नवी दिल्ली: भारतात 2022 च्या तुलनेत गेल्या वर्षी वाघांच्या मृत्यूत 50 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती केंद्र सरकारने सोमवारी संसदेत दिली. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEFCC) च्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये 121 वरून 2023 मध्ये वाघांच्या मृत्यूची संख्या 182 वर पोहोचली.
देशभरात वाघांच्या मृत्यूबद्दल लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामधील राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी गेल्या तीन वर्षांतील वाघांच्या एकूण मृत्यूची राज्यवार आकडेवारी सादर केली.
सिंग यांनी सादर केलेल्या अहवालावरून असे दिसून येते की यापैकी 75 टक्के मृत्यू पाच राज्यांमध्ये – महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू आणि केरळमध्ये झाले आहेत. महाराष्ट्र, 46 वाघांच्या मृत्यूसह, मध्य प्रदेशपेक्षा थोड्या फरकाने आघाडीवर आहे, ज्याने 43 व्या क्रमांकावर दुसरा क्रमांक पटकावला आहे. उत्तराखंड 21 मृत्यूंसह तिस-या स्थानावर आहे, जे मध्यप्रदेशच्या एकूण निम्मे आहे.
या राज्यांच्या सरकारी मदतीत लक्षणीय वाढ होऊनही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात वाघांच्या मृत्यूची संख्या धक्कादायक आहे. 2023 ते 2024 दरम्यान, महाराष्ट्राचा निधी 3,956 लाख रुपयांवरून 4,303 लाख रुपयांवर 9 टक्क्यांनी वाढला, तर मध्य प्रदेशात 223 टक्क्यांची वाढ झाली, आणि निधी 809 लाख रुपयांवरून 2,614 लाख रुपयांपर्यंत वाढला.
हे निधी शिकारप्रतिबंध ,व्याघ्र संवर्धन, अधिवास व्यवस्थापन, पर्यावरण विकास, मानव संसाधन आणि पायाभूत सुविधांचा विकास आणि दोन्ही राज्यांमध्ये स्वैच्छिक गाव पुनर्संचयनाच्या प्रयत्नांना मदत करतात.
तामिळनाडू आणि उत्तराखंडमध्ये वाघांच्या मृत्यूमध्ये आश्चर्यकारक वाढ झाल्याचेही सरकारी अहवालातून स्पष्ट होते. 2023 मधील राष्ट्रीय सरासरी 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मृत्यूदरात लक्षणीय वाढ झालेल्या इतर राज्यांमध्ये केरळ आणि उत्तरप्रदेश यांचा समावेश आहे. तर आसाम आणि महाराष्ट्रात अनुक्रमे 67 टक्के आणि 64 टक्के वाढ झाली आहे .
वाघांच्या मृत्यूची वाढती प्रवृत्ती असूनही, या मृत्यूंची नेमकी कारणे काय आहेत याविषयी अजूनही पुरेशी माहिती उपलब्ध नाही. 2023 मध्ये एकूण प्रकरणांपैकी केवळ 14 टक्के प्रकरणांमध्ये नेमके कारण नोंदवले गेले. 25 पुष्टी झालेल्या प्रकरणांपैकी, 12 मृत्यूंसह शिकार हे प्रमुख कारण आहे, तर बाकीची कारणे अनैसर्गिक आहेत.
वाघांसह वन्य प्राण्यांच्या मृत्यूची कारणे शोधणे कठीण असल्याचे वन्यजीव संरक्षकांनी अधोरेखित केले आहे.
“बहुतेक शव कुजण्याच्या प्रगत अवस्थेत आढळतात, ज्यामुळे मृत्यूचे नेमके कारण निश्चित करणे कठीण होते,” असे यादवेंद्रदेव विक्रमसिंह झाला, नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस (NCBS), बेंगळुरूचे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणाले. त्यांनी स्पष्ट केले की ही संख्या किमान मृत्यूचे प्रतिनिधित्व करते आणि वास्तविक मृत्यूची संख्या जवळपास दुप्पट असू शकते. जोपर्यंत वाघांची घनता आणि संख्या स्थिर आहे किंवा वाढत आहे तोपर्यंत मृत्यू हा चिंतेचा विषय नसावा, असे ते म्हणाले.
सरकारी आकडेवारीनुसार, 2006 ते 2022 दरम्यान भारतातील वाघांची संख्या दरवर्षी सुमारे 10 टक्के दराने वाढली आहे. 2022 मधील शेवटच्या व्याघ्र गणनेत भारतातील पट्टेरी मांजरीची लोकसंख्या 3 हजार 682 होती.
तथापि, झाला यांनी अवैधरित्या व्यापार केलेल्या वन्य प्राण्यांच्या अवशेषांचा मागोवा घेण्यात अडचणी आल्याचे कारण देत शिकारीविरूद्ध सावध राहण्याचा इशारा अधिकाऱ्यांना दिला. ते म्हणाले, “व्यावसायिक शिकारीमुळे लोकसंख्या कमी वेळात नष्ट होऊ शकते आणि व्यवस्थापनाने त्याविरुद्ध नेहमीच सतर्क राहिले पाहिजे.” “शिकारी केलेले शव क्वचितच सापडतात कारण वाघांच्या शरीराच्या बहुतेक अवयवांची विक्री शिकारी भारताबाहेर विक्रीसाठी करतात.”
Recent Comments