झाशी: “एसएनसीयू”च्या ( नवजात आजारी बालके विभाग)च्या आतील युनिटला फक्त एक लहानसे ओपनिंग होते. प्रवेशद्वार अतिशय लहान आहे. तिथे आत गेल्यावर काही मिनिटांतच मळमळ होऊ लागली. बाळांनी ते कसे सहन केले असेल?” 27 वर्षीय याकूब मन्सूरी म्हणाले.
उत्तर प्रदेशातील झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) ला लागलेल्या भीषण आगीतून बाळांना वाचवून, हमीरपूरच्या रथ तहसीलमधील फर्निचर बनवणारे मन्सुरी हे अनेक कुटुंबांसाठी नायक बनलेल्या पुरुषांपैकी एक आहेत.
हे महाविद्यालय राज्याच्या बुंदेलखंड प्रदेशातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी एक आहे. विद्युत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पुष्पेंद्र यादव, ललित यादव आणि कृपाल सिंग यांसारख्या तरुणांसोबत-सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या असलेल्या मन्सुरी यांनी अनेक नवजात बालकांना वाचवले. तरीही, त्यांनी स्वतःच्या नवजात जुळ्या मुलींना मात्र गमावले, ज्यांचा जन्म काही दिवसांपूर्वीच म्हणजे 9 नोव्हेंबर रोजी झाला होता.
द प्रिंटशी बोलताना मन्सुरी यांनी त्या रात्रीच्या दुःखद घटना सांगितल्या. ओराई जिल्हा रुग्णालयातून बाळांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने विशेष काळजी घेण्यासाठी अतिदक्षता विभागात पाठवण्यात आल्यानंतर त्यांनी पत्नी नजमा बानो आणि जुळ्या मुलींना वैद्यकीय महाविद्यालयात आणले होते.
“ एसएनसीयूमध्ये आपल्या मुलाला दूध पाजणारी एक महिला अचानक आगीबद्दल ओरडत आतून बाहेर आली. तेव्हा आम्ही उठलो आणि युनिटमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. आतील युनिटमध्ये प्रवेश करण्याचा कोणताही मार्ग नव्हता आणि आम्हाला बाहेरील युनिटची खिडकी तोडावी लागली. आत खूप उष्णता होती आणि संपूर्ण युनिटमध्ये धुराचे लोट भरले होते. मी, माझा मेहुणा रानो मोहम्मद सोबत, बाहेरच्या युनिटमध्ये ठेवलेली बाळं खिडकीतून मुलांना बाहेर काढणाऱ्यांच्या हवाली करू लागलो,” तो म्हणाला. हा संपूर्ण वेळ आपली बाळे सुरक्षित आपल्या हाती लागतील या आशेवर मन्सुरी होते.
मन्सुरी म्हणाले, “संपूर्ण युनिटला धुराच्या लोटात आमची स्वतःची मुले ओळखण्याचा कोणताही मार्ग नव्हता.” “बाहेरील भागाला फक्त एकच बाहेर पडण्याचा दरवाजा होता आणि नंतर, आम्हाला मागच्या बाजूला दुसरा दरवाजा सापडला-जो बंद होता. आतील युनिटला एक अरुंद दरवाजा होता, एका वेळी एक व्यक्ती प्रवेश करू शकेल एवढीच ती रुंद होती. काही मिनिटांतच आम्हाला उलट्या होऊ लागल्या. बाळांनी ते कसे सहन केले असेल? त्यांचे आयुष्य सुरू होता होताच संपले.”
फायर ब्रिगेड येईपर्यंत अनेक बाळांचा मृत्यू झाला होता आणि नंतर युनिटमधून जळलेले मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बराच आग्रह केल्यानंतर अखेर रुग्णालय प्रशासनाने मन्सुरी यांना आगीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये त्यांची मुले असल्याची माहिती दिली.
“आम्ही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आमच्या बाळांना पाहू द्या अशी वारंवार विनंती करत होतो, परंतु त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही त्यांना शनिवारी पाहू शकतो. शवविच्छेदन गृहात आमची बाळं ज्या अवस्थेत असतील त्या स्थितीत पाहण्याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती, आमच्या सर्वात वाईट स्वप्नातही नाही,” मन्सुरी म्हणाले.
मेडिकल कॉलेजचे प्राचार्य नरेंद्र सिंह सेंगर यांनी द प्रिंटला सांगितले की, मेडिकल कॉलेज एसएनसीयूमध्ये दाखल झालेल्या एकूण 49 बाळांपैकी 11 बाळांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. 10 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एकाचा रविवारी बालरोग विभागात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
“सहा बाळं खाजगी नर्सिंग होममध्ये आहेत तर एक जिल्हा रुग्णालयात आहे. एक मौरानीपूरमध्ये त्याच्या पालकांसह घरी परतले आहे आणि उर्वरित 20 सध्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत,” ते म्हणाले. वैद्यकीय महाविद्यालयात देखरेखीखाली असलेल्या 20 बाळांपैकी दोन बाळांची प्रकृती गंभीर आहे.
जे अजूनही रुग्णालयात आहेत त्यांच्या पालकांनी सांगितले की युनिटमध्ये भरलेल्या धुरामुळे, काही बाळांना आता श्वास घेण्यास त्रास होत आहे.
“माझ्या मुलीचा जन्म 26 ऑक्टोबर रोजी झाला आणि तिला एसएनसीयूच्या बाह्य युनिटमध्ये दाखल करण्यात आले. तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शुक्रवारी युनिटमध्ये भरलेल्या धुरामुळे हे घडले,” सुरक्षा म्हणाली, तिची मुलगी सध्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या दुसऱ्या बाळाचे नातेवाईक आणि शुक्रवारी एसएनसीयूमध्ये दाखल झालेल्या व्यक्तींपैकी एक विशाल अहिरवार यांनी सांगितले की अजूनही तोंडातील धुराचा तो वास गेलेला नाही.
वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या एका बाळाची आजी पार्वती अहिरवार यांनी सांगितले की, तिची मुलगी राधा हिच्या बाळाचा जन्म दिलेल्या मुदतीआधीच झाला होता, व ते अजून आईच्या अंगावर दूध पित होते.
“आगीतून वाचल्यानंतर त्याने पहाटे 1 च्या सुमारास दूध प्यायले, परंतु आता तो पीत नाही आणि फार हालचाल करत नाही. त्याला खोकला येत आहे आणि डॉक्टर म्हणतात की त्याची प्रकृती गंभीर आहे आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे,” पार्वती म्हणाली की, बाळ जरी वाचले असले तरी ते सतत रडत आहे.
Recent Comments