scorecardresearch
Thursday, 25 December, 2025
घरदेशदिल्लीतील कार बॉम्बस्फोटात वापरल्या गेलेल्या कारचा पहिला फोटो व्हायरल

दिल्लीतील कार बॉम्बस्फोटात वापरल्या गेलेल्या कारचा पहिला फोटो व्हायरल

लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ लाल दिव्याजवळच्या ज्या पांढऱ्या रंगाच्या ह्युंदाई आय20 कारमध्ये स्फोट झाला, त्या गाडीचे पहिले दृश्य समोर आले आहे. स्फोटाच्या काही मिनिटांपूर्वी लाल किल्ल्याच्या पार्किंग लॉटमध्ये घेतलेले हे सीसीटीव्ही फुटेज आहे.

नवी दिल्ली: लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ लाल दिव्याजवळच्या ज्या पांढऱ्या रंगाच्या ह्युंदाई आय20 कारमध्ये स्फोट झाला, त्या गाडीचे पहिले दृश्य समोर आले आहे. स्फोटाच्या काही मिनिटांपूर्वी लाल किल्ल्याच्या पार्किंग लॉटमध्ये घेतलेले हे सीसीटीव्ही फुटेज आहे. दीड मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये एचआर26सीई7674 हा नोंदणी क्रमांक असलेली कार टोल बूथवर पोहोचण्यासाठी रांगेत उभी असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर पांढऱ्या रंगाची कार त्या ठिकाणी पोचल्यावर  चालकाने पार्किंग कर्मचाऱ्यांकडून स्लीप घेण्यासाठी हात पुढे केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. टाइम स्टॅम्पवरून ही क्लिप 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.22 वाजताची असल्याचे दिसून येते.

लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळील ट्रॅफिक लाईटजवळ सायंकाळी 6.50 वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला माणूस स्पष्ट दिसू शकत नाही. तसेच, फुटेजवरून गाडीत आणखी लोक होते का, हे स्पष्ट होत नाही. दिल्ली पोलिसांमधील सूत्रांनी सांगितले की, दर्या गंज, लाल किल्ला परिसर, कश्मीरी गेट आणि सुनेहरी मशिदीजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी ही कार टिपली. मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी फरिदाबादहून निघाली, नंतर बहादुरगड, दर्यागंज, सुनेहरी मशिदीत गेली आणि नंतर लाल किल्ल्यालगतच्या पार्किंग लॉटकडे गेली. दुपारी 3.19 वाजता गाडी आत शिरली आणि सोमवारी सायंकाळी 6.48 वाजता गाडी बाहेर पडली. त्यानंतर ती पार्किंग लॉटमधून इच्छित स्थळी जाण्यासाठी निघाली. या गाडीचा सध्याचा मालक उमर नबी आहे. तो पुलवामा येथील डॉक्टर आहे, शिवाय तो हरियाणातील फरिदाबाद येथे सोमवारी झालेल्या छाप्यापूर्वी अटक केलेल्या दोन डॉक्टरांच्या दहशतवादी नेटवर्कशी संबंधित आहे.

संथ गतीने चालणाऱ्या कारमध्ये झालेल्या उच्च-तीव्रतेच्या स्फोटात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments