scorecardresearch
Tuesday, 9 September, 2025
घरदेशकर्नाटकचे माजी महासंचालक व पोलीस महानिरीक्षक ओम प्रकाश यांची हत्या?

कर्नाटकचे माजी महासंचालक व पोलीस महानिरीक्षक ओम प्रकाश यांची हत्या?

कर्नाटकच्या माजी उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याची बेंगळुरू येथील त्यांच्या घरी हत्या झाल्याचे आढळले. पत्नीसह इतरांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

बेंगळुरू: कर्नाटकचे माजी महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक ओम प्रकाश हे रविवारी बेंगळुरूच्या एचएसआर लेआउट येथील त्यांच्या घराच्या लिव्हिंग रूममध्ये मृतावस्थेत आढळले. त्यांच्या पत्नीसह इतरांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. 68 वर्षीय ओम प्रकाश हे 1981 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते आणि फेब्रुवारी 2015 मध्ये राज्याचे सर्वोच्च पोलीस अधिकारी बनले. बेंगळुरू शहराचे पोलीस आयुक्त बी. दयानंद म्हणाले की, “ओम प्रकाश रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांची पत्नी घरात होती आणि मुलगी वरच्या मजल्यावर होती.” त्यांच्या घराभोवतीच्या दृश्यांमध्ये पोलीस आयुक्त आणि विद्यमान पोलीस महासंचालक आलोक मोहन यांच्यासह इतर उपस्थित असल्याचे दिसून आले.

ही घटना रविवारी दुपारी चार-साडेचारच्या सुमारास घडली. अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम) विकास कुमार यांनी पत्रकारांना सांगितले, की लवकरच एफआयआर नोंदवला जाईल. त्यांनी पुढे सांगितले की, “अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही परंतु पोलिसांनी धारदार शस्त्र जप्त केले आहे, परंतु संशयित हत्येत त्याचा वापर करण्यात आला होता की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. माजी डीजीपींच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. प्रकाश यांना सेंट जॉन्स रुग्णालयात नेण्यात आले जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांना धमक्या देण्यात येत होत्या का याचा तपास केला जात आहे. ओम प्रकाश हे बिहारमधील चंपारण येथील रहिवासी होते. त्यांच्या मृत्यूमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे आणि विरोधी पक्षांनी सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे.

“कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची बेंगळुरूमध्ये हत्या करण्यात आली. काँग्रेसच्या काळात किती अराजकता होती याची कल्पना करा,” असे भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचे अमित मालवीय यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments