scorecardresearch
Sunday, 7 September, 2025
घरदेशवर्गात ‘गायीचा मेंदू’ आणल्याबद्दल तेलंगणातील शिक्षक निलंबित

वर्गात ‘गायीचा मेंदू’ आणल्याबद्दल तेलंगणातील शिक्षक निलंबित

तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षिकेला जीवशास्त्राच्या वर्गात गायीची शरीररचना शिकवण्यासाठी गायीचा मेंदू आणल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे.

हैदराबाद: तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षिकेला जीवशास्त्राच्या वर्गात गायीची शरीररचना शिकवण्यासाठी गायीचा मेंदू आणल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. यालाल मंडल येथील जिल्हा परिषद कन्या हायस्कूलमध्ये घडलेल्या या घटनेचा उजव्या विचारसरणीच्या गटांनी निषेध केला. विकाराबाद जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केलेल्या 25 जून रोजीच्या आदेशात ‘खासिम्बी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीवशास्त्र शिक्षिकेला निलंबित करण्यात आले.

विकाराबाद जिल्हा अधीक्षक नारायण रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि मेंदूचा नमुना तेलंगणा फॉरेन्सिक्स सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आला आहे जेणेकरून तो गायीचा आहे की नाही, हे निश्चित करता येईल.”ते कच्चे मांस असल्याने, काही विद्यार्थ्यांना त्याचा वास सहन झाला नाही आणि त्यांना उलट्या झाल्या.” अशीही माहिती देण्यात आली आहे. “तेलंगणात गोहत्या बंदी कायदा असल्याने, हा कायद्यानुसार हा गुन्हा आहे, असे ते म्हणाले. तेलंगणा गोहत्या बंदी आणि प्राणी संरक्षण कायदा, 1977 अंतर्गत, गाय व म्हैस, (नर- मादी किंवा वासरू) या प्राण्यांना संरक्षण आहे. या घटनेमुळे उजव्या विचारसरणीच्या गटांनी शाळेजवळ निदर्शने केली. निदर्शकांना पोलिसांनी शांत केले. रेड्डी यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले, की निदर्शनांदरम्यान कोणीही जखमी झाले नाही. बकरी ईद (7 जून) च्या आधीच्या दिवसांत गोरक्षकांनी गो व्यापाऱ्यांना मारहाण केल्याच्या काही दिवसांनंतर हे घडले आहे. उत्सवानंतर 24 तासांच्या आत, हैदराबादच्या जलपल्ली भागात गोमांस वाहून नेणाऱ्या वाहनाला जाळण्यात आल्याने हिंसाचाराच्या दोन मोठ्या घटना घडल्या. 17 जून रोजी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी राज्यात गोरक्षणासाठी व्यापक धोरण तयार करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली. त्यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या निवेदनानुसार, तीन सदस्यीय समिती पहिल्या टप्प्यात चार ठिकाणी अत्याधुनिक सुविधांसह गोशाळा उभारण्याचा विचार करेल. समितीच्या सदस्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या विशेष मुख्य सचिव सब्यसाची घोष, देणगी विभागाच्या प्रधान सचिव शैलजा रमैयार आणि राज्य कृषी विभागाचे सचिव रघुनंदन राव यांचा समावेश आहे.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments