scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरदेश‘केंद्र आणि राज्य सरकार मणिपूरमध्ये 'सुरक्षा सुनिश्चित करण्यात अयशस्वी': अभाविप

‘केंद्र आणि राज्य सरकार मणिपूरमध्ये ‘सुरक्षा सुनिश्चित करण्यात अयशस्वी’: अभाविप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मणिपूर विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून सुरू झालेला तब्बल 19 महिने चाललेला हिंसाचार हा 'दुर्दैवी' आहे.

नवी दिल्ली: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (आरएसएसची विद्यार्थी शाखा) सोमवारी मणिपूर राज्यात “सुरक्षा सुनिश्चित करण्यात अपयशी ठरल्याबद्दल मणिपूर आणि केंद्र सरकार दोघांवरही टीका केली. आदल्या दिवशी, संघाच्या मणिपूर युनिटने देखील केंद्र आणि राज्य सरकारांना सध्या सुरू असलेल्या संकटाचे निराकरण करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची विनंती करणारे निवेदन दिले.

“3 मे 2023 पासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार अत्यंत दुर्दैवी आहे.  तीन स्त्रिया आणि तीन मुलांसह सहा निष्पाप नागरिकांचे अपहरण आणि हत्या होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात सात महिन्यांच्या अर्भकाचाही समावेश आहे. अभाविप मणिपूर सहा अपहृत व्यक्तींच्या निर्घृण हत्येचा, सशस्त्र अतिरेक्यांनी घरे जाळणे, झिरीबाममध्ये पोलिस आणि सीआरपीएफ जवानांवर हल्ले होणे  या घटनांचा तीव्र निषेध करते ” असे अभाविपने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे.

लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या नेत्यांच्या मालमत्तेचा नाश “क्रोधीत जमावाने” करणे “खूप त्रासदायक” असल्याचे सांगून, वेळीच हस्तक्षेप केल्यास सहा जणांचे प्राण वाचू शकले असते, असेही अभाविपचे म्हणणे आहे.”संबंधित अधिकारी त्यांच्या कर्तव्यात अपयशी ठरले आहेत आणि मणिपूरमध्ये सुरक्षा आणि सामान्य स्थिती सुनिश्चित करण्यात राज्य आणि केंद्र सरकार अपयशी ठरले आहे” असे त्यात म्हटले आहे.

जिरीबामजवळ मृतदेह सापडल्यानंतर मणिपूरमध्ये हिंसाचार आणि निषेध वाढला आहे. काही मृतदेह सहा जणांच्या कुटुंबातील महिला आणि मुलांचे असल्याचे मानले जाते, ज्यांना 11 नोव्हेंबर रोजी जिरीबाम येथील मदत शिबिरातून संशयित सशस्त्र पुरुषांनी नेले होते. मणिपूरमध्ये कुकी-मेईतेई संघर्षात दोन्ही बाजूंच्या जीवितहानीसह मृतांची संख्या 20 वर पोहोचली आहे.

अभाविपने मणिपूरमध्ये शांतता आणि सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी ‘त्वरित कारवाई’ करण्याची मागणी केली आहे.

“आम्ही शांतता आणि सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी, निष्पाप नागरिकांचे संरक्षण, अयशस्वी प्रतिसादासाठी उत्तरदायित्वासाठी त्वरित कारवाईची मागणी करतो. आम्ही जनतेला देखील आवाहन करतो: या आव्हानात्मक काळात आम्ही संयम आणि शांततेचे आवाहन करतो. चला हिंसेच्या विरोधात एकत्र उभे राहू आणि सामंजस्यपूर्ण मणिपूरसाठी काम करूया. अभाविप  मणिपूर पीडित कुटुंबांसोबत एकजुटीने उभे आहे आणि पुढील अशांतता टाळण्यासाठी त्वरीत कारवाईची मागणी करत आहे ,” असे त्यात पुढे म्हटले आहे.

“सध्या सुरू असलेल्या हिंसाचारामुळे निरपराध लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मणिपूर महिला आणि बालकांना कैदेत नेऊन मारण्याच्या अमानुष, क्रूर आणि निर्दयी कृत्याचा तीव्र निषेध करतो. हे कृत्य भ्याड असून मानवता आणि सहअस्तित्वाच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. केंद्र आणि राज्य सरकारने ‘प्रामाणिकपणे’ सुरू असलेला संघर्ष लवकरात लवकर सोडवावा,” असे त्यात म्हटले आहे.

नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) च्या सात आमदारांनी मणिपूरमधील एन. बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी (भाजप) सरकारला राज्यातील अस्थिर परिस्थिती आणि संकट सोडवण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्याचे कारण देत पाठिंबा काढून घेतला आहे.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments