मुरादाबाद: मध्यरात्री सुमारे एक तासानंतर, शाहदीन कुरेशीने आपल्या पत्नी आणि मुलांचा निरोप घेतला आणि काही अतिरिक्त पैसे कमावण्यासाठी तो बाहेर पडला. पोलिसांचे म्हणणे आहे की तो स्थानिक भाजी मंडईत गेला व तिथे रात्री 3 च्या सुमारास तो आणि त्याच्या कथित साथीदारांना गाईची कत्तल करताना पकडले गेले. त्याच्यासोबत असलेले लोक पळून गेल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी येण्यापूर्वी आणि त्याला रुग्णालयात नेण्यापूर्वी जमावाने शाहदीनवर हल्ला केला.
हल्ल्यात जखमी झालेल्या 37 वर्षीय शाहदिनचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला.
“प्राण्याच्या मृत्यूवरून माणसाचा जीव घेण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? कायदा हातात घेणारे ते कोण आहेत?” त्याची विधवा पत्नी रिझवाना हिने प्रश्न उपस्थित केला आहे. “माझ्या पतीसोबत जे घडले ते अत्यंत क्रूर आहे. त्याचे जीवन अकाली संपवण्यात आले,” ती म्हणाली.
त्याचा शवविच्छेदन अहवाल तात्काळ उपलब्ध झाला नसला तरी, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाहदीनचा मृत्यू हल्ल्यामुळे झालेल्या जखमांनी झाला आहे. मुरादाबाद पोलिसांनी शाहदीन आणि त्याच्या कथित साथीदारांवर उत्तर प्रदेश गोहत्या प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. खुनाच्या शिक्षेशी संबंधित असलेल्या भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 103(1) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध शाहदीनच्या मृत्यूप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) सतपाल अंतील म्हणाले की, शाहदीनच्या भावाच्या तक्रारीच्या आधारे कलम 103(1) लागू करण्यात आली आहे. “तक्रारीनुसार, मॉब लिंचिंगचा गुन्हा उघड झाला नाही,” त्यांनी माहिती दिली. कलम 103(2) किंवा 117(4) हे मॉब लिंचिंगच्या (जमावहल्ला) गुन्ह्याशी निगडीत आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक (शहर) कुमार रण विजय सिंह यांनीही हे लिंचिंगचे प्रकरण नसल्याचे ठामपणे सांगितले. “जात, पंथ, धर्माच्या आधारे एखाद्याला मारले जाणे ही लिंचिंगची तांत्रिक व्याख्या आहे, परंतु येथे जमावाला शाहदिनचा धर्म माहीत नव्हता. मग याला लिंचिंग कसे म्हणता येईल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. “तो बऱ्याच आजारांनी ग्रस्त होता, शिवाय त्याला मधुमेहही होता. त्यामुळे या हल्ल्यातून तो बचावू शकला नाही. ” सिंह म्हणाले.
त्या रात्री नेमके काय घडले?
पोलीस आणि कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, शाहदीनने 30 डिसेंबर रोजी पहाटे 1 वाजता त्याचा मित्र अदनानसह मंडी समितीला जाण्यासाठी घर सोडले.
पुढे काय झाले हा सध्या तपासाचा विषय असला तरी, मंडी समितीचे रहिवासी सदस्य कौशल यांनी द प्रिंटला सांगितले की, व्यापाऱ्यांनी 3-4 जणांच्या गटाला गायीची कत्तल करताना पाहिले आणि त्यांचा पाठलाग केला. “येथे खूप भटक्या गायी आणि बैल आहेत. बऱ्याचदा, कसाई त्यांना चोरण्यासाठी येतात, परंतु आम्ही कधीही कोणालाही पकडू शकलो नाही. पहाटे 3 च्या सुमारास जेव्हा मंडई नुकतीच उघडत होती, तेव्हा आम्ही लोकांना गायीची हत्या करताना पाहिले आणि त्यांच्या मागे धावलो,” तो म्हणाला.
पहाटे चारच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नंतर सांगितले की त्यांनी त्या ठिकाणाहून प्राण्यांचे अवशेष जप्त केले ज्याची त्यांनी विल्हेवाट लावली. घरी परतल्यावर शाहदीनची पत्नी आणि मुले अस्वस्थ होत होती. ‘पहाटे 3 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत त्याचा फोन आला नाही,’ असे त्याची विधवा पत्नी रिझवाना हिने सांगितले.

“आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आणि त्याला सीटी स्कॅन रूममधून बाहेर पडताना पाहिले. त्याला बेशुद्ध करून बेदम मारहाण करण्यात आली. त्याचे डोळे आणि कान सुजले होते आणि बोटे तुटली होती. तो फक्त कसाबसा श्वास घेत होता, ”शाहिदीनच्या मेहुण्याने सांगितले की, मंगळवारी सकाळी दुखापतींमुळे त्याचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी त्याला इतर दोन रुग्णालयात उपचारासाठी हलवले. शाहदीन आपल्या तरुण कुटुंबासोबत भाड्याच्या घरात राहत होता, जिथे त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता त्या मंडी समितीच्या परिसरातून चार किलोमीटर अंतरावर. शहरातील भरभराट होत असलेल्या पितळ उद्योगात त्यांनी मजूर म्हणून काम केले. कुटुंबाने सांगितले की त्याच्या मधुमेहाची समस्या खूप चिघळली होती. त्यांची मुले अरहम (15), आफी (13) आणि हिरझान (10) यांना शाळा सोडावी लागली.

“जादा 500 रुपयांसाठी शाहदीन रात्री कामावर निघून गेला,” असे एका नातेवाईकाने सांगितले. एका नातेवाईकाने दावा केला आहे की शाहदीन मुस्लिम असल्यामुळे मारला गेला. “ही हत्या गोहत्येच्या कायदेशीरतेबद्दल नाही. मुस्लिम असल्याच्या कारणावरून त्यांची हत्या करण्यात आली.
“शाह्दिनच्या बाबतीत जे घडले तेच त्याच्या गुन्हेगारांचे झाले पाहिजे.” अशी इच्छा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
Recent Comments