सध्या सर्व वयोगटांमध्ये लोकप्रिय फॅशन ट्रेंड म्हणजे ‘बो’ आहे. ख्रिसमस ट्रीपासून ते विविध केशरचनांपर्यंत सगळीकडे हे ‘बोज’ दिसून येत आहेत. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या यंदाच्या ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी लाल रंगाचा पोशाख घातला होता आणि तिच्या केसांमध्ये एक हटके ‘बो’ खुलून दिसत होता.
आणि ती एकटीच अशी अभिनेत्री नाही. मलायका अरोरा खाननेही अलीकडेच एक चमकदार लाल ‘बो’ परिधान केला होता. सरोजिनी नगर ते खान मार्केट पर्यंत, सगळीकडेच हे बो सध्या दिसून येत आहेत. सेलिब्रिटींनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करणे सुरू करण्यापूर्वीच वेगवेगळ्या शैलीतील बो हे रस्त्यावरील विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेले दिसून येत आहेत. सगळ्यांत सोयीची गोष्ट म्हणजे, आपण रिबिनीची गाठ किती कल्पक रीतीने बंधू शकतो यावर त्या बोचे सौंदर्य अवलंबून असल्याने यात प्रयोगशीलतेला भरपूर वाव आहे.
अर्थात, याचे बरेचसे श्रेय दक्षिण कोरियन टीव्ही शो आणि चित्रपटांना जाते. के-ड्रामाज भारतीय प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाल्यामुळे, कोरियन फॅशनदेखील लोकप्रिय होत आहे. यापैकी अनेक के-ड्रामाजमध्ये परिधान केले जाणारे ‘बोज’ हे कोरियन फॅशनचेच देणे आहे. उद्यानात फिरण्यासाठी कपडे घालणे असो किंवा डिनर डेट असो—सर्व प्रसंगांसाठी बो ही स्त्रियांसाठी सुयोग्य अक्सेसरी ठरत आहे.
‘बो’चा आकार
सर्व प्रकारचे बो-सॅटिन, लेस, भरतकाम केलेले हे सर्वच एकदम ‘इन-थिंग’ आहेत. बो-थीम असलेली नेल आर्ट, स्वेटर आणि अगदी केक देखील पिंटरेस्ट बोर्डवर ट्रेंडिंग आहेत.
हा असा एक फॅशन ट्रेंड आहे ज्याला वयाची मर्यादा नाही. लो वेस्ट जीन्स किंवा लेदर आणि लेस चोकरच्या युगातही बो शोभूनच दिसतात. केसांची लांबी किंवा स्टाईल कशीही असली तरी ते शोभून दिसतात. हे जणूकाही तुमच्या आतील खेळकर लहान मूळ जागे करतात! इंस्टाग्रामवरील इन्फ्लूएन्सर्स हा ट्रेंड वेगळ्या पद्धतीने ‘कॅश’ करत आहेत.
बो हे स्व-प्रेमाला देखील प्रोत्साहन देतात. त्यामुळे सोशल मीडियावरही प्रत्येकजण सढळ हाताने बोचा वापर करत आहेत. नेहमीचाच स्वेटर घालूनही हटके दिसायचं आहे? मग बो वापरा. ते स्वस्त आणि मस्त आहेत. हे बोचं युग आहे आणि आपण ते पुरेपूर जगतो आहोत!
Recent Comments