भारताने ऑस्ट्रेलियाचा थोडासा तरी कित्ता गिरवून मुलांच्या सोशल मीडियावरील वावरावर निर्बंध घालणे आवश्यक आहे. पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या सरकारला असा कायदा आणायचा आहे जो 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर येण्यास बंदी घालेल आणि याचे उल्लंघन झाल्यास तो सोशल मिडिया प्लॅटफॉर्म त्यासाठी जबाबदार असेल. याचा भारतानेही विचार करायला हवा.
सोशल मीडियाच्या व्यसनामुळे मुलं अवेळी प्रौढ होत आहेत व त्यांचे बालपण हिरावले जात आहे. अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की सोशल मीडियावर तासनतास घालवणारी लहान आणि आणि किशोरवयीन मुले चिंता, नैराश्य आणि झोपेसंदर्भातील आजारांना बळी पडू शकतात. ते सायबरबुलीज आणि लैंगिक शोषण करणाऱ्यांच्या टोळीच्या जाळ्यातही अडकू शकतात.
या घटनांपासून मुलांचे संरक्षण करण्याचा प्रस्तावित कायदा हा एक प्रयत्न आहे. हे त्यांना त्यांचे बालपण पुन्हा मिळवून देण्यास उपयुक्त ठरेल.सोशल मीडियाचे व्यसन हे चुकीच्या वर्तन प्रकारांनाही सामान्य करून टाकत आहे. रीलचे व्यसन असलेली मुले पुढे अनेक प्रश्नांना सामोरी जातात.
हे उदाहरण घ्या. एका बेंगळुरूस्थित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने सांगितले की एका 10 वर्षांच्या मुलाने सायकलवरून येऊन, तिच्याजवळ थांबून तिच्याशी गैरवर्तन केले. त्या महिलेने असेही सांगितले की बघ्या लोकांना तो लहान असल्याने त्याने अजाणतेपणीच तसे केले असावे असे वाटले. पण पालकांना कोण जबाबदार धरणार? इंस्टाग्रामसारखे अनेक प्लॅटफॉर्म 13 वर्षाखालील मुलांना खाते उघडण्याची परवानगी देत नाहीत. आणि पौगंडावस्थेतील वापरकर्त्यांचे हँडल अनेकदा ॲपद्वारेच खाजगी केले जातात. यापैकी बरीच खाती पालक स्वतः चालवतात.
ऑस्ट्रेलियामध्ये, अल्बानीजला शैक्षणिक आणि बाल हक्क संस्थांकडून टीका सहन करावी लागत आहे. त्यांच्या या निर्णयाला एक निष्फळ प्रयत्न असे म्हटले जात आहे. यामुळे समस्येचे निराकरण होणार नाही असेही म्हटले जात आहे. मुलांसाठी ऑनलाइन ‘सुरक्षित जागा’ तयार करण्याची गरज आहे व बंदीमुळे कंपन्यांना असे प्लॅटफॉर्म तयार करण्यास प्रोत्साहन मिळणार नाही, असे टीकाकारांचे म्हणणे आहे.
सोशल मीडियावर मुलांचा वावर
आजच्या डिजिटल युगात, बालपणातील निरागसता हरवून गेली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लहान मुलांनी केवळ प्रौढांना आकर्षित करणाराच आशय पोस्ट केला आहे. 12 वर्षांची मुलेही नातेसंबंधांबद्दल बोलत आहेत, गेट रेडी विथ मी व्हिडिओंमध्ये प्रौढांप्रमाणे कपडे घालत आहेत. मेरठमधील मुलांचे त्रिकूट, ज्यांना मी इन्स्टाग्रामवर नुकतेच पाहिले होते ते अनेकदा रोमँटिक गाण्यांवर लिप-सिंक करतात आणि प्रपोज सीन्स साकारतात.
लोक अशा आशयाला किती डोक्यावर घेतात हे बघणे अधिक त्रासदायक आहे. त्यांच्या सर्वात लोकप्रिय व्हिडिओंपैकी एक, जिथे एक मुलगा मैत्रिणीसाठी वाढदिवसाचे सरप्राईज प्लॅन करतो आणि अगदी गुडघे टेकून प्रपोज करतो, त्याला 112 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
10 वर्षांच्या मुलासाठी रोमँटिक व्हिडिओ बनवणे खरोखरच योग्य आहे का? जरी त्यांचे पालक किंवा मोठे भावंड ही खाती व्यवस्थापित करत असले तरीही, ही मुले अशा जगाच्या संपर्कात येत आहेत जे हाताळण्यासाठी ते पुरेसे प्रौढ नाहीत.
सुरक्षित जागा नाही
सोशल मीडिया हे आता केवळ निरुपद्रवी मनोरंजनाचे व्यासपीठ राहिलेले नाही. सोशल मीडिया आत्म-नाशाचे धडे देणाऱ्या पुस्तकाप्रमाणे बनले आहे. आणि त्यामुळे लहान मुलांचे बालपण धोक्यात आले आहे. प्रौढांनीही आता सावधगिरी बाळगली पाहिजे. किड इन्फ्लुएंसर्सचे कॉमेंट सेक्शन्स हे अनेकदा अनेकदा द्वेषयुक्त टिप्पण्या, शिवीगाळ आणि धमक्यांनी भरलेले असतात, हे आजच्या मुलांना ज्या गंभीर धोक्यांना सामोरे जावे लागत आहे त्याची साक्ष आहे.
बालपण हा शोध, शिकणे आणि निरागसतेचा काळ असायला हवा—लाइक्स आणि फॉलोअर्सची शर्यत नाही.
Recent Comments