scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरदेशदिल्लीच्या रोहिणी येथील पीव्हीआर कॉम्प्लेक्सजवळ स्फोट

दिल्लीच्या रोहिणी येथील पीव्हीआर कॉम्प्लेक्सजवळ स्फोट

पीव्हीआर जवळील एका दुकानाच्या मालकाच्या म्हणण्यानुसार, स्फोट फार मोठा नव्हता आणि घटनास्थळी 'पांढरी पावडर' सापडली होती. स्फोटाच्या संभाव्य कारणाचा पोलीस तपास करत आहेत.

नवी दिल्ली: दुपारच्या काही वेळापूर्वी सिनेमा कॉम्प्लेक्सजवळ स्फोट झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दल गुरुवारी दिल्लीच्या प्रशांत विहारमध्ये दाखल झाले. लोकप्रिय बन्सीवाला स्वीट्सच्या जवळ असलेल्या पीव्हीआर कॉम्प्लेक्सजवळ हा स्फोट झाला.

आज सकाळी 11 वाजून 48 मिनिटांनी  वाजता प्रशांत विहार परिसरातून स्फोट झाल्याचा फोन आला. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पोलीस पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत,” असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने द प्रिंटला सांगितले. दिल्ली पोलिसांचे पीआरओ, अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय कुमार त्यागी यांनी सांगितले की, एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्फोटाच्या संभाव्य कारणाचा तपास करत आहेत.

‘द प्रिंट’शी बोलताना बन्सी वाला स्वीट्सचे मालक अमित गोपाल म्हणाले, “हा फार मोठा स्फोट नव्हता. आमच्या दुकानाजवळ एका कारमध्ये काहीतरी स्फोट झाला. त्यात पांढरी पावडर सापडली आहे. कोणालाही दुखापत झालेली नाही.”अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक अवशेष गोळा करत आहेत. कर्मचारी सुरक्षित आहेत,” असेही त्यांनी सांगितले.

दिल्लीतील रोहिणी येथील सीआरपीएफ शाळेजवळ झालेल्या आणखी एका स्फोटानंतर ही घटना घडली आहे. घटनास्थळावरील व्हिडिओंमध्ये कार आणि दुकानाच्या खिडक्या तुटलेल्या दिसत होत्या, सुरुवातीला क्रूड बॉम्बचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, औद्योगिक कचऱ्यात टाकलेल्या सिगारेटच्या थोटकांमुळे हा स्फोट झाल्याचे तपासात समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुत्रा फिरवणाऱ्या एका माणसाची ओळख पटली ज्याने सिगारेट टाकून दिली, ज्यामुळे कचऱ्याच्या संपर्कात आल्यावर स्फोट झाला. स्फोटाबाबत फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेच्या (एफएसएल) अहवालाची प्रतीक्षा आहे.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments