scorecardresearch
Tuesday, 9 September, 2025
घरदेशरविवारीही सुट्टी नको, आठवड्यातून नव्वद तास कामाचे हवे: एस.एन. सुब्रह्मण्यम

रविवारीही सुट्टी नको, आठवड्यातून नव्वद तास कामाचे हवे: एस.एन. सुब्रह्मण्यम

एल. अँड टी. चे चेअरमन ‘रविवारीही काम करा व आठवड्यातून 90 तासा काम व्हायला हवे असे आवाहन करतात.

नवी दिल्ली: लार्सन अँड टुब्रो (एल.अँड टी.) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस.एन. सुब्रह्मण्यम यांनी त्यांच्या वार्षिक भाषणाची सुरुवात एका सकारात्मक वाक्याने केली.”मला आशा आहे की तुम्ही सर्वजण या वर्षी तुमच्या आरोग्याची काळजी घ्याल,” असे ते म्हणाले. परंतु त्या भाषणाचे स्वरूप नंतर ‘एका वरिष्ठ बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांकडून केलेल्या अमानवी आणि अवास्तव अपेक्षा’ असे झाले.

सुब्रह्मण्यम यांनी “रविवारी त्यांच्या कर्मचाऱ्यांना काम करायला लावू शकत नसल्याबद्दल” खेद व्यक्त केला आणि कर्मचाऱ्यांनी शक्यतो आजारी पडण्याचे टाळावे आणि त्यांची तब्येत बिघडली तरी कामावर यावे असे सांगितले.

ते असेही म्हणाले, “माझी अलिकडेच एका चिनी व्यक्तीसोबत बैठक झाली. आणि त्या गृहस्थांनी मला सांगितले, ‘आपण कधीही अमेरिकेला हरवू शकतो’. मी त्याला विचारले की तो असे का म्हणत आहे? तो म्हणाला की अमेरिकन आठवड्यातून 40 तास काम करतात, आम्ही आठवड्यातून 90 तास काम करतो… तर तुमच्यासाठी हेच उत्तर आहे, जर तुम्हाला जगात अव्वल स्थान मिळवायचे असेल… तुम्हाला असे सर्वात वेगवान, सर्वात बलवान, सर्वात मोठे काहीतरी बनवायचे असेल तर तुम्ही आठवड्यातून 90 तास काम करा. मित्रांनो, काम सुरू ठेवा!”

वार्षिक भाषणात अध्यक्ष आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रश्नोत्तरांचे सत्र असते.

एल. अँड टी.च्या कर्मचाऱ्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर ‘द प्रिंट’ला सांगितले की, अध्यक्षांनी त्यांच्याकडून अशा मागण्या केल्यामुळे त्यांच्या गटात मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. “आम्ही आधीच आठवड्यातून जवळजवळ 60-65 तास काम करत आहोत. त्यांना आणखी काय हवे आहे? आम्ही आमच्या कुटुंबांना वेळही देऊ नये का?” लार्सन अँड टुब्रो ग्रुपच्या कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले. सुब्रमण्यम यांच्या भाषणाची  एक क्लिप रेडिटवर अपलोड करण्यात आली होती, जी आता  व्हायरल झाली आहे.

सहा दिवसांच्या कामाच्या आठवड्याबद्दल कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना, सुब्रमण्यम यांनी उत्तर दिले: “खरं सांगायचं तर, रविवारी मी तुम्हाला कामावर ठेवू शकत नाही याचा मला वाईट वाटते. मी स्वतः रविवारीही काम करतो. तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहू शकता, पत्नी पतीकडे किती वेळ पाहू शकते?” असा सवाल त्यांनी केला.

सुब्रमण्यम आता इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे गेले आहेत. नारायण मूर्ती, यांनी याआधी 70 तासांच्या कामाच्या आठवड्याचे समर्थन केले होते. तरुण कर्मचारी याला विरोध करत आहेत, कामाच्या आयुष्यातील संतुलनाची गरज असल्याचे सांगत आहेत. 30 देशांमध्ये कार्यरत असलेल्या 17 अब्ज डॉलर्सच्या एल अँड टी समूहात 31 मार्च 2023 पर्यंत 49 हजारहून अधिक कायम कर्मचारी होते.

वार्षिक भाषणाचे ‘ढोंग?

“गेल्या वर्षी कोणीतरी त्यांना केवळ एल अँड टीमध्येच नव्हे तर मोठ्या प्रमाणात उद्योगात लिंग वेतन तफावतीबद्दल विचारले होते. “आणि त्यांनी सांगितले की महिलांनी प्रसूती रजा घेणे बंद करावे, मग त्यांना समान वेतन मिळेल,” असे नाव न सांगण्याच्या अटीवर दुसऱ्या एल अँड टी कर्मचाऱ्याने सांगितले. दुसऱ्याने वार्षिक भाषणातील ‘ढोंगीपणा’बद्दल निराशा व्यक्त केली. “त्यांनी भाषणाची सुरुवात आम्हाला आमच्या आरोग्याची काळजी घेण्यास सांगून केली. आणि जेव्हा कोणी त्यांना आजारी रजा धोरणाबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की ‘तुम्हाला आजारी पडण्याची गरज नाही, फक्त ऑफिसमध्ये या’,!”

कर्मचाऱ्याने सांगितले की त्यांच्या सुट्टीत कर्मचाऱ्यांची उपलब्धता अपेक्षित असते. “तुम्ही वैद्यकीय किंवा कॅज्युअल रजा घेतल्या तरी, तुम्ही काम करावे अशी अपेक्षा आहे. तुम्ही काम सोपवू शकत नाही, तुमचा फोन बंद करू शकत नाही आणि ब्रेक घेऊ शकत नाही,” असे कर्मचाऱ्याने ‘द प्रिंट’ला फोनवर सांगितले.

आता, ‘द प्रिंट’च्या अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितले की ते दुसऱ्या नोकरीच्या शोधात आहेत जिथे चांगला वर्क-लाइफ बॅलन्स असेल. “मी नोकरी शोधत होतो, पण सध्याच्या परिस्थितीत ते कठीण आहे,” असे आधी उद्धृत केलेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले. तो म्हणाला की, निश्चित वेळेपेक्षा जास्त काम करण्याच्या आणि रजेच्या काळात काम करण्याच्या या अपेक्षांपासून दूर राहिल्याने कंपनीतील कर्मचाऱ्यांची वाढ रोखली जाऊ शकते आणि त्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.

“डेडलाइन पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त काम करण्यास मला हरकत नाही, परंतु ती दररोजची गोष्ट असू शकत नाही. ती थकवणारी आहे. श्री. सुब्रह्मण्यम जे म्हणाले, ते अमानवीय आहे,” असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments