scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरदेशपगारात विलंबामुळे शिक्षकांचा राजीनामा, आठ जेईई कोचिंग केंद्रे बंद

पगारात विलंबामुळे शिक्षकांचा राजीनामा, आठ जेईई कोचिंग केंद्रे बंद

मेरठ, गाझियाबाद, लखनौ, वाराणसी, भोपाळ, पटना आणि दिल्ली येथे केंद्रे बंद पडली आहेत, असे कळते. पालकांनी शुल्क परतफेडीची मागणी केली आहे.

नवी दिल्ली: पगार मिळण्यास सतत विलंब होत राहिल्यानंतर 38 वर्षीय जितेंद्र यांनी 2021 मध्ये एफआयआयटी-जेईईमधील (फिटजी) शिक्षकाची नोकरी सोडली. पाच वर्षांहून अधिक काळ काम केल्यानंतर, निघून जाण्याचा निर्णय सोपा नव्हता, परंतु त्यांना अंदाज होता की संस्थेतील परिस्थिती कालांतराने आणखी बिकट होईल.

“त्यांनी पगारात कपात करण्यास सुरुवात केली आणि प्रवेश बैठकीदरम्यान प्रचंड दबाव आणण्यास सुरुवात केली. वरिष्ठ शिक्षक संवाद साधताना ज्या प्रकारची भाषा वापरतात ते सर्वांनी ऐकले आहे. आता इतक्या शिक्षकांनी राजीनामा दिला आहे यात आश्चर्य नाही,” असे जितेंद्र म्हणाले. ते सध्या दिल्लीतील एका वेगळ्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये भौतिकशास्त्र शिकवतात.

गेल्या आठवड्यात, जेईई कोचिंगसाठी आघाडीची संस्था ‘फिटजी’मधील शिक्षक आर्थिक अडचणी आणि गैरव्यवस्थापनाच्या विरोधात निषेध करत आहेत. जितेंद्र यांच्यासारख्या अनेकांनी राजीनामा दिला आहे, ज्यामुळे उत्तर प्रदेशातील मेरठ, गाझियाबाद, लखनौ आणि वाराणसी, मध्य प्रदेशातील भोपाळ आणि बिहारमधील पटना आणि दिल्लीतील लक्ष्मीनगर यासारख्या हिंदी पट्ट्यातील केंद्रे बंद करण्यात आली आहेत. फिटजी संपूर्ण भारतात सुमारे 72 केंद्रे चालवते, परंतु सध्याच्या संकटामुळे त्यापैकी आठ केंद्रे बंद आहेत.

या परिस्थितीमुळे कोचिंग उद्योगातील वाढता असंतोष अधोरेखित होत आहे, ज्यामुळे शिक्षकांचा असंतोष, कामकाजातील आव्हाने आणि भारतातील खाजगी शिक्षण क्षेत्राची अनिश्चित स्थिती यासारखे खोलवरचे मुद्दे समोर येत आहेत. बोर्ड परीक्षा अगदी जवळ आल्या असतानाच हे बंद करण्यात आले आहे. ‘फिटजी’ सध्या आर्थिक अडचणींशी झुंजत आहे, नियामक समस्यांमुळे ते आणखीनच बिकट झाले आहेत. फिटजीमधील एका सूत्राने दिलेल्या अग्निसुरक्षा आणि परवाना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्या शाखांविरुद्ध काही नागरी कारवाईचा सामना करत असल्याने काही प्रशासकीय समस्यादेखील आहेत.

“गेल्या एका वर्षात, मला फक्त पाच महिन्यांचा पगार मिळाला, आणि तोही वेतन कपातीसह. माझे 15 लाख रुपये फिटजीमध्ये अडकले आहेत, आणि मी अनेक ईमेल पाठवले आहेत, परंतु कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही,” असे दोन महिन्यांपूर्वी राजीनामा दिलेल्या एका शिक्षकाने सांगितले. शिक्षकाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका ऑनलाइन बैठकीचाही उल्लेख केला, ज्यामध्ये फिटजीचे अध्यक्ष डी.के. गोयल यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. “मी त्या बैठकीचा भाग होतो आणि त्यांच्याकडून गैरवर्तन होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. अधिकाधिक प्रवेश मिळवून देण्यासाठी सतत दबाव होता,” असे शिक्षक पुढे म्हणाले.

अनेक फिटजी केंद्रे बंद झाल्यामुळे, हजारो विद्यार्थी आणि पालक परीक्षेपूर्वी अडचणीत सापडले आहेत. “माझ्या मुलीला गेल्या वर्षी नोएडा येथील त्यांच्या केंद्रात प्रवेश देण्यात आला होता आणि मी तिच्या कोचिंगसाठी 3 लाख रुपये दिले होते. आता त्यांनी केंद्र बंद केले आहे. माझ्या मुलीचा अभ्यास धोक्यात आहे. ही समस्या कोण सोडवणार?” ज्यांची मुलगी फिटजीमध्ये शिकत होती अशा एका चिंताग्रस्त वडिलांनी हे सांगितले. कोचिंगसाठी 6 लाख रुपये भरणाऱ्या दुसऱ्या वडिलांनी सांगितले की, “शिक्षकांनी राजीनामा देऊनही, संस्थेने वर्ग सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. पण आम्हाला संस्थेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही,” ते म्हणाले.

अशा परिस्थितीत, पालकांनी स्थानिक पोलिसांकडे संपर्क साधला आहे आणि फिटजी कडून शुल्क परतफेडीची  मागणी केली आहे. दरम्यान, जितेंद्र म्हणाले की त्यांना संस्थेकडून कधीही ग्रॅच्युइटीचे पैसे मिळाले नाहीत. “मी राजीनामा देऊन तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे आणि मला माझी ग्रॅच्युइटी मिळालेली नाही, जी एक मोठी रक्कम आहे. जेव्हा जेव्हा मी त्यांच्याशी संपर्क साधतो तेव्हा ते म्हणतात की त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे,” ते म्हणाले.

जितेंद्र यांना मिळालेल्या एका ईमेलमध्ये, फिटजीने म्हटले आहे: “आम्ही आमचे आर्थिक व्यवहार स्थिर करण्यासाठी आणि या कठीण काळातून मार्ग काढण्यासाठी सक्रियपणे काम करत आहोत. प्रक्रियेला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला आहे. परिणामी, आम्ही एकाच वेळी सर्व पूर्ण आणि अंतिम सेटलमेंट प्रक्रिया करू शकत नाही. व्यवस्थापनाने संस्थेचे आर्थिक आरोग्य सुनिश्चित करताना आर्थिक जबाबदाऱ्या पद्धतशीरपणे पूर्ण करण्याची योजना आखली आहे.”

परंतु, असे अनेक शिक्षक आहेत ज्यांनी आरोप केला आहे की संस्थेने त्यांच्या ईमेल किंवा कॉलला प्रतिसाद दिला नाही. “मी माझ्या प्रलंबित पेमेंटबद्दल अनेक ईमेल पाठवले आहेत, परंतु मला कोणतेही उत्तर मिळाले नाही. माझे 15 लाख रुपयांचे वेतन प्रलंबित आहे.” एक शिक्षक म्हणाले. त्यांनी दोनच महिन्यांपूर्ची फिटजीचा राजीनामा दिला आहे.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments