scorecardresearch
Wednesday, 1 April, 2026
घरराजकारणपार्थ पवार राजकीय पुनरागमनासाठी सज्ज?

पार्थ पवार राजकीय पुनरागमनासाठी सज्ज?

जसे वडील, तसा मुलगा अशी प्रतिमा दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे. 15 फेब्रुवारी रोजी पार्थ पवार अघोषितपणे बारामतीला गेले आणि त्यांनी अजित पवार यांनी त्यांच्या गावी, बारामती येथे हाती घेतलेल्या विविध सार्वजनिक कामांची पाहणी केली.

मुंबई: जसे वडील, तसा मुलगा अशी प्रतिमा दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे. 15 फेब्रुवारी रोजी पार्थ पवार अघोषितपणे बारामतीला गेले आणि त्यांनी अजित पवार यांनी त्यांच्या गावी, बारामती येथे हाती घेतलेल्या विविध सार्वजनिक कामांची पाहणी केली. त्यांनी जानेवारी 2025 मध्ये अजित पवार यांनी सुरू केलेल्या हाय-प्रोफाइल ‘शिवसृष्टी प्रकल्पा’ची पाहणी केली. 650 कोटी रुपयांचा हा प्रकल्प पर्यटनाला चालना देईल, अशी अपेक्षा आहे. पार्थ पवार यांनी ‘फुलपाखरू बाग’ आणि प्रकल्पातील साहसी उपक्रमांसारख्या विविध प्रकल्पांची स्थिती आणि सुरक्षितता पैलूंबद्दलही विचारले.

अजित पवारांच्या मृत्यूनंतरच्या महिन्यात, पार्थ यांनी त्यांच्या वडिलांच्या अनेक जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत -दररोज कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, कार्यक्रमांचे व्यवस्थापन वैयक्तिकरित्या पाहणे आणि बारामतीमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पांचे निरीक्षण करणे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर मोठ्या प्रमाणात पार्श्वभूमीत राहिल्यानंतर, पार्थ आता मुख्य प्रवाहातील राजकारणात पुन्हा प्रवेश करण्यास सज्ज असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या आई सुनेत्रा पवार यांनी सोडलेली राज्यसभेची जागा त्यांना मिळण्याची शक्यता आहे. “त्यांनी राजकीय घडामोडींमध्ये आणि पक्षाच्या कामकाजात खूप रस घेतला आहे, हे स्वागतार्ह लक्षण आहे. जर त्यांना राज्यसभेत पाठवले गेले, तर कार्यकर्त्यांना आनंद होईल,” असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते संजय तटकरे यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले.

पक्षातील अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे, की पार्थ हे सर्वात संभाव्य पर्याय आहेत, कारण ही जागा पारंपारिकपणे कुटुंबाकडे आहे, ज्यामुळे ते नैसर्गिक उत्तराधिकारी बनले आहेत. पार्थ यांच्या जवळच्या एका वरिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याने सांगितले: “ते आता राजकारणात सक्रिय रस घेत आहेत. पूर्वी ते राजकारणाच्या परिघावर होते, त्यामुळे त्यांचे मूल्यांकन करणे कठीण होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून आम्ही सर्वांनी त्यांचे बारकाईने निरीक्षण केले आहे. ते अधिक जबाबदार होत आहेत आणि त्या भूमिकेत पाऊल ठेवण्यास तयार असल्याचे दिसून येत आहे. पक्षाच्या दुसऱ्या एका नेत्याने नमूद केले, की पार्थ पूर्वी पक्षाच्या दैनंदिन कामकाजात किंवा मोठ्या निर्णय प्रक्रियेत सहभागी नव्हते. अजित पवारांच्या निधनानंतर, सुनेत्रा पवार नेतृत्व स्वीकारतील आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री होतील असा एकमताने निर्णय घेण्यात आला – या निर्णयाला पार्थ यांनी पाठिंबा दिला. पक्षाच्या सूत्रांनुसार, हा निर्णय मोठ्या प्रमाणात वरिष्ठ नेत्यांनी घेतला होता, कारण त्यावेळी पार्थ अजूनही शोकाकुल होते.

राजकारणाच्या परीघावर 

2019 मध्ये मावळमधून लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या अपयशी उमेदवारीनंतर, पार्थ सार्वजनिक जीवनातून काहीसे बाजूला पडलेले दिसून आले. एका आमदाराच्या मते, त्यांनी बूथ-स्तरीय व्यवस्थापन मजबूत करण्यात आणि पक्षाची सोशल मीडिया उपस्थिती वाढविण्यात पडद्यामागील भूमिका बजावली. 2023 मध्ये पक्ष फुटल्यानंतर, जेव्हा अजित पवारांनी नवीन गटाचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांचा सहभाग वाढल्याचे वृत्त आहे. त्याच सुमारास, पक्षाने डिझाइन बॉक्स्ड (राजकीय प्रचार कंपनी) चे नरेश अरोरा यांना मीडिया सल्लागार म्हणून नियुक्त केले. अरोरा यांच्याशी पार्थ यांचे जवळचे संबंध असल्याचे म्हटले जाते. पक्षाच्या विधानसभेच्या विजयाचे श्रेय अरोरा यांना घेण्यास आक्षेप घेणाऱ्या पक्षाच्या आमदार अमोल मिटकरी यांच्या टीकेविरुद्ध पार्थ यांनी जाहीरपणे अरोरा यांचे समर्थन केले. पार्थ यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे, की मिटकरी यांचे वक्तव्य पक्षाच्या अधिकृत भूमिकेचे प्रतिनिधित्व करत नाही आणि त्यांना अशा टिप्पण्या करण्यापासून परावृत्त करण्याचे आवाहन केले.

पार्थ यांनी अधूनमधून त्यांच्या वडिलांना पक्षाच्या बाबींमध्ये मदत केली – तालुका कार्यालयांना भेट देणे, जिल्हास्तरीय बैठका घेणे, बूथ-स्तरीय कार्यकर्त्यांना सहभागी करून घेणे आणि 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पक्षाचा ग्रामीण पाया मजबूत करणे. 16 मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकांमुळे, आता उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांना त्यांची वरिष्ठ सभागृहाची जागा सोडावी लागेल. महाराष्ट्रातील सात जागांपैकी सत्ताधारी महायुती आघाडीला सहा जागा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्नुनेत्रा यांच्या जागी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे, ज्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव पत्करल्यानंतर राज्यसभेत पाठवण्यात आले होते.

राजकीय वाद

सार्वजनिक पातळीवर कमी सक्रीय असूनही, पार्थ पवार यांना अनेक वादांना तोंड द्यावे लागले आहे. 2020 मध्ये, पार्थ यांनी तत्कालीन महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते, ज्यामुळे पवार कुटुंबातील तणाव वाढला होता. शरद पवार यांनी त्यांचे इतर नातू रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना मार्गदर्शन करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले होते, असे मानले जात होते. काही काळापासून, पार्थ अधिक सक्रिय राजकीय भूमिका घेण्यासाठी प्रयत्नशील होते. 2019 च्या पराभवानंतर, अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील तणाव वाढला. अजित यांना असे वाटले, की पार्थ नेतृत्वासाठी पुरेसे तयार झालेले नाहीत.  2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, पार्थ यांनी पुण्यातील गुंड गजानन मारणे यांना भेटून पुन्हा वाद निर्माण केला – या कृतीमुळे त्यांच्या वडिलांकडूनही त्यांच्यावर टीका झाली.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments