scorecardresearch
Tuesday, 9 September, 2025
घरराजकारणजुलानामध्ये 'आप'कडून कुस्ती महासंघाच्या माजी कुस्तीपटू कविता दलालविरुद्ध काँग्रेसची विनेश फोगट...

जुलानामध्ये ‘आप’कडून कुस्ती महासंघाच्या माजी कुस्तीपटू कविता दलालविरुद्ध काँग्रेसची विनेश फोगट रिंगणात

काँग्रेससोबत जागा वाटपाच्या चर्चेमध्ये यश न आल्याने, ‘आपने कुस्ती महासंघ, अर्थात WWE च्या कुस्तीपटूचे नाव चौथ्या यादीत ठेवले. गेल्या वर्षी, कुस्तीपटूंच्या निषेधामुळे दलालला तिच्या लैंगिक शोषणाचा घटनाक्रम सांगणे भाग पडले.

नवी दिल्ली: भारतीय कुस्तीपटूंच्या 2023 मध्ये झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटनांच्या निषेधार्थ भारतीय कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती संघटनेविरोधात केलेल्या आंदोलनात कुस्तीपटू विनेश फोगाट आघाडीवर होती. तिच्या पुढाकारामुळे तिच्याकडून प्रेरणा घेऊन  भारताची पहिली महिला वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) कुस्तीपटू कविता दलाल हिने अखेर आपले 15 वर्षांपासूनचे मौन सोडून तिच्याबाबतीत झालेल्या लैंगिक शोषणाला वाचा फोडली.

एक वर्षाहून अधिक काळानंतर दलाल हरियाणाच्या जुलाना मतदारसंघातून फोगट यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. आम आदमी पार्टी (AAP) आणि काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाची चर्चा अयशस्वी ठरल्यामुळे ‘आप’ने WWE कुस्तीपटू दलाल हिला  फोगट हिच्याविरुद्ध रिंगणात उतरवले आणि बुधवारी जाहीर केलेल्या चौथ्या यादीत तिचे नाव दिले.

हरियाणा विधानसभेची निवडणूक 5 ऑक्टोबरला होणार आहे.

भारतीय जनता पक्षाने या जागेवरून भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि भाजप क्रीडा सेलचे सहसंयोजक योगेश बैरागी यांना उमेदवारी दिली आहे.

दलाल यांनी 2000 सालापासून आपल्या वेटलिफ्टिंगमधील कारकिर्दीला सुरुवात केली. 2023 मध्ये, दलाल यांनी केलेल्या आरोपानुसार ,2008 मध्ये माजी आयपीएस अधिकारी आणि भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशन (IWF) चे तत्कालीन अध्यक्ष हरभजन सिंग यांनी तिचे लैंगिक शोषण केले होते. यामुळे त्यांना  नोकरी सोडावी लागली. ‘त्याऐवजी वेट लिफ्टिंग करा आणि कुस्ती खेळा’, असे त्यांनी सांगितले होते.

“जेव्हा माझ्यासमोर अशी परिस्थिती उद्भवली तेव्हा माझ्यासाठी माझ्या स्वाभिमानापेक्षा मोठे दुसरे काही नव्हते,” असे त्या म्हणाल्या होत्या.

“जर कोणी आमच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्यावर थेट हात उचलू शकतो. पण एखादी सामान्य बुजरी मुलगी ते करणार नाही. जेव्हा माझ्याबाबतीत हे  घडले तेव्हा माझ्यात लढण्याची किंवा बोलण्याची हिंमत नव्हती, म्हणून मी माझा मार्ग बदलला.”

1986 मध्ये जन्मलेल्या दलाल, यांना  “कविता देवी” या नावाने देखील ओळखले जाते. त्या  WWE मध्ये कुस्ती खेळणाऱ्या पहिल्या भारतीय महिला व्यावसायिक कुस्तीपटू बनल्या. 2016 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते.

तिच्या पहिल्या डब्ल्यूडब्ल्यूई मॅचला यूट्यूबवर 30 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

 

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments