scorecardresearch
Sunday, 7 September, 2025
घरराजनैतिक‘परस्पर सहकार्य दोन्ही देशांना फायदेशीर’: बीजिंगमध्ये एस जयशंकर यांचे प्रतिपादन

‘परस्पर सहकार्य दोन्ही देशांना फायदेशीर’: बीजिंगमध्ये एस जयशंकर यांचे प्रतिपादन

परराष्ट्रमंत्री 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत, 2020 च्या गलवान संघर्षानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. एससीओ बैठकीसाठी तियानजिनला जाण्यापूर्वी ते चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना भेटणार आहेत.

नवी दिल्ली: सोमवारी चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या भेटीदरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, की, ‘नवी दिल्ली आणि बीजिंगमधील संबंध सकारात्मक राहतील असा त्यांना विश्वास आहे’. “आमच्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा 75 वा वर्धापन दिन आम्ही साजरा केला आहे. कैलास मानसरोवर यात्रेचा पुनरारंभ भारतातही मोठ्या प्रमाणात कौतुकास्पद आहे. आमच्या संबंधांचे सतत सामान्यीकरण परस्पर फायदेशीर परिणाम निर्माण करू शकते,” असे जयशंकर यांनी चीनचे उपराष्ट्रपती हान झेंग यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय भेटीदरम्यान सांगितले.

2020 च्या उन्हाळ्यात गलवानमध्ये दोन्ही देशांमधील संघर्षानंतर जयशंकर यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. मंत्री शेजारच्या देशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत, शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी तियानजिनला जाण्यापूर्वी बीजिंगमध्ये द्विपक्षीय चर्चा करत आहेत. रविवारी, जयशंकर एक दिवसाच्या भेटीसाठी सिंगापूरला गेले. “तुम्ही सांगितल्याप्रमाणे, गेल्या ऑक्टोबरमध्ये कझानमध्ये पंतप्रधान (नरेंद्र) मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या भेटीपासून आमचे द्विपक्षीय संबंध सातत्याने सुधारत आहेत. मला विश्वास आहे, की या भेटीतील माझ्या चर्चा सकारात्मक मार्गावर राहतील,” असे परराष्ट्र मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या निवेदनात म्हटले आहे. जयशंकर सोमवारी उशिरा त्यांचे चिनी समकक्ष वांग यी यांना भेटण्याची अपेक्षा आहे. दोघांची शेवटची भेट फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या जी-20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या वेळी झाली होती. जयशंकर गेल्यावर्षी, विशेषतः जुलै 2024 मध्ये, वांग यांना अनेक वेळा भेटले आहेत, ज्यामुळे अखेर दोन्ही शेजारी देशांमधील संबंधांमध्ये थोडी सुधारणा झाली.

2020 मध्ये गलवानमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंध बिघडत चालले होते. अखेर, 21 ऑक्टोबर 2024 रोजी, भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी घोषणा केली, की नवी दिल्ली आणि बीजिंग यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील घर्षण बिंदूंवर विलगीकरण करण्याचा करार केला आहे. या करारामुळे ऑक्टोबर 2024 मध्ये रशियातील काझान शहरात होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी यांच्यात बैठकीसाठी मार्ग मोकळा झाला. तेव्हापासून, भारत आणि चीनमधील अनेक यंत्रणा पुन्हा कार्यरत झाल्या आहेत, ज्यात सीमा प्रश्नावरील विशेष प्रतिनिधी यंत्रणा आणि परराष्ट्र सचिव-उपमंत्री यंत्रणा यांचा समावेश आहे. भारत आणि चीनचे एस.आर नेते अजित डोवाल आणि वांग यी यांनी गेल्या डिसेंबरमध्ये बीजिंगमध्ये भेट घेतली होती, तर मिस्री जानेवारी 2025 मध्ये उप-परराष्ट्र मंत्री सन वेइडोंग यांच्याशी चर्चा करण्यासाठी चीनच्या राजधानीत गेले होते. गेल्या महिन्यात, डोवाल आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एस.सी.ओ बैठकीसाठी चीनला गेले होते. दहशतवाद, विशेषतः जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल भाषेचा अभाव असल्याने सिंह यांनी एस.सी.ओमधील संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीतील संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला.

एस.सी.ओ. परराष्ट्र मंत्र्यांची बैठक ही अशा काही प्रसंगी असेल, जिथे भारतीय आणि पाकिस्तानी नेतृत्व एकाच कक्षात असेल. एस.आर. चर्चेच्या पुढील फेरीसाठी वांग यी महिन्याच्या अखेरीस भारतात येण्याची अपेक्षा आहे.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments