गुरुग्राम: हरियाणाच्या जींद जिल्ह्यात सरकारी मान्यताप्राप्त प्राणी संशोधन आणि प्रजनन संस्थेतून 3,500 उंदीर आणि 180 रानउंदीर चोरीला गेल्यानंतर चोरी आणि बेकायदेशीर प्रजननाचे प्रकरण उघडकीस आले आहे.
पिल्लुखेरा पोलिस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या एफआयआरमध्ये, धतरथ गावात रोडंट रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मालक राजेश कुमार यांनी व्यवस्थापक सुनील शर्मा यांच्यावर “अनधिकृत प्रजनन आणि संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांची चोरी केल्याचा आरोप केला आहे. कुरुक्षेत्रात सुमारे 90 किमी दूर राहणारे कुमार दैनंदिन कामकाजावर देखरेख करण्यासाठी शर्मा यांच्यावर अवलंबून होते. तथापि, 17 डिसेंबर रोजी, नियमित तपासणीदरम्यान, त्यांना त्यांच्या लहान प्राण्यांच्या साठ्यामध्ये विसंगती आढळली. शर्मा यांच्यावर संशय घेऊन कुमार यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आणि चोरीचा पर्दाफाश केला. त्या प्राण्यांना अवैध प्रजनन केंद्रात नेले जात होते.
रॉडेंट रिसर्च इंडियाला मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय (MoFAHD) द्वारे मान्यता प्राप्त आहे आणि औषधे आणि लसींवरील संशोधनासाठी औषधकंपन्या आणि विद्यापीठांना ही संस्था उंदरांचा पुरवठा करते. “अनधिकृत प्रजनन आणि प्राण्यांची चोरी सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय सुरक्षेसाठी गंभीर धोके निर्माण करतात,” त्यांनी द प्रिंटला सांगितले.
सीसीटीव्हीमुळे गुन्ह्याचा पर्दाफाश
19 डिसेंबरच्या रात्री, सीसीटीव्ही फुटेजमुळे कुमार यांना गुन्ह्याचा उलगडा होण्यास मदत झाली. “19 डिसेंबर 2024 रोजी मी कुरुक्षेत्रला परतण्याऐवजी वैयक्तिक कामासाठी धतरथमध्ये परतलो,” असा दावा त्यांनी एफआयआरमध्ये केला आहे. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर नजर ठेवली. रात्री 9.00 वाजताच्या फुटेजमध्ये शर्मा मजुरांच्या मदतीने खाद्याच्या गोण्या उतरवताना दिसले.
“माझ्या फोनवरील सीसीटीव्ही फुटेजचे निरीक्षण करून मी प्राण्यांच्या घराकडे निघालो. रात्री 9.52 वाजता, मी ट्रक जाताना पाहिला, त्यानंतर सुनील शर्मा एक्टिव्हा स्कूटरवर आले. मी माझ्या मोटरसायकलवरून त्यांच्या मागे गेलो. एसआर पेट्रोल पंपाजवळ, मी लहान ट्रक आणि ॲक्टिव्हा उभ्या असलेल्या पाहिल्या, आणि एक पांढरी स्कॉर्पिओ आली,” त्यांनी माहिती दिली. ट्रकमधून पुरवठा एका पेट्रोल पंपाजवळ दुसऱ्या वाहनात हस्तांतरित करण्यात आला होता, ते वाहन संजय कुमार म्हणून एक व्यक्ती चालवत होती. तो त्यांच्या पशुगृहाला नेहमी भेट देणारा होता आणि बडोली येथील नोंदणी नसलेल्या पशुगृहाचा मालक होता.
कुमार यांच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता त्यांना ट्रकचा चालक विनय सुरी यांचा फोन आला, ज्याने घटनेची माहिती दिली. “त्याने मला सांगितले की सुनील शर्माने त्यांना 12 फीड सॅक दुसऱ्या वाहनात (स्कॉर्पिओ) वितरीत करण्याची सूचना दिली आणि दावा केला की ते जिंदमध्ये नव्याने स्थापन झालेल्या पशुगृहासाठी आहेत.”
एफआयआरमध्ये पुढे म्हटले आहे की, “माझ्या पशुगृहातील साठ्याची पाहणी केल्यावर मला आढळले की 12 फीड बॅग गायब आहेत. याव्यतिरिक्त, 3,500 लहान आणि 180 मोठ्मया उंदरांचा हिशोब लागत नव्हता. शंका आहे की सुनील शर्मा यांनी सुविधेच्या नोंदींमध्ये छेडछाड केली, अधिकृत कागदपत्रांची छायाचित्रे घेतली आणि संजय कुमार यांना पाठवली, ज्यांनी त्यांचा वापर करून त्यांच्या अनधिकृत प्राणीगृहासाठी बनावट कागदपत्रे तयार केली.”एफआयआरमध्ये नमूद केलेल्या तक्रारीनुसार, संजय द्वारे चालविण्यात आलेली बडोली-आधारित सुविधा प्राण्यांवरील प्रयोगांच्या नियंत्रण आणि देखरेखीसाठी (CCSEA) समितीच्या मंजुरीशिवाय कार्यरत होती आणि नैतिक आणि कायदेशीर मानकांचे उल्लंघन करत होती.
स्थानिक पोलिसांनी 26 डिसेंबर रोजी भारतीय न्याय संहिता कायदा, 2023 च्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवला. सहायक उपनिरीक्षक विनोद कुमार यांनी द प्रिंटला सांगितले की, पोलिसांनी सुनील शर्माला सोमवारी अटक केली आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
तपासकर्ते सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि चोरीला गेलेली जनावरे आणि चारा परत मिळवण्यासाठी शोध घेत आहेत.

Recent Comments