scorecardresearch
Sunday, 7 September, 2025
घरराजकारण‘क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या शेजारी देशाला क्षमा नाही’ : मोहन भागवत

‘क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या शेजारी देशाला क्षमा नाही’ : मोहन भागवत

"भारतीय लोक त्यांच्या शेजाऱ्यांना कोणतेही नुकसान पोहोचवत नाहीत. पण त्यांना जर क्रौर्य सहन करावे लागले तर ते ऐकूनही घेत नाहीत."असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी सांगितले.

नवी दिल्ली: “भारतीय लोक त्यांच्या शेजाऱ्यांना कोणतेही नुकसान पोहोचवत नाहीत. पण त्यांना जर क्रौर्य सहन करावे लागले तर ते ऐकूनही घेत नाहीत.”असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी सांगितले. सरकारला एक गुप्त संदेश देताना त्यांनी पुढे म्हटले आहे की, “राजाचे आपल्या प्रजेचे रक्षण करणे हे कर्तव्य आहे.” पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बोलताना भागवत यांनी अहिंसा हा भारताचा धर्म आणि त्याच्या मूल्यांचा एक महत्त्वाचा भाग असला तरी, “अत्याचार करणाऱ्यांना” आणि “अत्याचारी” लोकांना धडा शिकवणे तितकेच महत्त्वाचे आहे यावर भर दिला.

विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) वरिष्ठ पदाधिकारी आणि जागतिक हिंदू काँग्रेसचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी लिहिलेल्या ‘द हिंदू मॅनिफेस्टो’च्या प्रकाशनप्रसंगी भागवत बोलत होते. “आपण कधीही आपल्या शेजाऱ्यांना इजा पोहचवत नाही किंवा त्यांचा अपमान करत नाही. पण जर कोणी वाईट केले तर त्यासाठी दुसरा उपाय काय आहे? राजाचे कर्तव्य आहे की तो आपल्या प्रजेचे रक्षण करेल. राजा आपले कर्तव्य बजावेल.” असे ते म्हणाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. “भारताचा मूलस्वभाव अहिंसा आहे… आपली अहिंसा लोकांना बदलणे आहे, ती लोकांना अहिंसक बनवणे आहे… पण काही लोक कधीही बदलू शकत नाहीत. तुम्ही त्यांच्यासाठी जे काही शक्य आहे ते करा, तुम्ही काहीही केले तरी ते बदलणार नाहीत आणि ते जगात अव्यवस्था निर्माण करत राहतील… मग या परिस्थितीत कोण काय करणार?” असा सवाल आरएसएस प्रमुखांनी केला.

भागवत यांनी रावणाचे उदाहरण दिले आणि सांगितले, की त्याला इजा करण्यासाठी नाही तर त्याच्या स्वतःच्या भल्यासाठी मारण्यात आले. ते म्हणाले की रावणात एक उत्कृष्ट राजा बनण्याचे सर्व गुण होते हे सर्वज्ञात आहे – एक महान प्रशासक, शिवाचा एकनिष्ठ अनुयायी किंवा अफाट ज्ञानी माणूस म्हणून त्याला गौरवले जात होते. परंतु त्याला मरावे लागले कारण त्याने या गुणांचा उपयोग चांगल्यासाठी केला नाही. “तुम्ही काहीही करा, रावणाला एक चांगला माणूस बनवता येत नाही हे माहित होते… मग फक्त एकच पर्याय उरला… त्याचे सध्याचे शरीर नष्ट करावे जेणेकरून त्याला दुसरा आत्मा आणि शरीर मिळू शकेल. म्हणूनच देवाने त्याला मारले आणि ही हत्या हिंसा नाही, ती केवळ अहिंसा आहे,” असे ते पुढे म्हणाले.

भागवत यांनी हिंदू पवित्र ग्रंथ, भगवद्गीतेचाही उल्लेख केला. “अर्जुनाला त्याच्या स्वतःच्या भावांना मारावे लागले, कारण तोच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग होता. आपला ‘धर्म’ असा आहे की आपण अत्याचारींकडून मारले जाऊ नये तर गुंडांना धडा शिकवावा. गीता अहिंसा शिकवते, पण अर्जुनाने लढावे आणि शत्रू मारावे अशीही शिकवण आहे. कारण त्याला अशा लोकांचा सामना करावा लागला ज्यांचा विकास केवळ अशा प्रकारे होऊ शकतो,” ते म्हणाले.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments