scorecardresearch
Thursday, 25 December, 2025
घरराजकारणटीव्हीकेकडून विजय यांना मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी

टीव्हीकेकडून विजय यांना मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी

अभिनेता-राजकारणी विजय यांच्या तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) ने बुधवारी त्यांना 2026 च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आणि असा ठराव मंजूर केला, की निवडणुकीसाठी कोणतीही युती केवळ पक्षाच्या नेतृत्वाखालीच केली जाईल.

चेन्नई: अभिनेता-राजकारणी विजय यांच्या तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) ने बुधवारी त्यांना 2026 च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आणि असा ठराव मंजूर केला, की निवडणुकीसाठी कोणतीही युती केवळ पक्षाच्या नेतृत्वाखालीच केली जाईल. 27 सप्टेंबर रोजी करूर येथे विजय यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर टीव्हीकेच्या पहिल्याच जनरल कौन्सिल बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत 41 जणांचा बळी गेला. ममल्लापुरममधील एका खाजगी हॉलमध्ये झालेल्या या बैठकीची सुरुवात चेंगराचेंगरीतील बळींना श्रद्धांजली अर्पण करून झाली. विजय यांचे बैठकीतले भाषण हे या घटनेनंतरचे त्यांचे पहिलेच सार्वजनिक भाषण होते. यात बोलताना विजय यांनी द्रमुक सरकारवर तीव्र हल्ला चढवला आणि मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन विधानसभेत आणि सार्वजनिक व्यासपीठांवरून खोटे बोलल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, सत्ताधारी पक्षाने त्या दुर्दैवी घटनेचा वापर खोटे पसरवण्यासाठी आणि राजकीय स्वार्थासाठी तथ्ये विकृत करण्यासाठी केला.

“सत्तेत असलेल्यांनी जबाबदारी घ्यावी, अहंकार दाखवू नये. राज्यातील जनता सर्व काही पाहत आहे आणि सत्य बाहेर येईल,” असे विजय म्हणाले. त्यांनी सरकार बदनामी मोहिमा आणि नोकरशाही गोंधळ घालून टीव्हीकेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. करूर चेंगराचेंगरी प्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणांचा संदर्भ देत विजय म्हणाले की, तपास प्रक्रियेचेच राजकारण केले गेले आहे. त्यांनी असेही म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने चेंगराचेंगरीच्या चौकशीच्या हाताळणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि मूळ याचिकाकर्त्याने केवळ गर्दीच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक तत्त्वे मागितली असताना मद्रास उच्च न्यायालयाने विशेष तपास पथक का नियुक्त केले? असा प्रश्न विचारला.  त्यांनी राज्य प्रशासनावर मोठ्या कार्यक्रमांसाठी जागा नाकारून आणि सार्वजनिक सभांवर अनावश्यक अटी लादून टीव्हीकेच्या राजकीय हालचालींवर मर्यादा घालण्याचा आरोपही केला. “मला लावलेले निर्बंध अभूतपूर्व होते आणि कोणत्याही राजकीय नेत्याला असे निर्बंध लावण्यात आले नव्हते. जेव्हा लोक मला पाहण्यासाठी रांगेत उभे राहतात तेव्हा त्यांना धोका असतो. ही लोकशाही आहे की हुकूमशाही?” त्यांनी विचारले. विजय यांनी पुढे सरकारवर टीका केली की, ‘राज्यातील लोक त्रास सहन करत असताना ते सरकार झोपी गेले होते’.

“या सरकारकडे सत्ता असू शकते, परंतु त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. 2026 मध्ये, खरा लढा टीव्हीके आणि द्रमुक यांच्यात असेल. यापुढे ही लढाई तीव्र होणार आहे. 2026 मध्ये लोक तुम्हाला धडा शिकवणार आहेत. परंतु, जरी तुम्हाला धडा शिकवला गेला तरी तुमच्याकडे ‘आम्हाला जनतेचा निर्णय मान्य आहे’ असे एक तयार विधान असेल. त्या विधानासाठी तयार राहा,” विजय म्हणाले.

जनरल कौन्सिलचे 12 ठराव

पक्षाच्या जनरल कौन्सिलने राज्यातील द्रमुक सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारवर टीका करणारे एकूण 12 ठराव मंजूर केले. त्यात विजय यांना पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आणि 2026 च्या विधानसभा निवडणुकीसाठी युतीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला. पक्षाने असा दावा केला, की कोणतीही युती फक्त टीव्हीकेच्या नेतृत्वाखालीच केली जाईल. कोइम्बतूर महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा संदर्भ देत, टीव्हीकेच्या ठरावात द्रमुक सरकारवर महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला. तसेच राज्य सरकारचा निषेध करणारा आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच “श्रीलंकेच्या नौदलाने तामिळनाडूतील मच्छिमारांना वारंवार अटक केल्याबद्दल केंद्र सरकारची निष्क्रियता” याबद्दल टीका करणारा ठराव मंजूर करण्यात आला. आणखी एका ठरावात काही राज्यांमध्ये मतदार याद्यांच्या सुरू असलेल्या विशेष सघन पुनरावृत्तीला विरोध करण्यात आला.

तसेच द्रमुक सरकारवर भात खरेदी चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप करण्यात आला आणि असा दावा करण्यात आला की डेल्टा प्रदेशात मान्सूनच्या पावसात सुमारे 20 लाख टन भात उत्पादनाचे नुकसान झाले, कारण ते वेळेवर खरेदी केले गेले नाही. दुसऱ्या ठरावात विजयला भेटणाऱ्या लोकांना सुरक्षिततेची मागणी करण्यात आली, तर द्रमुक अंतर्गत गुंतवणुकीवर श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी करण्यात आली.

संबंधित लेख

चुकवू नका

Recent Comments