scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरन्यायजगतरणवीर अलाहबादियाला अटकेपासून दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून कानउघाडणी

रणवीर अलाहबादियाला अटकेपासून दिलासा, सर्वोच्च न्यायालयाकडून कानउघाडणी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रणवीर अलाहबादिया यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. अलाहबादिया यांनी चौकशीत सामील होणे आणि 'इंडियाज गॉट लेटेंट' पासून दूर राहणे यावर संरक्षण अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या वकिलांना विचारले की 'स्वतः विकसित मूल्यांचे' पालन करणाऱ्या समाजात अश्लीलतेची व्याख्या कशी केली जाईल?

नवी दिल्ली: ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोच्या एका भागात केलेल्या वक्तव्याबद्दल दाखल झालेल्या फौजदारी खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी युट्यूबर रणवीर अलाहबादिया – ज्याला ‘बीअरबायसेप्स म्हणून ओळखले जाते, त्याला पोलिसांच्या अटकेपासून संरक्षण दिले. हे संरक्षण अल्लाहबादिया यांनी तपासात सामील होणे आणि शोपासून दूर राहणे यावर अवलंबून आहे.

न्यायाधीश सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने अलाहबादियाचे वकील अभिनव चंद्रचूड यांचीही  कानउघाडणी केली. अलाहबादियांना उद्देशून खंडपीठ म्हणाले, की “तुम्ही (अलाहबादिया) जे शब्द वापरले आहेत, त्यांची पालकांना लाज वाटेल. बहिणी आणि मुलींना लाज वाटेल. संपूर्ण समाजाला लाज वाटेल. तुमच्या पालकांचा अपमान करण्यापर्यंत तुमची पातळी घसरली आहे.” चंद्रचूड यांनी  त्यांच्या अशिलाची भाषा “घृणास्पद” असल्याचे मान्य केले.

चंद्रचूड यांनी स्पष्ट केले की ते त्यांच्या अशिलाच्या शब्दांचे समर्थन करत नव्हते, परंतु असा युक्तिवाद केला की ही घटना फौजदारी खटला चालवण्याइतकी गंभीर नव्हती. शोमधील एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर अलाहबादिया यांनी ठाणे, गुवाहाटी आणि जयपूरमध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अनेक एफआयआर एकत्रित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने मंगळवारी सोशल मीडिया कंटेंटच्या नियमनाबाबत केंद्राचे मत मागितले आणि अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी किंवा सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना यावर न्यायालयाला मदत करण्यास सांगितले.

खंडपीठाने त्याच शोच्या संदर्भात कोणताही नवीन एफआयआर नोंदवू नये असे आदेश दिले, तसेच अलाहबादिया यांना तपासात सामील होण्याकरता धमक्यांपासून संरक्षणासाठी स्थानिक पोलिसांकडे जाण्याची मुभा दिली. अलाहबादिया यांना त्यांचा पासपोर्ट ठाणे पोलिसांकडे जमा करण्यास सांगितले आहे. स्थानिक न्यायालयाच्या परवानगीनेच ते महाराष्ट्र सोडून जाऊ शकतात. यापूर्वी, चंद्रचूड यांनी आपला युक्तिवाद सुरू करताना असा दावा केला की अलाहबादिया यांचे वक्तव्य अश्लीलतेचे नाही.

यावर, न्यायालयाने अलाहबादिया यांची भाषा ‘घाणेरडी’ आणि ‘विकृत’ असल्याचे म्हटले. जेव्हा चंद्रचूड यांनी अश्लीलतेच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन केले तेव्हा खंडपीठाने प्रत्युत्तर दिले: “तो निकाल तुम्हाला अशा प्रकारची भाषा वापरण्याचा परवाना देतो का?” खंडपीठाने अश्लीलता म्हणजे काय यावरही चर्चा केली आणि चंद्रचूड यांना प्रश्न केला की “स्वतः विकसित मूल्यांचे पालन करणाऱ्या समाजात अश्लीलतेची व्याख्या कशी करायची? आम्हाला जाणून घ्यायचे आहे की ही अश्लीलता नाही तर अश्लीलता म्हणजे काय?,” असा सवाल खंडपीठाने उपस्थित केला. चंद्रचूड यांच्या अशिलावर अनेक खटले सुरू आहेत या दाव्यालाही त्यांनी विरोध केला आणि निदर्शनास आणून दिले की फक्त दोनच खटले आहेत – एक ठाण्यात आणि दुसरा गुवाहाटीत. “प्रत्येक राज्यात तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि तुम्ही 100 एफआयआरमध्ये अडकला आहात,” असे न्यायालयाने म्हटले आहे, दोन्हीमधील फरक अधोरेखित करताना. जयपूरमधील तिसऱ्या एफआयआरची न्यायालयाला माहिती नसल्याने, न्यायालयाने त्याच्या स्वरूपावर भाष्य करणे टाळले.

जेव्हा चंद्रचूड यांनी दोन्ही एफआयआरमधील मजकूर एकसारखाच असल्याचा दावा केला तेव्हा न्यायालयाने हस्तक्षेप करून म्हटले की, “एकामध्ये काही विशिष्ट आरोप आहेत आणि दुसऱ्यामध्ये काही आरोप नाहीत.” न्यायाधीशांनी असे निदर्शनास आणून दिले की गुवाहाटी एफआयआर अरुणाचल प्रदेश विरुद्ध अलाहबादिया यांचे वक्तव्य असा आहे. “दोन्ही एफआयआर वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांशी संबंधित आहेत, जे एकाच व्यासपीठावर केले गेले होते, परंतु एकाच वेळी घडले,” खंडपीठाने म्हटले. जेव्हा चंद्रचूड यांनी अलाहबादिया यांना दिलेल्या धमक्या वाचून दाखवल्या, तेव्हा न्यायालयाने उत्तर दिले: “जर तुम्हाला स्वस्त भाषा वापरून लोकप्रिय व्हायचे असेल, तर दुसऱ्यालाही तसेच लोकप्रिय व्हायचे आहे.”

ज्या चॅनेलवर हा शो प्रसारित झाला होता त्या चॅनेलवर फक्त सबस्क्राइबर्सनाच प्रवेश होता असे कळवल्यावर, खंडपीठाने म्हटले, की “ही बंदी केवळ व्यावसायिक फायद्यासाठी आहे. चॅनेलने त्यांच्या शोच्या कंटेंटबद्दल इशारा द्यायला हवा होता. जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे शो करत असता तेव्हा तुम्ही खबरदारीदेखील घेतली पाहिजे. कोणत्या प्रकारची खबरदारी घेतली पाहिजे हे तुम्हाला माहित असले पाहिजे,” असे न्यायालयाने पुढे म्हटले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments