scorecardresearch
Thursday, 25 December, 2025
घरदेशलाल किल्ल्यावरील स्फोटातील कार पुलवामा येथील डॉक्टरशी संबंधित, ‘फरीदाबाद मॉड्यूल’ची पुनरावृत्ती

लाल किल्ल्यावरील स्फोटातील कार पुलवामा येथील डॉक्टरशी संबंधित, ‘फरीदाबाद मॉड्यूल’ची पुनरावृत्ती

सोमवारी झालेल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनवरील स्फोटात वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची ह्युंदाई आय 20 ही गाडी पुलवामा येथील एका डॉक्टरशी संबंधित असल्याचे तपासकर्त्यांना आढळले आहे. त्यामुळे मध्य दिल्लीतील  हल्ल्याचा आणि त्याच दिवशी फरिदाबादमध्ये झालेल्या छाप्यांचा थेट संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे.

नवी दिल्ली: सोमवारी झालेल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनवरील स्फोटात वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची ह्युंदाई आय 20 ही गाडी पुलवामा येथील एका डॉक्टरशी संबंधित असल्याचे तपासकर्त्यांना आढळले आहे. त्यामुळे मध्य दिल्लीतील  हल्ल्याचा आणि त्याच दिवशी फरिदाबादमध्ये झालेल्या छाप्यांचा थेट संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे. मध्य दिल्लीतील त्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता. या गाडीचा सध्याचा मालक उमर मोहम्मद असल्याचे समजले आहे. उमर हा पुलवामा येथील डॉक्टर आहे. सोमवारी फरिदाबादमध्ये झालेल्या छाप्यापूर्वी अटक करण्यात आलेल्या दोन डॉक्टरांच्याच दहशतवादी नेटवर्कशी तो संबंधित असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

“तो त्याच दहशतवादी गटाचा आहे. अटकेनंतर तो घाबरला. त्याने त्याच्या सहकाऱ्यांसह एक डिटोनेटर ठेवला आणि हे दहशतवादी कृत्य केले,” असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस आता उमरचा शोध घेत आहेत. आणि तो मृतांमध्ये आहे का, याचा तपास आता चालू आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळील लाल दिव्याजवळ संध्याकाळी 6.50 वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. सूत्रांनी सांगितले, की स्फोटात अमोनियम नायट्रेट इंधन तेल (एएनएफओ) वापरण्यात आले होते. “हे फरिदाबादमधून जप्त केलेल्या शस्त्रास्त्रे आणि स्फोटक पदार्थांच्या साठ्याशी निगडीत आहे, जे अमोनियम नायट्रेट असल्याचे आढळले आहे,” असे सूत्रांनी सांगितले.

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणा पोलिसांसह, फरिदाबादमधील फतेहपूर तागा गावात डॉक्टर मुझम्मिल शकील यांनी भाड्याने घेतलेल्या दोन घरांवर छापा टाकला, तेव्हा 2 हजार 500 किलो आयईडी बनवण्याचे साहित्य जप्त केले होते. या जप्तीमध्ये सुमारे 360 किलो अत्यंत ज्वलनशील पदार्थ, जो अमोनियम नायट्रेट असल्याचा संशय आहे, तसेच रसायने, अभिकर्मक, इलेक्ट्रॉनिक सर्किट, बॅटरी, वायर, रिमोट कंट्रोल, टायमर आणि धातूच्या ब्लँकेट्सचा समावेश होता. छाप्यापूर्वी शकीलला आणखी एक डॉक्टर आदिल अहमद राठर यांच्यासह अटक करण्यात आली होती.

तपासकर्त्यांनी कारची मालकी कोणाकडे होती, याचाही शोध घेतला. सूत्रांनी सांगितले, की या गाडीचा मूळ मालक सलमान होता. त्याने ती गाडी उमरने खरेदी करण्यापूर्वी देवेंदरला विकली होती.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments