विवाह सात आयुष्य टिकतील किंवा नाही पण सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाची गाथा नक्कीच एक एक अनंत काळची कथा झाली आहे. हा विषय दिवसेंदिवस जास्तीत जास्त चर्चिला जात आहे. कॉफ़ी विथ करणवर सामंथाला याबद्दल बोलायचे होते. आता हा तेलंगणाच्या राजकारणाचा विषय झाला आहे.
तेलंगणाच्या पर्यावरण आणि वनमंत्री कोंडा सुरेखा यांनी बुधवारी भारतीय राष्ट्र समिती (BRS) चे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव यांना चैतन्य आणि समंथा यांच्या घटस्फोटासाठी जबाबदार धरल्याने मोठा वाद निर्माण झाला. सुरेखा यांनी आरोप केला की केटीआरने समथाकडून मदत मागितली, ज्यामुळे अभिनेत्याचे लग्न मोडले.
गॉसिप हा सेलिब्रिटी असण्याचा अटळ भाग आहे. प्रसिद्ध घटस्फोटांवर सार्वजनिक टिप्पण्यादेखील नवीन नाहीत. पण अडचण अशी आहे की जेव्हा मंत्री-विशेषत: महिला राजकारणी-ज्यावेळी अशा प्रकारच्या चुकीच्या टिप्पणी करतात, तेव्हा घटस्फोटाचा कलंक वैध ठरतो. सुरेखा या असे धूर्त राजकारण खेळू शकतात पण सामंथावर अशी टीकेची झोड उठवणे पूर्णपणे अनुचित होते.
समांथाला तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टेटमेंट जारी करावं लागलं. “एक स्त्री होण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी आणि काम करण्यासाठी, एका ग्लॅमरस उद्योगात टिकून राहण्यासाठी, जिथे स्त्रियांना ‘प्रॉप्स’ म्हणून मानले जात नाही, प्रेमात पडणे आणि प्रेमातून बाहेर पडणे, तरीही उभे राहणे आणि संघर्ष करणे… खूप धैर्य आणि सामर्थ्य लागतं याला.” अभिनेत्याने लिहिले, जेव्हा एखादी यशस्वी महिला सेलिब्रिटी तिचे लग्न संपवण्याचा निर्णय घेते तेव्हा काय होते याचे हे प्रतिध्वनी उमटत आहेत.
गप्पांसाठी खाद्य
नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांचा 2017 मध्ये एखाद्या परीकथेप्रमाणे विवाह झाला होता. खरेतर, त्यांचा हिंदू तसेच ख्रिश्चन समारंभ होता. परंतु 2021 च्या सुरुवातीस संघर्षाची ठिणगी पडली आणि दोघांनी लवकरच घटस्फोट घेतला.
दोघांनी एक निवेदन जारी केले आणि घटस्फोट सौहार्दपूर्ण आणि परस्पर असल्याचे सांगितले.
पण गॉसिप करणारे काही गप्प बसत नाहीत. द फॅमिली मॅन (2021) च्या दुसऱ्या सीझनमध्ये समंथाचे सासरे कथितपणे तिच्या ‘बोल्ड’ सीनमुळे नाखूष होते, ते पुष्पा: द राइज (2021) मधील तिच्या आयटम नंबर ऊ अंतवापर्यंत अफवा पसरू लागल्या.
लवकरच, समंथा कॉफ़ी विथ करणच्या एका भागामध्ये दिसली जिथे तिने स्वतःला ती जशी आहे तसेच लोकांसमोर सादर केले. “अलीकडे, तू आणि तुझा नवरा वेगळे झाला आहात ” असे करण जोहर म्हणल्यावर समांथाने पटकन ‘माजी पती’ अशी त्याच्या वाक्यात दुरुस्ती केली. त्यानंतर जोहरने माफी मागितली आणि ते वेगळे का झाले हे विचारले. पण आपल्या वैयक्तिक आयुष्यात कोणी डोकावलेले आपल्याला नको असल्याचे सांगून तिने विषय आवरता घेतला.
सामंथाने अगदी निदर्शनास आणून दिले की जोहरने तिला हा प्रश्न ऑफ कॅमेरा आधीच विचारला होता. होस्टने समंथाला विचारले की तिच्या आणि चैतन्यमध्ये काही कटुता आहे का? त्यावर अभिनेत्रीने उत्तर दिले की कोणत्याही तीक्ष्ण वस्तू एकाच खोलीत असल्यास त्यांच्यात खणखणाट होणारच. तिने असेही सांगितले की गोष्टी अनुकूल नाहीत, परंतु तिला पुढे जाण्याची आशा आहे.
घटस्फोटाचा कलंक
घटस्फोटानंतर सुमारे तीन वर्षांनी सुरेखा यांची प्रतिक्रिया आली. चैतन्यने यावर्षी 9 ऑगस्ट रोजी अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत लग्न केले. इंस्टाग्राम रील्समध्ये चैतन्यची माजी पत्नी दुःखी असल्याच्या बातम्या फिरत होत्या. पण नंतर हे प्रकरण रीलमधून राजकीय युद्धाकडे गेली.
समंथा, किमान सार्वजनिकपणे, अजूनही अविवाहित आहे. पण चिखलफेक करण्यापासून राजकारणी थांबत नाहीत. सुरेखा यांची माफी आली हे ठीकच, पण ती सर्वांकडून तीव्र निंदा झाल्यानंतरच आली – नागार्जुन, सामंथा आणि ज्युनियर NTR सारख्या टॉलिवुड स्टार्सपासून अल्लू अर्जुनपर्यंत. बाहुबली आणि आरआरआरचे संचालक एसएस राजामौली यांनीही सुरेखा यांच्या टिप्पण्यांवर नाराजी व्यक्त केली.
सुरेखाने यांनी दावा केला की त्या सामंथाला ‘लक्ष्य’ करत नव्हत्या. आणि खरे सांगायचे तर, आतापर्यंत प्रत्येकजण दोन अभिनेत्यांच्या घटस्फोटाविषयीच्या चर्चा ऐकून जेरीस आला असेल.
आधुनिक डेटिंगमध्ये, या अफवा आहेत तोपर्यंत संबंध टिकत नाहीत आणि प्रामाणिकपणे, प्रत्येकाने फक्त आपल्या नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करून पुढे जावे. सेलिब्रिटीजना आपले वैयक्तिक आयुष्य जगू देणे शहाणपणाचे ठरेल.
(दृष्टीकोन वैयक्तिक आहे.)
Recent Comments