scorecardresearch
Thursday, 25 December, 2025
घरदेशआरजी कर- सीबीआयकडून संदीप घोष आणि कोलकाता पोलीस अधिकाऱ्याच्या कोठडीत वाढ...

आरजी कर- सीबीआयकडून संदीप घोष आणि कोलकाता पोलीस अधिकाऱ्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी का?

दंडाधिकारी न्यायालयाने मंगळवारी दोघांच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करून कोठडीचा कालावधी 20 सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. सीबीआयने कोठडीत वाढ केली जाण्यामागे असहकार, अरेरावीचा उर्मट प्रतिसाद आणि संशयास्पद फोन नंबरवरून फोन कॉल ट्रेस करणे ही कारणे असल्याचे स्पष्ट केले.

कलकत्ता : प्रकरण दडपण्याचा प्रयत्न, पुराव्यांशी छेडछाड आणि संशयास्पद मोबाइल नंबरचा शोध ही कारणे सादर करून  केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने  मंगळवारी डॉ संदीप घोष आणि एक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. या दोघांना गेल्या महिन्यात कलकत्ता  येथील आर.जी. कार हॉस्पिटलमधील पदव्युत्तर डॉक्टर महिलेवर  बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी शनिवारी अटक करण्यात आली होती.

न्यायालयाने त्यांच्या कोठडीची मुदत आता आणखी तीन दिवसांनी वाढवली आहे.

आर.जी. करचे माजी प्राचार्य घोष  आणि तळा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अभिजीत मंडल,  – ज्यांच्या अखत्यारीत रुग्णालय येते – यांना एफआयआर दाखल करण्यास उशीर केल्याबद्दल आणि पुराव्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. कथित आर्थिक अनियमिततेप्रकरणी घोष हे आधीच न्यायालयीन कोठडीत होते.

तपास यंत्रणेने मंगळवारी मॅजिस्ट्रेट कोर्टात सांगितले की, घोष आणि मंडल अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसून, उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. सीबीआयने सांगितले की कोठडीची मुदत वाढवणे आवश्यक आहे कारण दोघांनी आतापर्यंतच्या कोठडीदरम्यान सत्य सांगितलेले नाही.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, “हत्येच्या दिवशी घोष आणि मंडल यांनी एका विशिष्ट नंबरवर अनेक कॉल केले होते आणि अनेक “संशयास्पद” मोबाईल नंबर समोर आले होते. “दोन्ही आरोपींनी केलेल्या प्रत्येक फोन कॉलच्या तपशिलांची छाननी होणे आवश्यक आहे, जेणेकरून मुख्य आरोपी आणि सहआरोपी यांच्यात गुन्हेगारी संबंध असल्यास ते सिद्ध होतील”. हे सीबीआयने कोर्टाला दिलेल्या  रिमांड कॉपीमध्ये नमूद केले आहे.  “एक कट रचला जाण्याची शक्यताही याने सिद्ध केली जाऊ शकते.

सीबीआयने असेही म्हटले आहे की हॉस्पिटलच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या तळा पोलिस स्टेशनचे डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर फुटेज आणि सीसीटीव्ही डेटा तपासण्यासाठी आणखी वेळ लागेल. त्यामुळे आवश्यक डेटा हाताशी लागेपर्यंत घोष आणि मंडल यांना अधिक काळ कोठडीत ठेवणे आवश्यक आहे.

सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज आणि त्यांच्या फोनवरून काढलेल्या मोबाइल डेटाच्या आधारे आणि इतर संबंधित साक्षीदारांशी क्रॉस व्हेरिफिकेशनच्या या प्रकरणाची पुढील चौकशी आवश्यक आहे जेणेकरून कोणताही कट रचला जाण्याची आणि प्रकरण दाबले जाण्याची शक्यता कमी होईल.

आपल्या चार पानांच्या रिमांड कॉपीमध्ये, सीबीआयने असेही म्हटले आहे की दोन्ही आरोपींनी “या प्रकरणाशी संबंधित पुरावे आणि महत्त्वपूर्ण डेटा नष्ट करण्याचा” प्रयत्न केला. कुटुंबीयांनी दुसऱ्यांदा शवविच्छेदन करण्याची मागणी केली असतानाही दोघांनी डॉक्टरवर घाईघाईने अंत्यसंस्कार केल्याचा आरोप आहे.

सीबीआयने घोष यांच्यावर संशयास्पद कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवण्याऐवजी, पुरावे जतन करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याऐवजी आणि लवकरात लवकर एफआयआर नोंदवण्याऐवजी “गुन्ह्याच्या ठिकाणी मुद्दाम अनुपस्थित राहिल्याचा” आरोप केला. सर्वोच्च न्यायालयाच्या शेवटच्या बैठकीत, स्वतःची सुनावणी सुरू असतानाही  एफआयआर दाखल करण्यात 14 तासांचा विलंब झाल्याचा आरोपही सीबीआयने केला.

मंगळवारी त्याच्या रिमांड कॉपीमध्ये सीबीआयने म्हटले: “डॉ. संदीप घोष कायद्याच्या योग्य कलमांतर्गत योग्य एफआयआर दाखल करण्यात अयशस्वी ठरले. काही मोठ्या षडयंत्राच्या पूर्ततेसाठी त्यांनी हे कृत्य केले का, याचा शोध घेणे आवश्यक आहे आणि सीबीआयला पीडितेच्या कुटुंबीयांकडून तसेच खुल्या स्त्रोतांकडून दोन्ही आरोपींविरुद्ध आणखी आरोप प्राप्त झाले आहेत, त्यांचा तपास करणे आवश्यक आहे.

10 ऑगस्ट रोजी अटक झाल्यानंतर केवळ दोन दिवसांनी बलात्कार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याचे कपडे आणि सामान जप्त केल्याबद्दल केंद्रीय एजन्सीने कोलकाता पोलिसांवर टीका केली.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments