scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरमतमोदींचे कमबॅक! पंतप्रधानांचं मौन सुटण्यासाठी जम्मू-काश्मीर, हरयाणाच्या निवडणुकांचा हातभार

मोदींचे कमबॅक! पंतप्रधानांचं मौन सुटण्यासाठी जम्मू-काश्मीर, हरयाणाच्या निवडणुकांचा हातभार

पंतप्रधानपदावर असलेल्या मोदींचा करिष्मा कमी पडला, की आपणच कमी मंत्रमुग्ध झालो? याचे उत्तर मिळायला मोदींची अजून बरीच भाषणे व्हावी लागतील, पण सध्या तरी काहीतरी उणीव आहे.

पंतप्रधानपदावर असलेल्या  मोदींचा करिष्मा कमी पडला, की आपणच कमी मंत्रमुग्ध झालो? याचे उत्तर मिळायला मोदींची अजून बरीच भाषणे व्हावी लागतील, पण सध्या तरी काहीतरी उणीव आहे.

पण मोदींनी कमबॅक केलेले आहे. कदाचित धडाक्याने नाही, पण एका वेगळ्या शैलीत,आणि गांभीर्याने नक्कीच. जम्मू आणि काश्मीर, हरियाणा, गुजरात, झारखंड आणि ओडिशा येथील सार्वजनिक सभांमध्ये पंतप्रधान अतिशय ताठ मानेने फिरले आणि भारदस्त गोष्टी बोलले देखील. त्यांच्या हालचाली, हावभाव आणि शब्दांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानांचे व्यक्तिमत्त्व दिसत नव्हते तर बहुमतात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे नेते असलेले पंतप्रधान त्यांच्यात झळकत होते.

(विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भाषणात युतीचा उल्लेख क्वचितच केला.)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2024 मध्ये तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यापासून ते सार्वजनिक क्षेत्रापासून प्रचंड अलिप्त आहेत. जुलैमध्ये त्यांच्या संसदीय भाषणांव्यतिरिक्त, त्यांना भारतातील अधिकृत समारंभांमध्ये किंवा परदेशात (रशिया) अधिकृत भेटींमध्ये पाहिले आणि ऐकले गेले आहे. युक्रेन, ऑस्ट्रिया, ब्रुनेई, सिंगापूर) पण त्याच्या आवडत्या रणमैदानात-म्हणजे राजकीय परिप्रेक्ष्यात ते फारच कमी दिसत आहेत.

मी गेल्या आठवड्यात म्हटल्याप्रमाणे, नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते, राहुल गांधी हे ‘स्टार’ आहेत, कारण ते  अनेकदा मीडिया कव्हरेजवर वर्चस्व गाजवताना दिसतात.  गेले अनेक दिवस तर दूरचित्रवाणीवरील बातम्या किंवा वर्तमानपत्रात पंतप्रधानांचा उल्लेख फारसा आढळून आला नाही.

पंतप्रधानांनी सोमवारी अहमदाबादमध्ये सांगितले, की त्यांचा कार्यकाळ सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या 100 दिवसांत ते आपल्या कार्यालयात लोकांसाठी अतिशय शांतपणे काम करत होते. मात्र विरोधकांनी त्यांची थट्टा केली आणि त्यांचा अपमान केला. त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले होते. पंतप्रधानांना पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आणण्यासाठी – आणि त्यांनी स्वत: स्वतःवर लादलेले मौन सुटण्यासाठी  जम्मू- काश्मीर आणि हरियाणा  विधानसभा निवडणुकांचा मुहूर्त यावा लागला.

दोन्हीकडील थोडेसे…

जेव्हा आपण पंतप्रधानांना सार्वजनिकपणे बोलताना पाहतो, तेव्हा आपल्याला हे जाणून घ्यायचे असते, की लोकसभा निवडणुकीत जनतेचा कौल अपेक्षेपेक्षा कमी मिळाल्यानंतर  ते देत असलेल्या राजकीय संदेशात काही बदल झाला आहे का – “400 पार” ऐवजी 240 जागा? की विरोधी पक्षावर निशाणा साधताना ते म्हणत असलेली ती’ तुकडे तुकडे’ वाली ओळच पुनःपुन्हा येते आहे, जी आपण आता अगदी झोपेतही म्हणू शकतो?

विरोधकांवर हल्ला करण्याबरोबरच मोदी स्वत:चं एक वेगळंच मितभाषी व्यक्तिमत्त्व लोकांसमोर मांडतात.  किंवा आपण प्रेक्षक आता त्यांना वेगळ्या नजरेने पाहत आहोत. लोकसभा निवडणुकीपासून पंतप्रधानांबद्दलचा आपला दृष्टीकोन बदलला आहे का – त्यांनी त्यांचा मोदी करिष्मा नाहीसा केला आहे, की आपणच कमी मंत्रमुग्ध होत आहोत?

याचे उत्तर द्यायला अजून मोदींची बरीच भाषणे व्हावी लागतील पण सध्या तरी काहीतरी उणीव आहे, असे जाणवते.

१५ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला केलेले संबोधन पाहता, त्यांचा जम्मू-काश्मीर, हरियाणामधील प्रचार आणि झारखंड किंवा ओडिशामधील भाषणे ही 2014 पासून किंवा गेल्या 100 दिवसांतील त्यांच्या कामगिरीची लांबलचक यादीच होती. त्यांनी त्याच “मोदी की हमी” चे आश्वासन दिले होते. बरं, त्या याद्या काव्यात्मक असणं अपेक्षित नाहीच, पण त्या आता जनतेला पूर्वीप्रमाणे मंत्रमुग्धही करू शकत नाहीत.

१६ सप्टेंबर रोजी गांधीनगरमधील RE-Invest च्या बैठकीत ते थकलेले दिसत होते. प्रेक्षकांनी काहीसे काठावर राहूनच टाळ्या वाजवल्या. “मोदी! मोदीजी! मोदी!’’ जेव्हा पंतप्रधानांनी ओडिशामध्ये  सुभद्रा योजना सुरू केली “मोदी! मोदीजी! मोदी!’’ म्हणत टाळ्या वाजवल्या. परंतु लोकांचे अर्धे लक्ष टीव्ही कॅमेरे त्यांच्यावर फोकस करत आहेत की नाही हे पाहण्यात गुंग होते.   जेव्हा त्यांनी विरोधी पक्षावर हल्ला चढवला तेव्हाच वातावरणात खऱ्या अर्थाने चैतन्य आले.

आपल्याला माहीत असलेले मोदी

नरेंद्र मोदी जेव्हा आपल्या राजकीय विरोधकांवर शाब्दिक हल्ला करतात तेव्हा ते मोदी आपल्या ओळखीचे असतातच. पण खरे मोदी स्पेशल इंजेक्शन  नेहमीच काँग्रेससाठी राखीव असते. या जुन्या आणि मोठ्या पक्षाचा उल्लेख केल्यानंतर त्यांचे डोळे चमकतात, चेहरा उजळतो आणि त्यांच्याकडून धारदार टिपण्णी केली जाते.

आत्ताही, हरियाणाच्या कुरुक्षेत्र येथील प्रचाराच्या भाषणादरम्यान, त्यांनी मोठा हल्लाबोल केला.-  राजकारणात काँग्रेसने लोकांची जेवढी फसवणूक केली, तेवढी मोठी फसवणूक कोणतीच नाही. ”डूब मरो, काँग्रेस के लोग…” ते म्हणाले. ते त्यांच्या आवडत्या लक्ष्यांकडे – नेहरू-गांधी कुटुंबाकडे परतले.

डोडा, जम्मूमध्ये बोलताना आधी ते त्यांच्या सरकारच्या यशाबद्दल, जम्मू-काश्मीरच्या पर्यटनक्षेत्रातील संधी आणि शक्यतांबद्दल शांतपणे बोलत होते. पण नंतर मात्र ते पेटून उठले. आपण करत असलेले संविधान आणि राज्यघटनेचे रक्षण, राजकारणाबद्दलचे प्रेम, पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीच्या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रस्वातंत्र्याचे महत्त्व याबाबत ते भरभरून बोलले. राहुल गांधींच्या नुकत्याच झालेल्या युनायटेड दौऱ्यादरम्यानच्या प्रसंगाचाही त्यांनी इथे निर्देश केला. ‘ए हिंदुस्थान के बेटे…असं म्हणत ते त्यावरही बोलले. यावर तुम्ही म्हणाल, की ही विरोधकांवरची फटकेबाजी तर मोदींना शोभणारीच आहे.

झारखंड आणि ओडिशामध्ये बोलतानाही काहीशी तिचं कथा. “जे लोक देशातून चोऱ्या करतात..”, अशा “शक्ती” ज्या देशाचे नुकसान करतात, “सत्तेची भूक”, “काँग्रेस आणि तिची इकोसिस्टम…” हे वापरून गुळगुळीत झालेले शब्द त्यांनी इथेही मोठ्या आवेशाने वापरले.

त्यांच्या प्रेक्षकांसाठी आणि त्यांना  थेट टीव्हीवर पाहणाऱ्या आपल्यासाठी, हे तेच जुने ‘तुकडे-तुकडे गँग’ प्लेबुक आहे जे मोदी आणि भाजप गेल्या दशकापासून जनतेला अक्षरशः विकत आहेत. पंतप्रधान अजूनही आपल्या समर्थकांना आश्वस्त करू शकतात की जनमताचा कौल यावेळी अपेक्षेपेक्षा  कमी मिळालं असला तरी त्यामुळे त्यांचा राजकीय अजेंडा बदलला नाही.

पण याचा अर्थ असा होऊ शकतो का की पंतप्रधानांकडे नवीन दृष्टी नाही – त्यांना आता  नवीन ‘प्ले बुक’ची गरज आहे?

वाढदिवस सोहळा

मंगळवारी पंतप्रधानांचा 74 वा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी त्यांचे नवीन सरकार स्थापन होऊन १०० दिवस पूर्णही झाले. नेहमीप्रमाणेच, दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला असेल. डीडी न्यूजने त्यांच्या दशकभरातील कामगिरीवर एक विशेष कार्यक्रम केला, आणि Bharat24 ने ‘द मेकिंग ऑफ नरेंद्र मोदी’ असा विशेष कार्यक्रम प्रसारित केला. परंतु टीव्हीवरील बातम्यांनी मात्र त्याऐवजी नव्या सरकारचे 100 दिवस साजरे करण्यालाच प्राधान्य दिले.  आणि ते त्यांनी ते केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाखती प्रसारित करून साध्य केले: पीयूष गोयल, एस जयशंकर, अर्जुन मेघवाल, गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह किमान सात जणांना आमंत्रित केले होते.

तथापि, खरे भाव खाऊन गेले ते एनडीटीव्हीवरच्या कार्यक्रमात नितीन गडकरी.  ते अतिशय मुद्देसूद आणि गरजेपुरतंच बोलले. खरे तर एक गोष्ट स्पष्ट आहे. आपण महाराष्ट्रात (मुख्यमंत्री म्हणून) जाणार का, असे अँकरने विचारले असता, त्यांनी ठामपणे सांगितले की ते दिल्लीतच राहतील.

मोदींच्या गुणांबद्दल विचारले असता गडकरी म्हणाले की ते खूप मेहनती आणि वचनबद्ध आहेत.

मोदींचा वाढदिवस, त्यांच्या प्रचारावर ‘के फॅक्टर’ची छाया होती: अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा जाहीर केला. आणि तो देण्यासाठी  तसेच देशाच्या राजधानीची सूत्रं आतिशी यांच्याकडे सोपवण्यासाठी मोदींच्या जन्मदिनाचाच मुहूर्त निवडला.

आता या वेळेबद्दल बोला!

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments