scorecardresearch
Monday, 8 September, 2025
घरमतटीव्ही बातम्यांसाठी 'अल्लू विरुद्ध रेवंत' संघर्ष झाला आहे ‘हॉट टॉपिक’

टीव्ही बातम्यांसाठी ‘अल्लू विरुद्ध रेवंत’ संघर्ष झाला आहे ‘हॉट टॉपिक’

या आठवड्यातील टीव्ही बातम्यांसाठी, ‘अल्लू अर्जुन विरुद्ध रेवंत रेड्डी’ हा तेलंगणाच्या राजकारणातील आणि टॉलीवूडमधील टायटन्सचा संघर्ष होता

गेल्या आठवड्यात, आम्ही हिंदी दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांनी दाखवलेला उत्तर प्रदेशातील संभल येथील नव्या -जुन्या मंदिरांचा ‘शोध’ पाहिला. या आठवड्यात, इंग्रजी टीव्ही वृत्तवाहिन्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री अनुमुला रेवंत रेड्डी आणि सुपरस्टार अल्लू अर्जुन यांच्यातील ‘युद्ध’ म्हणून ज्याचे वर्णन केले आहे तोच विषय ‘ट्रेंडिंग’ झाला आहे. टीव्ही बातम्यांसाठी, ही तेलंगणाच्या राजकारणातील आणि टॉलीवूडमधील टायटन्सची टक्कर होती, आणि ती ही माध्यमे चुकवणार नव्हतीच.

अर्जुनने 21 डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत सांगितले की, “ही काही मीडिया स्टोरी नाही.” तथापि, टीव्ही बातम्यांवर, ती शहरातील सर्वात मोठी कथा म्हणून दाखवली जात आहे. का? सेलिब्रिटींचे, विशेषतः चित्रपट सुपरस्टार्सचे लोकांना आकर्षण आहे म्हणून? संसदेतील तमाशा संपल्यानंतर अहवाल देण्यासाठी काही चांगले नाही? की रेड्डी आणि अर्जुन एकाच कथेच्या अगदी वेगळ्या बाजू सांगत आहेत? वस्तुस्थिती अशी आहे की, अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाच्या 4 डिसेंबरच्या प्रीमियरच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या तीन आठवड्यांनंतर, एक महिला मरण पावली आणि तिचा मुलगा रुग्णालयात गेला. आणि इंग्रजी वृत्तवाहिन्यांनी ‘ऑल आउट वॉर’ घोषित केले :’अल्लू विरुद्ध रेवंत’ (रिपब्लिक टीव्ही)

दिल्लीतील इंग्रजी वृत्तपत्रे याला अगदी पहिल्या पानावर स्थान देत आहेत. 25 डिसेंबर रोजी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने सांगितले की ‘अल्लू अर्जुनला पोलिस स्टेशनमध्ये 3 तासांत 20 प्रश्नांचा सामना करावा लागतो’. हिंदी वृत्तवाहिन्याही यात हिरीरीने भाग घेत आहेत. इंडिया टीव्हीच्या रजत शर्मा यांनी याबद्दल लिहिले आहे.

अर्जुनला संध्या थिएटरबाहेर झालेल्या गर्दीत सहभागी झाल्यामुळे अटक करण्यात आली आणि जामिनावर सुटका करण्यात आली. रेड्डी यांनी चेंगराचेंगरीसाठी अर्जुनला जबाबदार धरले आणि अर्जुनने ते ठामपणे नाकारले. ‘इंडिया टुडे’सारख्या टीव्ही न्यूज चॅनेलने या वादाला खतपाणी घातले. ‘अल्लू अर्जुनने गर्दीचा उन्माद वाढवला का?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या आठवड्यात इंग्रजी दैनिक वृत्तपत्रे आणि टीव्ही वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात  उडी घेतली, जेव्हा हैदराबाद पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केले. पीडितेला पुन्हा जिवंत करण्याचा पोलिसांचा प्रयत्न दर्शविला. या सर्व प्रकरणाला माध्यमांनी  ‘तेलंगणा पोलीस विरुद्ध सुपरस्टार’ असे वळण दिले आहे. (एनडीटीव्ही).

सोमवारी मात्र टीव्हीवर सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात येत नव्हते तर अर्जुनच्या घराच्या आवारात वाचाळवीरांनी केलेला हल्लाबोल दाखवला गेला. (सीएनएन न्यूज 18) दगडफेक करणाऱ्या, कंपाऊंडमध्ये घाईगर्दी  करणाऱ्या आणि सामान्यतः बेशिस्तपणे वागणाऱ्या लोकांचे व्हिडिओ फुटेज बघायला मिळाले. चॅनेललाही अभिनेत्याच्या कुटुंबाबद्दल चिंता होती: “हे अत्यंत चिंताजनक आहे,” सीएनएन न्यूज 18 च्या रिपोर्टरने सांगितले. “त्याचे एक कुटुंब आहे… ते अत्यंत गोंधळलेले आहेत… त्याची पत्नी आणि दोन मुलांना लांब नेण्यात आले आहे.”

खळबळजनक दुवे 

सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या ‘फोटो प्रूफ’ द्वारे ‘खळबळजनक नवा खुलासा’ हा वृत्तवाहिन्यांसाठी खरोखरच खळबळ उडवून देणारा होता.कथित तोडफोड करणारा नेता रेड्डी श्रीनिवास आणि सीएम रेड्डी यांच्या प्रतिमा चॅनेलवर चिकटवण्यात आल्या होत्या. वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या मथळ्यासाठी भाजपकडून एक ओळ घेतली: ‘राज्य प्रायोजित हल्ला?’ रिपब्लिक टीव्हीने विचारले. या सर्व प्रकरणात  राजकारण आल्याने आम्ही भाजप, बीआरएस आणि काँग्रेसचे प्रतिनिधी टीव्हीवर मुलाखतींमध्ये लढताना पाहिले. बीआरएसने आणि काँग्रेसने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले.

षड्यंत्र 

“एखाद्या अभिनेत्याला असे का लक्ष्य केले जाते?” टाईम्स नाऊ अँकरने  विचारले. इंडिया टीव्ही अँकर रजत शर्मानेही याच गोष्टीवर आश्चर्य व्यक्त केले परंतु त्यांनी स्वतःच उत्तरही दिले: “अल्लू अर्जुनला लक्ष्य करण्याचा कट रचण्यात आला होता. सुपरस्टारला हा संदेश देण्याचा हेतू होता की पडद्यावर सुपर हिरो असणे ही एक गोष्ट आहे, परंतु वास्तविक जीवनात तोच हिरो शून्यावर आणला जाऊ शकतो.” हा एक दृष्टिकोन होता.

इतर चॅनेल्स यात कारस्थान शोधत होते. सीएनएन न्यूज 18 ने म्हटल्यानुसार, ‘अर्जुनला अटक करण्यात आली होती कारण त्याने निवडणुकीदरम्यान काँग्रेसचा प्रचार करण्यास नकार दिला होता. रेवंत रेड्डी ‘आज तक अजेंडा’वर अँकर राहुल कंवल यांच्या मुलाखतीत ते म्हणाले की कायदा प्रत्येकासाठी समान आहे – तो सेलिब्रिटींसाठी वेगळा असू शकत नाही. “अल्लू अर्जुनने फक्त चित्रपट पाहिला आणि निघून गेला नाही. तो कारच्या सनरूफमधून बाहेर आला, चाहत्यांना जल्लोष करत आणि शुभेच्छा देत… यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली,” ते म्हणाले.

आणि हे असेच चालू आहे- या सगळ्यात पीडित आणि तिच्या कुटुंबाकडे दुर्लक्षच केले जात आहे.

टेलिव्हिजनच्या बातम्या कशाप्रकारे एखाद्या प्रकरणाला वळण देतात हे समजण्यासाठी ही सर्व उदाहरणे पुरेशी आहेत.   पर्यायी बातम्यांच्या स्रोतांसाठी बरेच प्रेक्षक यू-ट्यूब  चॅनेलकडे वळले यात आश्चर्य नाही. ध्रुव राठीसारख्या व्यक्तीच्या सुपरस्टारडमचे आणखी काय स्पष्टीकरण द्यावे, ज्याचे 26 दशलक्षाहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत?

 

शैलजा वाजपेयी यांनी या लेखामधून मांडलेली मते वैयक्तिक आहेत.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments