दोन ओईएम यांच्यासह 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. “असे नौदलाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Recent Comments