scorecardresearch
Tuesday, 9 September, 2025
घरमनोरंजनहरियाणामधील मिर्चपूरच्या हिंसाचारावर आधारित ओटीटी मालिका ‘कांड’ प्रदर्शित

हरियाणामधील मिर्चपूरच्या हिंसाचारावर आधारित ओटीटी मालिका ‘कांड’ प्रदर्शित

'कांड 2010' या मालिकेचा उद्देश हरियाणातील खेडेगावातील हिंसाचाराच्या वेळी समोर आलेल्या समाजातील जातीय भेदभावावर प्रकाश टाकण्याचा आहे.

गुरुग्राम: एक नवीन सामाजिक-राजकीय नाट्याने भरलेली नवी वेब सिरीज ‘कांड’ने समाजात खोलवर रुतलेल्या जातीय भेदभावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म स्टेजवर 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेली कांड ही वेब सिरीज 2010 साली हरियाणातील मिर्चपूर गावात घडलेल्या एका वास्तव घटनेवर आधारित आहे. या घटनेत दोन दलित रहिवाशांना जिवंत जाळण्यात आले आणि अनेकांना प्रबळ जाती गटांसोबत वाढलेल्या तणावादरम्यान घरे सोडून पळून जाण्यास भाग पाडले गेले.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) मिर्चपूर हिंसाचारादरम्यान ठळकपणे काँग्रेसला दलितविरोधी म्हणून चित्रित केले होते कारण ही घटना माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांच्या सरकारच्या काळात घडली होती. हुड्डा यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर जाट समाजाच्या सदस्यांची बाजू घेतल्याचा आणि दलितांना न्याय नाकारल्याचा आरोप केला होता.

‘द प्रिंट’शी बोलताना, भुल सिंगची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता यशपाल शर्मा म्हणाला की, ‘या मालिकेचा उद्देश हा  खेड्यापाड्यातील आपल्या बांधवांचे रक्षण करण्याचा संदेश समाजाला देणे हा आहे’. शर्मा हे लगान (2001), गंगाजल (2003), आणि सिंग इज किंग (2008) यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. अभिनेता हरिओम कौशिकने सांगितले की, मिर्चपूर प्रकरण अनेक महिन्यांपासून एक ज्वलंत विषय बनल्याने मालिकेच्या निर्मात्यांनी हा विषय निवडला आहे.

2010 मध्ये घडलेली घटना

मिर्चपूरच्या घटनेला ‘मिर्चपूर कांड’ म्हणून संबोधले जाते. 19 एप्रिल 2010 च्या रात्री भुंकणाऱ्या कुत्र्यावरून दलित आणि जाट समुदायाच्या सदस्यांमध्ये झालेल्या भांडणातून ही घटना घडली. दुसऱ्या दिवशी, प्रबळ जाट समाजातील 200 लोकांच्या संतप्त जमावाने दलित वस्तीतील लोकांची घरे जाळली. तारा चंद या 70 वर्षीय दलित व्यक्ती आणि त्यांची 18 वर्षीय अपंग मुलगी सुमन यांना त्यांच्या घरात जिवंत जाळण्यात आले. इतर अनेक जखमी झाले आणि 150 हून अधिक दलित कुटुंबे भीतीपोटी गावातून पळून गेल्यामुळे विस्थापित झाली.

स्थानिक प्रशासन आणि पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप करण्यात आला. गावात तणाव निर्माण झाल्याची माहिती असूनही हा हल्ला रोखण्यात पोलिसांना अपयश आल्याचे अहवालात म्हटले आहे. या घटनेनंतर सुमारे 150 पीडितांनी दिल्लीत पळ काढला आणि कॅनॉट प्लेसजवळील बाल्मिकी मंदिरात आश्रय घेतला.

खटला

ऑगस्ट 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हरियाणा पोलिसांनी 103 आरोपींना अटक केली. 9 जानेवारी 2011 रोजी हिसार तुरुंगातून 98 आरोपींना तिहार तुरुंगात हलवण्यात आले. न्यायालयाने 20 जानेवारी 2011 रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाला (CBI) ला या प्रकरणाचा ताबा घेण्याचे आदेश दिले आणि खटला दिल्लीत चालवण्यात आला.

आरोपींतर्फे हजर झालेले हिसार येथील ज्येष्ठ वकील पी.के. संधीर यांनी द प्रिंटला सांगितले की, 2011 मध्ये दिल्लीतील एका ट्रायल कोर्टाने 15 जणांना दोषी ठरवले होते आणि पुराव्याअभावी 82 जणांची निर्दोष मुक्तता केली होती. 2018 मध्ये, दिल्ली उच्च न्यायालयाने अनेक दोषींच्या शिक्षेमध्ये वाढ केली, ज्यात काहींना जन्मठेपेची शिक्षादेखील झाली आहे. न्यायालयाने या घटनेला “जाती-आधारित हिंसाचाराचे विचित्र प्रकटीकरण” म्हटले आहे. मिर्चपूरची घटना देशभरातील दलित हक्क चळवळींचा केंद्रबिंदू  ठरली. भीम आर्मी आणि त्यासारख्या अन्य संघटनांनी या घटनेचा उपयोग कठोर कायदे आणि उपेक्षित समुदायांसाठी विद्यमान संरक्षणाची उत्तम अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी केला.

राजेश अमरलाल बब्बर दिग्दर्शित, कांड 2010 चे ग्रामीण हरियाणा आणि त्यातील सामाजिक-राजकीय समस्यांचे प्रामाणिक चित्रण केल्याबद्दल कौतुक केले जात आहे. सहाय्यक कलाकारांमध्ये आशिष नेहरा, योगेश भारद्वाज, आकांक्षा भारद्वाज, चेतना सरसेर, कुलदीप सिंग, अरमान अहलावत, मीना मलिक आणि हरिओम कौशिक यांचा समावेश आहे.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments