scorecardresearch
Thursday, 25 December, 2025
घरदेशआयपीएस अधिकारी अमनीत कुमार यांची हरियाणा पोलीस डीजीपींच्या त्वरित अटकेची मागणी

आयपीएस अधिकारी अमनीत कुमार यांची हरियाणा पोलीस डीजीपींच्या त्वरित अटकेची मागणी

भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी अमनीत पी. ​​कुमार यांनी पती व्ही. पुरण कुमार यांच्या आत्महत्येप्रकरणी हरियाणा पोलिस प्रमुख आणि रोहतक पोलिस प्रमुखांविरुद्ध एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) नोंदवण्याची मागणी करणारी तक्रार दाखल केली.

गुरुग्राम: भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी अमनीत पी. ​​कुमार यांनी पती व्ही. पुरण कुमार यांच्या आत्महत्येप्रकरणी हरियाणा पोलिस प्रमुख आणि रोहतक पोलिस प्रमुखांविरुद्ध एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) नोंदवण्याची मागणी करणारी तक्रार दाखल केली. भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्याच्या पत्नीने त्यांची स्वाक्षरी असलेल्या चार पानांच्या तक्रारीत, पोलिस महासंचालक (DGP) शत्रुजीत कपूर आणि रोहतक पोलिस अधीक्षक (SP) नरेंद्र बिजार्निया यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

त्यांनी या तक्रारीत आरोप केला आहे, की या दोघांनी त्यांच्या पतीला आत्महत्या करण्यास भाग पाडले, सार्वजनिकरित्या अपमानित केले आणि त्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याचा कट रचला. त्यांनी चंदीगड पोलिसांना तात्काळ एफआयआर नोंदवण्याची विनंती केली आहे, कारण जर दोन्ही आरोपींना लवकर अटक केली नाही तर ते पुरावे नष्ट करू शकतात किंवा तपासावर परिणाम करू शकतात.

“मी, अमनीत पी. ​​कुमार, आयएएस (2001 बॅच, हरियाणा), ही केवळ एक सरकारी कर्मचारी म्हणून नाही तर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दुर्घटनेने हादरलेली एक शोकाकुल पत्नी आणि आई म्हणून हे लिहित आहे. माझे पती, आयपीएस अधिकारी वाय. पूरण कुमार यांना डीजीपी शत्रुजीत सिंग कपूर आणि रोहतक एसपी नरेंद्र बिजार्निया यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 108 (पूर्वीचे आयपीसीचे कलम 306 – आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि एससी/एसटी (अत्याचार प्रतिबंधक) या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा. त्यांच्या मानसिक छळामुळे माझ्या पतीचा मृत्यू झाला म्हणून त्यांना तात्काळ अटक करणे आवश्यक आहे,” असे तक्रारीत म्हटले आहे.

पुरण कुमार यांनी मंगळवारी चंदीगडमधील त्यांच्या सेक्टर 11 येथील घरी आत्महत्या केली. 2001 च्या बॅचच्या या आयपीएस अधिकाऱ्याने नऊ पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यामध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा उल्लेख होता.

‘पतीला भेदभावाचा सामना करावा लागला’

अमनीत असेही म्हणाल्या, की जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्या जपानच्या अधिकृत दौऱ्यावर होत्या आणि ही बातमी ऐकताच त्या लगेच परत आली. “वर्षानुवर्षे, डीजीपीसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचा पद्धतशीरपणे अपमान आणि छळ करण्यात आला. त्यांनी दाखल केलेल्या अनेक तक्रारींमध्ये – त्यांच्या सुसाईड नोटमध्ये देखील उल्लेख आहे – त्यांच्यावर जातीय भेदभाव करण्यात आल्याचे दिसून येते,” असा आरोप त्यांनी केला.

कुमार यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी, डीजीपीच्या आदेशानुसार, त्याच्या स्टाफ मेंबर सुशीलविरुद्ध रोहतकच्या अर्बन इस्टेट पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम 308(3) अंतर्गत खंडणीचा खटला दाखल करण्यात आला होता. अमनीत यांनी आरोप केला की त्यांच्या पतीला अडकवण्यासाठी “एक सुनियोजित कट” रचला जात होता आणि या मानसिक दबावामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी डीजीपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता आणि बिजर्नियाला फोनही केला होता, परंतु रोहतक एसपींनी जाणूनबुजून त्यांच्या कॉलला उत्तर दिले नाही, असे त्या म्हणाली.

कुमार यांना पोलीस संकुलात मंदिरातील प्रार्थनेतून वगळण्यात आले, आणि सार्वजनिक ठिकाणी मानसिक छळ आणि अपमान करण्यात आला, असेही अमनीत सांगतात. त्या म्हणाल्या, की म्हटले की सतत छळ आणि अपमान करणे ही विकृत प्रवृत्ती आहे आणि एकूण परिस्थितीची चौकशी केली पाहिजे. प्रशासकीय छळ हा एखाद्या व्यक्तीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करू शकतो. तसेच पुरण ही अनुसूचित जातीतील असल्याने होणारा छळ हा एससी/एसटी कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा आहे. ही आत्महत्येची साधी घटना नाही तर त्यांच्या पदांचा गैरवापर करणाऱ्या शक्तिशाली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पद्धतशीर छळाचा थेट परिणाम आहे. मी केवळ माझ्या कुटुंबासाठीच नाही तर सचोटीने सेवा करणाऱ्या प्रत्येक प्रामाणिक अधिकाऱ्यासाठी न्याय मागत आहे.” त्या म्हणाल्या.

अमनीत यांनी विनंती केली की दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवावा आणि त्यांना ताबडतोब अटक करावी. “ते शक्तिशाली पदांवर आहेत आणि ते तपासावर प्रभाव टाकू शकतात, पुरावे नष्ट करू शकतात किंवा साक्षीदारांना हाताळू शकतात. न्याय फक्त झाला पाहिजे असे नाही तर तो होताना दिसला पाहिजे. माझ्या मुलांना उत्तरे मिळायला हवीत आणि माझ्या पतीची अनेक दशकांची सार्वजनिक सेवा मौन बाळगण्याऐवजी आदराला पात्र आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments