scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरराजनैतिकयेमेन राष्ट्रपतींकडून केरळमधील नर्सच्या फाशीच्या शिक्षेला मान्यता, भारताकडून प्रतिक्रिया

येमेन राष्ट्रपतींकडून केरळमधील नर्सच्या फाशीच्या शिक्षेला मान्यता, भारताकडून प्रतिक्रिया

येमेनी नागरिक तलाल अब्दो महदीची हत्या आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याबद्दल निमिषा प्रियाला 2020 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्यावर्षी शिक्षेविरुद्धचा तिचा अर्ज फेटाळण्यात आला होता.

नवी दिल्ली:“आम्हाला येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या शिक्षेबद्दल माहिती आहे. आम्ही समजतो की प्रियाचे कुटुंब संबंधित पर्याया पडताळून पाहत आहे. भारत सरकार याप्रकरणी सर्वतोपरी मदत करत आहे”, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

प्रियाला येमेन नागरिक तलाल अब्दो महदीची हत्या तसेच त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट लावल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. 2020 मध्ये या भारतीय परिचारिकेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मार्च 2022 मध्ये, तिचा अर्ज  न्यायालयाने फेटाळला. गेल्या नोव्हेंबरमध्ये येमेनमधील सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेविरुद्ध प्रियाचा अर्ज फेटाळला होता.

यानंतर प्रियाकडे दोन पर्याय उरले होते- राष्ट्रपतींची माफी, किंवा महदीच्या कुटुंबासोबत ‘ब्लड मनी’साठी आर्थिक वाटाघाटी. ब्लड मनी म्हणजे खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला दिलेली आर्थिक भरपाई, जी नंतर गुन्हेगाराला माफी मिळवून देऊ शकेल.

प्रियाच्या आईकडून बोलणीचे प्रयत्न  

प्रियाची आई, प्रेमाकुमारी यांनी दिल्ली उच्च न्यायालयासमोर महदीच्या कुटुंबाशी बोलणी करण्यासाठी येमेनला जाण्याची परवानगी मागितली होती, जी गेल्या वर्षी तिच्या स्वत:च्या जबाबदारीवर मंजूर करण्यात आली होती. ‘सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन कौन्सिल’चे सदस्य सॅम्युअल जेरोम यांच्यासोबत, प्रेमकुमारी यांनी एप्रिलमध्ये येमेनचा प्रवास केला.

देशातील प्रतिकूल राजकीय आणि सुरक्षा परिस्थितीमुळे 2016 पासून भारतीय नागरिकांना येमेनमध्ये जाण्याची परवानगी नाही. भारत सरकार विशिष्ट प्रकरणांमध्ये तसेच अत्यावश्यक प्रवासासाठी बंदी शिथिल करते. बातम्यांनुसार, 24 एप्रिल 2024 रोजी, प्रेमाकुमारी 11 वर्षांनंतर येमेनी तुरुंगात आपल्या मुलीला भेटली. 10 वर्षांपूर्वी गृहयुद्ध सुरू झाल्यापासून हौथी बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या देशाची राजधानी साना येथे प्रेमकुमारी यांनी प्रवास केला होता. ब्लड मनी देण्याबाबतच्या वाटाघाटी सप्टेंबरमध्ये संपुष्टात आल्या.

महदीच्या कुटुंबाने 2022 मध्ये 50 दशलक्ष येमेनी रियालची नुकसानभरपाई म्हणून मागणी केली होती.

निमिषा प्रियाच्या विरोधात केस

प्रिया, तिचा पती टॉमी थॉमससह कामानिमित्त येमेनमध्ये स्थलांतरित झाली. 2014 मध्ये, थॉमस त्यांच्या मुलीसह भारतात परतले, तर प्रिया देशात काम करत राहिली. 2015 मध्ये प्रियाने येमेनमध्ये स्वतःचे क्लिनिक सुरू केले. तेथील कायद्यानुसार परदेशी नागरिकाद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही व्यवसायासाठी भागीदार म्हणून देशांतर्गत नागरिक आवश्यक आहे. प्रियाने महदीशी संपर्क साधला पण नंतर तिने तिचा माजी नियोक्ता अब्दुल लतीफ यांच्यासोबत क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. थॉमसने प्रसारमाध्यम संस्थांना दिलेल्या मुलाखतींमध्ये सांगितले की, महदीने त्याचे नाव क्लिनिकमध्ये शेअरहोल्डर म्हणून जोडले आणि नंतर प्रिया त्याची पत्नी असल्याचा दावा करून बेकायदेशीर कागदपत्रे तयार केली. गृहयुद्धामुळे थॉमस आणि त्यांची मुलगी येमेनला जाऊ शकले नाहीत.

प्रियाने तक्रार केली की, महदीने तिचा पासपोर्ट घेतला आणि तिला भारतात परतण्यापासून रोखून तिच्यावर अत्याचार केला. तिला कोणतीही कायदेशीर मदत मिळाली नसल्याचेही तिने सांगितले. प्रियाने दावा केला की तिने तिचा पासपोर्ट परत मिळवण्याच्या प्रयत्नात महदीला शामक औषधे दिली, परंतु ड्रगच्या ओव्हरडोजमुळे तो कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

महदीच्या मृत्यूनंतर तिने एक मित्र आणि सहकारी परिचारिका हनान  यांच्याशी संपर्क साधला. हनानने कथितरित्या महदीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि पाण्याच्या टाकीत त्याची विल्हेवाट लावली. मुळात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या प्रियाला नंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments